२) 'कोरीव लेणी' सुट्टीत पाहण्यासाठी खोदली. एका विद्यार्थ्याचे उत्तर.
३) स्मरणशक्ती' चा वर्ग घेतला पण शिक्षक मुलाचा नाव, पत्ता विचारायचे विसरले व विद्यार्थी फी द्यायची विसरला.
४) चहा कसा झाला? यावर अभिप्राय-तुमच्या कुटुंबाला तुम्ही चहा पिणं सोडावं असं वाटतं, असा चहा झालाय.
५) तुम्ही नेहमी भांडता याचा अर्थ काय? असे पत्नी विचारते अन् पति उत्तरतो- तो अर्थ भांडण चालू असताना विचार ! आता मी कसा सांगू शकेन?
६) तुम्हाला काय आवडतं?', 'तू आज जे केलं नाहीस ते?' असे अनेक किस्से वाचकांची चांगली - करमणूक' करीत.
II) नाट्यलेखन -
करमणूक'मधून नाट्यलेखनासाठी फारशी पाने देता येत नाहीत अशी खंत जरी हरिभाऊंनी व्यक्त केली, असली तरी ३ नाटके, ३ प्रहसने १९१० साली 'करमणूक' मधून प्रसिद्ध झाली. त्यांची नावे 'जयध्वज' अथवा 'असुयाग्नि', 'शमन', 'श्रुतकीर्तनाचरित', 'सुमतिविजय', 'धूर्त विलसित', 'मारून मुटकून वैद्यबुवा', 'जबरीचा विवाह!' ('व्ही क्टर', 'ह्यूगो', 'काँग्रीव्ह', 'मिलिअर', 'शेक्सपिअर' यांच्या नाटकाची ही रूपांतरे होती) हरि नारायण आपटे यांची संत सखुबाई,'संगीत सती पिंगला' इ. नाटकेही करमणुकीतूनच प्रसिद्ध झाली होती. परंतु यापेक्षा अधिक विशेष काही नाटकासाठी या पत्राला करता आले नाही.
पहिले वर्ष संपल्यावर गतवर्षाचा आढावा घेतला. त्यात आपल्या राहून गेलेल्या त्रुटी दाखवतांना संपादकांनी उलगडा केला आहे. 'नाटके वगैरे देण्याचा उद्देश स्थानाभावामुळे तूर्त रहित करावा लागत आहे.'
आणि एवढ्यावरच नाटकावर पडदा पडतो. म्हणजे नाट्य क्षेत्रात करमणूकीला विशेष भरीव कार्य इच्छा व समज असूनही करणे शक्य झाले नाही हे स्पष्ट होते.
III) ललित लेखन-
ललित लेखन मात्र लक्षात येण्या इतपत सातत्याने करमणुकीतून प्रसिद्ध होत राहिले, कारण या पत्रांचे स्वरूपच लालित्यपूर्ण होते. वर्णनात्मक लेखनात 'एक मौजेचा सण', 'किल्ले पांडवगड', ' तुर्कस्थानविषयी काही माहिती', 'मुंबईची मयसमा', 'लंडन जवळील अत्यंत भयंकर जागा', 'श्री परशुराम' इत्यादी माहिती आलेली आहे.
प्रा. वा. ब. केळकर यांनी करमणूकवरील आपला अभिप्राय देतांना