पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/33

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास
 

'करमणूक' सारखे नावाप्रमाणे यथार्थ वृत्तपत्र पाहिजे होते, ती उणिव भरून निघाली: सहृदय वाचकांच्या अंत:करणाला आल्हाद देईल अशा तऱ्हेने ती भरून काढली हे श्रेयस्कर आहे. 'करमणूक' तर नावाप्रमाणे उत्तमच पण बोध करून घेणाऱ्याला व ज्ञानपिपासु आपापल्या इच्छा, मधूर व मनोहारी नेहमीच्या शाळेतील निरस व कटू मार्गाहून अत्यंत भिन्न अशा मार्गाने तृप्त करून घेण्यास आपले नामी साधन आहे. रक्तापासून काय होते, भूक लागण्याचे कारण, जिऊबाईची अगदी लहान लेकरे, फुलांचे रंग इत्यादी उपयुक्त ज्ञानाने भरलेले व सुबोध साध्या भाषेत लिहिलेले निबंध, बोधपर लहान लहान गोष्टी, मनोरंजक चुटके, किरकोळ माहिती, सुरस व मधुर कविता (हा एक पत्राला शोभविणारा अलंकार) असे मनोरंजनाने भरलेले हे पत्र आहे." असे म्हटलेले सार्थ आहे. तर याच अंकात दि. ह. वाकनीस यांनी दिलेला आपला अभिप्रायही येथे लक्षात घेणे उचित होईल ते म्हणतात, 'इंग्लंडमध्ये मनाचे रंजन करून ज्ञान देणारी पत्रे त्यावेळी होती तसे समाधान करमणूकने दिले. नाटक कादंबऱ्यादी ग्रंथांचे वाचन कंटाळवाणे वाटे त्यासच करमणूकीने इतके मोहित केले, लेखनपटुत्वाची निदर्शक भाषा अतिगोड व लिहिणाऱ्याची शैली अवर्णनीय आहे.'

(करमणूक दि. २८-७-१८९२)
 

 "लहान मोठ्यांचा रिकामा वेळ आनंदात व मानसिक उन्नतीचा करमणुकीने घालविला जातो शनिवारी हे पत्र कधी हाती पडेल असे होऊन जात. आबाल-वृद्धांचीही हीच उत्कंठा असे. जणु काही आठवड्यातून एक दिवस मिळणारी ती विश्रांती आहे " असा रसिकांचा कौल या पत्राने मिळविला. या पत्राची योग्यता व अपेक्षा लोकांना त्याहून अधिक स्त्रीयांना उमजली आहे. याचे कारण काळजीने, शोधकतेने, मनःपूर्वक श्रमाने करमणुकीचे काम केले जाते. विविध विषय दर आठवड्याला शोधून काढून मनोरंजनाला प्रारंभ, पौष्टिक, रुचकर व आल्हादकारक असे पक्वान्न चे ताट घरोघर पोहचते करावयाचे आणि खरोखरच थक्क करणारी त्यातील विषयांची जंत्री आहे. त्यात अकारण वितंडवादात वेळ न घालविता वनस्पती, प्राणी, ज्योतिष, इत्यादी शास्त्रांची माहिती देणारी करमणूक खाण बनली.

IV) शास्त्रीय लेखन-

 'करमणूक'ने मनःपूर्वक शास्त्रीय माहिती नेमाने दिली. ती अक्षरशः स्तिमित करणारी आहे. उदा. अति मोठा कालवा, फोटोग्राफ, हीरा, चित्र, धुराचा उपयोग, पचनक्रियेचा काल, पक्षांचे स्नान, रंगांधत्व, रडणारे झाड, लष्करी गुप्त गोष्टी कशा फोडतात, हिंदुस्थानातील खनिज द्रव्ये, आमची हल्लीची राजधानी, झाडांचा उपयोग (२५ जून, १८९२) (ओझोन हवेत असल्याने लाभ हे पर्यावरण शास्त्राचा महिमा वाढण्यापूर्वी सांगितले.) घडाळे कां बिघडतात, पुष्कळ दिवस कसे जगावे, हजामतीनं