पान:तुतीपासून रेशीम.pdf/१७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७५ याप्रमाणें सालिना एकंदर पांचशे पन्नास रुपये खर्च . येऊन एकंदर उत्पन्न कमी प्रमाणावर धरलें तरी आठशे आठ रुपये होतें. ह्मणजे,दरसालचा खर्च वजा जातां दोनशे अठ्ठावन रुपये एकरी निव्वळ नफा राहतो. चांगल्या तऱ्हेनें काळजी घेऊन काम केल्यास दरसालचें उत्पन्न एक हजार दोनशें चौवीस होते. याप्रमाणें एकंदर खर्चत्रेच वजा जातां सहाशें चौऱ्याहत्तर रुपये देखील अशा एक एकराच्या लागवडी- पासून मिळणें शक्य आहे. घराच्या सभोंवती अथवा शेताच्या बांधावर लावलेल्या झाडांवर थोडेबहुत किडे पाळून घरांतल्या घरांत सालाचे विणकरीपुरतें रेशीम तयार करण्याची पद्धत गरीब बाया बापड्यांनीं केल्यास त्यांस सालाचे पन्नास पाऊणशे रुपये मिळण्यास हरकत नाहीं. अशा थोड्या प्रमाणावर काम करणारांस दोन तीन रुपयांचें साहित्य पुरेसें होतें. लहान लहान टोपल्यांतून किडे पाळून त्यांपासून झालेल्या कोस- ल्यांस वाफारा देऊन चुलीवरचे चुलीवर मकतुली रेशीम काढून त्यांना लागणाऱ्या रेशमाचा त्या सहज पुरवठा करून घेऊ शकतील. उपसंहार. जेथें अगदी नव्यानेंच रेशमाचा कारखाना करावयाचा असेल, तेथे पहिल्या पहिल्यानें सवाईनें खर्च होऊनही कित्येकांना नुकसान सोसावें लागतें. पण याचें मुख्य कारण