पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९४ : शतपत्रे

लक्ष देऊन जे संसार सोडितात त्यांस त्यांचे शासन नको, ही गोष्ट सर्व कबूल करतात. जरी ते म्हणतात की, शास्त्र ईश्वरापासून निर्माण झाले तथापि ते असे म्हणतात की, व्यवहार नीट चालण्याकरिता मात्र ते कले, मोक्षाचे साधन शास्त्र नाही. तसेच ज्ञान म्हणजे मनुष्याने सारासार विचार पाहून परमेश्वराशी ऐक्यता पावून रहावे म्हणजे त्यांस शास्त्राची गरज नाही. यावरून ज्ञान हे सर्व कर्ममार्गाहून व शास्त्राहून अधिक आहे. व ज्ञान हे फक्त मनुष्याचे अकलेपासून फळ आहे, तेव्हा अक्कल हीच मोक्षाचे साधन आहे आणि अकलेपासून जो ज्ञानधर्म उत्पन्न झाला, त्याने मोक्षाचे साधन होते.
 व्यवहार व संसार यथास्थित होण्याकरिता पूर्वपार अनुभवावरून किंवा मनुष्यांनी व्यवस्था लक्षात आणून जे नियम ठरविले ते शास्त्र; व यज्ञ, पूजा इत्यादी जे धर्म आहेत तेही त्याप्रमाणे होत. ते काही ज्ञान नाही मग मनुष्यांनी केले असता अथवा शुद्ध समुदाय मताने झाले असता सर्वांनी मानावे म्हणून ईश्वरप्रणीत असे ठरवून ग्रंथांची योग्यता वाढविली. ज्ञानावाचून मोक्ष नाही व प्राण्यामध्ये धन्य वसिष्ठ व ब्रह्मदेव हे देखील ज्ञानी होऊनच मुक्ती पावतात; परंतु प्रजेस व्यवहार समजण्याकरिता नियम बांधले की, दारू पिऊ नये, सोने चोरू नये. या गोष्टी सर्वांस अनुभवावरून वाईट वाटून हे नियम ठरविले असतील, हे उघड आहे. किंवा ईश्वराने सांगितले किंवा प्रेरणा केली, असे म्हटले तरी शोभेल. धर्म म्हणजे व्यवहार व ज्ञान म्हणजे मोक्षाचे साधन.
 एका राजाची गोष्ट आहे की, त्याने आपली स्त्री एकास अर्पण केली. त्याविषयी दुसऱ्याने पुसले की, तुझ्या मनात काही राग आला होता की नाही ? त्याने सांगितले की, नाही. तेव्हा त्यांस पाप लागले नाही. याप्रमाणे त्या व्यवहारामध्ये महान पातकाच्या गोष्टी, त्याही ज्ञानी यांचे ठायी निर्दोष होतात. कारण की त्यांचे ठायी मनास विकृती नाही. मन शुद्ध असले म्हणजे त्यांस धर्मांचा प्रतिबंध नाही. मनास विकृती असल्यास त्याने धर्माप्रमाणे वागले पाहिजे असे आहे.
 तात्पर्य इतकेच की, हिंदू धर्मात कोणतेही मत नाही असे नाही. भजन करण्याचे मार्ग दुष्ट तंत्रापासून तो संन्यासापर्यंत आहेत. नाना प्रकारचे देवाचे भजन करणे हे सर्व आहे. संस्कृत भाषेत कोणताही शब्द असला तरी अर्थ करतात व कोणतेही भाषेतील शब्द असो, अक्षरे असली म्हणजे अर्थ करतात, तद्वत् हिंदुशास्त्र आहे. त्यात काही व्यंग नाही. जे मत म्हटले ते आणि जो शास्त्रार्थ पाहिजे तो त्यात आहे. परंतु सर्वांचे तात्पर्य काढले तर इतके निघते की, या धर्मांमध्ये मुख्य तीन मार्ग आहेत, ते असे. एक ज्ञानमार्ग, दुसरा