पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संकटाची सावली

१३

संख्या व मृत्युसंख्या यांच्या परस्पर प्रमाणाबद्दल जो सिद्धान्त विद्व- मान्य झालेला आहे त्याविषयी सविस्तर विवेचन या ठिकाणी करण्या- पेक्षा पुढील प्रकरणी करणेंच आम्हांस अधिक सोयींचें वाटतें. परंतु प्रस्तुत मुद्दा इतकाच, कीं शास्त्रकारांच्या वेळच्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितींत अत्यंत महत्त्वाचा भेद असल्या कारणानें त्यांनी प्रशस्त मानलेली बहुप्रसविता आपण प्रशस्त न मानली तर तें समर्थ- नीयच ठरेल.
 दुसरी गोष्ट अशी, कीं विवाहित स्त्री-पुरुषांस बहुप्रसवितेच्या ऐवजीं संततिनियमनाचा उपदेश करण्यांत विवाहाचा मूळ हेतू जो सुप्रजाजन न त्याच्याशीं विरुद्ध असा मार्ग आपण पतकरतों ही कल्पना खरी नव्हे. ही गोष्ट लक्षांत यावयासाठीं विवाहाचा हेतू नुसतें प्रजाजनन नव्हे तर सुप्रजाजनन होय हें वाचकांनी कधीही विसरता कामा नये. वर सांगितलेच आहे, कीं प्राचीन काळची परिस्थितिच अशी होती, कीं वधूवर गुणसंपन्न असतील अशाविषयीं काळजी घेतली, की पुढच्या गोष्टींची चिंता वाटण्याचें कारणच नव्हतें. कारण अशा सत्पात्र वधूवरांच्या पोटी येणारी संतति संख्येने कितीही मोठी असली तरी तिला सर्व प्रकारचीं सुखसाधनें प्राप्त होतील याविषयी लोकांना खात्री होती. संतति मूळ जन्माला येतांना गुणविशिष्ट असली ह पुढे खडतर परिस्थितीच्या अग्नींत ती दुग्ध होईल असा संभ कोणाच्या ध्यानी मनीं त्या काळी येत नसे. पण आज तशी परि- स्थिति राहिलेली नाहीं. देशकालाचें मान अजीबात बदलले आहे... स्त्री-पुरुषांच्या पोटीं जितकी संतति निपजेल तितकी इष्टच आहे असें वाटण्यास आज कारण नाहीं. उलट देशाची मृत्युसंख्या दिवसानु - दिवस वाढत चालली आहे हें आपणांस स्पष्ट दिसत आहे; आणि या अवाढव्य मृत्युसंख्येचें खरें मूलकारण अवाढव्य जन्मसंख्याच होय असे तज्ज्ञ लोकांचें सांगणें आहे. जन्मसंख्या व मृत्युसंख्या