पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संस्कृत व्युत्पत्तीला परकीय भासणारे व म्हणून उघड परकीय दिसणारे व शोधा- अंती सुमेरी भाषेतले सांपडणारे असे 'तैमात, अलिगी, विलिगी. सिनीवाली' वगैरे शब्द आढळल्याने सुमेरी व हिंदी संस्कृतीचा विनियम झाल्याची कल्पना प्रथम लो. टिळकांना सुचली. परंतु त्या वेळी सुमेरी वाङ्मय हही आहे त्याप्रमाणे इंग्रजी कवितारूपाने उपलब्ध झाले नसेल म्हणून म्हणा, अथवा त्यांच्या स्वतःच्या अनेक व्यवसायांमुळे त्यांना वेळ मिळाला नसेल म्हणून म्हणा, परंतु कोणत्याहि कारणाने असो या वृत्रकथेचा संपूर्ण संदर्भ तिहास लो. टिळकांनी संशोधिला नाही. तो तसा संशोधण्याकरितां प्रथम सुमेरी कथा साकल्याने अभ्यासणे जरूर होते, व त्यानंतर ऋग्वेदांतील तत्संबद्ध उतारे काढण्यासाठी त्याचाहि अभ्यास करणे अवश्य होते. तसा केल्यानंतर या दोहोंत अपूर्व साम्य साद्यन्त असल्याचे मला आढळून आले, व त्याच्या स्पष्टीकरणासाठीच खालील विवेचन केले आहे. हैं विवेचन करितांना संदभासाठी घेतलेले सुमेरियन् व भारतीय असे दोन्ही प्रकारचे आधार अगदी मूळरूपाने घेतले आहेत. भारतीय आधारांसाठी अम्वेदीय सत्तांतील उतारे शब्दशः घेतले आहेत. सुमेरी आधार माझ्या पहिल्या लेखांत सांगि- नल्याप्रमाणे त्या काळी ओल्या विटांवर कालाकृति लिपांचं जें लिखाण कोरलेले आहे. त्याचे इंग्रजी कविताबद्ध भाषांतर केले आहे. त्यांतून घेतले आहेत. ही कीललिपी उकलण्याचे प्रमुख श्रेय मि. जॉर्ज सिमथ, झुगो, बुकर वगैरे ग्रंथकारास आहे. या शिवाय नि. ५. चवथ्या पांचव्या शतकांत वेरोसस् नांवाच्या एका खाल्डियन धर्म- गरने समेरी दंतपुराणकथांचा संग्रह केला होता. त्याचे पुढे अकि भाषेत भाषांतर करण्यांत आले. ते भाषांतर सांप्रत उपलब्ध नाही, पण त्यांतील उतारे अलेक्जेंडर पॉलिहिस्टर यान एकत्रित केले आहेत, व त्यावरून युसोविअसू नांवाच्या ग्रंथकारान 'क्रानिकॉन' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथांतील मजकुराने जॉज स्मिथच्या लिपीवाचनाला संपूर्ण रीतीने पुष्टि मिळाल्याने स्मिथच्या भाषांतराचा आधार मुळा- इतकाच विश्वसनीय मानण्यास हरकत नाही. त्यांतूनच सुमेरी आधार घेतले आहेत. कोठे कोठं अभिप्रायात्मक गद्य आधार घेतले आहेत, ते किंग या ग्रंथकाराच्या तद्विषयक ग्रंथांतून घेतले आहेत. गया सुमेरी आधारांवरून पहातां सुमेरी देवतांसंबंधाने किंगने जे विवेचन केले. आहे, ते तंतोतंत भारतीय वैदिक देवतांप्रमाणेच आहे. तो म्हणतोः-“या देवता म्हणजे सृष्टीतील निरनिराळ्या शक्तींची रूपं होत. जगतांत नित्य प्रतीत होत असलेल्या शक्तींच्या व त्यांच्या परिणामांच्या घडामोडीसच त्यांनी देवत्व दिले आहे. त्या कालच्या लोकांनी प्रत्यही सूर्याचा अस्तोदय पाहिला. चंद्राच्या कलांचे निरीक्षण केले निरनिराळ्या तान्यांचे अवलोकन केले, निरंतर मंदगतीने वाहणारा वायु व प्रलयकता झंझावात यांचा अनुभव घेतला, परंतु हे सर्व प्रकार सृष्टीच्या शक्तींचे स्वाभाविक रिणाम आहेत, ही जाणीव त्यांना न झाल्याने या परिणामांच्या ठायीं त्यांनी देवांची. कल्पना केली, व अनुकूल प्रतिकूल परिणामानुसार त्या देवांचे शुभाशुभ वर्ग पाडले.