या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग चवथा- <ও करितां येतील किंवा नाहीं, इकडे अधिक लक्ष द्यावें. संसारांत अनेक यातायाती सोसाव्या लागतात. त्या सोसण्यास उभयतांस सामथ्र्य असलें पाहिजे. केवळ मोठ्या कुळावर किंवा हुंड्यावर लक्ष देणें चांगलें नाहीं. कुळाचा विचार केला तरी सशक्तपणा पाहिलाच पाहिजे. रोज कराव्या लागणाच्या परिश्रमांचे माप, कुळानें किंवा एक वेळ मिळणाच्या हुंड्यानें, भरून यावयाचे नाहीं, प्रखेक कामाला चाकरमाणसें ठेवण्याची ऐपत असल्यास गोष्ट निराळी. २५ अविवाहित राहावें असें मनांत आल्यास, त्या स्थितींतील अडचणींचा चांगला विचार करावा. आपल्यांत अविवाहित माणसें हल्लीं फारशीं आढळत नाहीत. आढळतात, तीं आचरणशुद्ध नसतात, याकरितां अविवाहित राहाणें धोक्याचे आहे असें ह्मणावें लागतें. आचरणशुद्ध माणसें अविवाहित राहिल्यास, त्यांचा समाजास व देशास चांगला उपयोग होईल, यांत शंका नाहीं. पण अनीतिमान माणसें समाजाच्या जवळ राहाणे भयंकर असतें. याकरितां आपण अविवाहित राहूं व आपलें आयुष्य सत्कार्यात खचूं, असा भरंवसा असल्याशिवाय अविवाहित राहाण्याचा निश्चय न करणें चांगलें. कांहीं वेळ अविवाहितपणाचा अनुभव घेण्यास हरकत नाहीं, पण विवाह करावयाचा असेल तर तो योग्य वेळीं करावा. लहानपणीं लन्न करणें जसें अप्रशस्त, तसेंच तें तारुण्य गेल्यावर करणेंही अप्रशस्तच. योग्य वेळ उलटून गेल्यावर विवाह करणें चांगलें नाहीं, अशानें ‘इदं च नास्ति परं च न लभ्यते'; असें होण्याचा पुष्कळ संभव असतो. योग्य वेळ चुकल्यामुळे पुष्कळांच्या संसाराची फजीती झाली आहे. तारुण्य फुकट घालवून वृद्धापकाळीं विषयसुखाकरितां वेडावणे, यासारखी दुःखकारक गोष्ट दुसरी नाही. याकरितां या गोष्टीचा विचार योग्य वेळीं करावा. ३० प्राचीनकाळीं आठव्या वर्षी उपनयन, बारा वर्षे विद्याभ्यास, व वीस वषापुढे विवाह,असा साधारण नियम असावा,असें मनुस्मृतीवरून वाटतें. हल्लीही एकादी विद्या किंवा कला शिकण्यास साधारण