निर्माणस्थळ गौतमी परि महाकृष्णातिरीं जो वसे |
कांतासंग नसे, प्रपंचही नसे, आशा दुराशा नसे |
ज्याला उत्तम रामदास म्हणती, त्रैलोक्य वंदीतसे |
ऐसा सदगुरु हा अनंत कविचा बद्धांस तारीतसे ||१||

वस्त्रें हुर्मुजी भरजरीं पटकुले, माथा चिराही वसे |
कायें सुंदर गौरवर्ण विलसे भाळीं अवाळू असे ||
स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लीहीतसे |
ऐसा सदगुरु हा अनंत कवीचा बद्धांस तारीतसे ||२||

ज्याची पूर्ण समाधि सज्जनगडी गुप्त प्रकारें असे |
पादूकांवरि शेष शोभतसे, दोन्हीकडे आरसे |
ज्याची पुण्यतिथी सुदीन नवमी उत्साह होतो असे |
ऐसा सदगुरु हा अनंत कवीचा बद्धांस तारीतसे ||३||

जेणे सात्त्विक राजसादिही तिन्ही आत्मस्थिती आटले |
वेदांताबुधीचे प्रभाव अवघे जेणें निराकर्णिले |
विज्ञानें भवसिंधु पार तरला जिंकोनी साही धुरा |
ऐसा सदगुरु रामदास विलसे, जो निस्पृहाचा तुरा ||४||

ज्याची गाढ उपासना जरी असे जाणे अयोध्यापती |
नेणें त्याहुनी अन्य दैवत असे ऐशी जयाची स्थिती |
ज्याचा गुप्त विचारही परि असे नारी नरा लेकुरा |
ऐसा सद्गुरू रामदास विलसे, जो निस्पृहाचा तुरा ||५||

सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदारशृंगापरी |
नामें सज्जन जो नृपें वसविला श्रीउर्वशीचे तिरीं |
साकेताधिपती, कपी, भगवती हे देव ज्याचे शिरीं |
तेथे जागृत रामदास विलसे, जो या जनां उद्धरी ||६||

|| जय जय रघुवीर समर्थ ||


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.