या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४

दुर्गेस नित्य मांसाचा नैवेद्य आहे. असमंतात ५५० कोशांतील लोक येयें हमेषा येत असतात.यात्रेकरी तर दुर्गादेवीच्या दर्श- नास गौबाईच्या दर्शनास जातात तेव्हां जातात.ह्या देवीच्या देवळांत दर मंगळवारी बरीच गर्दी होते, आणि श्रावण्या मंगळ- वारी तर फारच मोठे मेळे जमतात.
 ह्या दुर्गेच्या देवळाच्या जवळच्या मोहोल्यांत हजारों माकडे आहेत. ह्यांस यात्रेकरी लोक फुटाणे घालितात.ही माकडे या मोहोल्यांतील घरांच्या कवलारास मनस्वी उपद्रव करितात तरी त्यांस कोणी हात लावीत नाहीं.त्या माकडांत कांही मोठी माकडे आहेत ती फार भयंकर आहेत.डोक्यावरील पागोटें अगर टोपी वरच्यावर उचलन नेतात आणि पांतस्थास वेड्यासा- रखे करितात.
 ह्या दुर्गादेवीची कथा अशी आहे कीं, कोणे एका समय। रुरुचा पुत्र दुर्ग हा तपास बसला. ह्यानें तप इतके मोठे केले की, त्याला त्यापासून इंद्रपद प्राप्त झाले.नंतर तो देव ब्राम्हण गाई वगैरेंचा फार छळ करूं लागला.त्याने चोहीकडे अन्याय व जुलूम चालावेला. ह्या योगे सर्व देव त्रासून गेले आणि इंद्र, वरुण, वायु प्रभृति सर्व महादेवास शरण गेले आणि दुर्गाच्या त्रासापासून मुक्त करण्याबद्दल त्याची प्रार्थना केली. नंतर शंकर प्रसन्न झाले आणि गौरी जी त्यांची पत्नी तिला दुर्गाचा वध करून यावे ह्मणून आज्ञा केली. तेव्हां गौरीने आपली जी तमोगुण प्रकृति महाकाली तिला दुर्ग वधार्थ पाठविलें. ती दुर्गाच्या नगरावर गेली. तेव्हां दुर्गानें आपले कांहीं आप्त सैन्य बरोबर देऊन महाकालीशी युद्धास पाठविलें, आणि त्यांस अशी ताकीद केली की, महाकालीस पकडून आणावे.नंतर त्या दुर्ग सेनेने महाकालीस वेढा घालून पकडले आणि तिला दुर्गाकडे चा- लविलें. तेव्हां महाकालीस महाक्रोध आला आणि तिच्या मुखावाटे प्रचंड अभी उद्भवला. त्या अनोनें ती सर्व राक्षस सेना दग्ध झा-