आतां लागे मार्गेसर आली
मन पाखरू
मनाचं फुलपाखरू नेहमी भिरभिरत असतं या ना त्या विचारांवरून सतत उडत असतं स्वस्थता काय हे त्याला मुळीच माहीत नसतं म्हणूनच ते सारखं अस्वस्थपणे वावरत असतं कधी दर्डावून तर कधी प्रेमाने याला समजवायचं असतं पण मोकाट सुटलं की लगेच लगाम घालायचा असतो कधी शांतपणे त्याचे म्हणणे ऐकायचे असते तर कधी मनाला डावलून बुध्दीने वागायचे असते पण बावरलेल्या मनाला आपणच सांभाळायचे असते कधी एकाकी पडलेल्या मनाचे आपणच मित्र व्हायचे असते प्रत्येक व्यक्त अव्यक्त विचारांचे तेच तर साक्षीदार असते कुणीही जवळ नसले तरी मन मात्र सतत सोबत करत असतं म्हणूनच या जिवलगाला मनापासून जपायचं असतं. ©प्रांजली लेले