आमची संस्कृती/कऱ्हाड अधिवेशनाचे अध्यक्षीय भाषण
आमची संस्कृती / ९५
८. क-हाड अधिवेशनाचे अध्यक्षीय भाषण
अध्यक्षबाईसाहेब व बंधु-भगिनींनो,
तुम्ही उत्तर सातारकरांनी मला येथे बोलावून माझा जो सन्मान केला आहे त्याबद्दल मी तुमची फार ऋणी आहे. कोणत्याही समारंभाला जाऊन भाषण करण्याचे माझ्या अतिशय जीवावर येते, ह्याचे कारण म्हणजे मी माणूसघाणी आहे असे नव्हे. इतरांच्या मानाने मी कामात बुडालेली असते व मला क्षणाचीही फुरसत नसते असेही नव्हे. पण अशा त-हेच्या व्यासपीठावरून बोलण्याचा माझा अधिकार नाही असे मला मनोमन वाटते व दुसरे कारण म्हणजे प्रत्येक कार्याला बाहेरचे माणूस बोलावण्याचा आजकालचा प्रघात मला पसंत नाही. एखादी शाळा म्हणा, संघ म्हणा, ह्याचे काय कार्य चालले आहे हे त्या त्या शाळांत किंवा प्रदेशात चांगले माहीत असते. बाहेरचा माणूस कार्याच्या कळकळीने यायला प्रवृत्त होतो असे नसून कोणत्या तरी व्यक्तीच्या आग्रहाला बळी पडून येतो. आमंत्रण स्वीकारले म्हणजे त्या संस्थेचा अहवाल चाळून त्याबद्दल चार शब्द आपल्या भाषणात सांगतो. ते चार शब्द अर्थातच मोठ्या गौरवाचे असणार; कारण पाहणचाराचा पहिला शिष्टाचार तरी पाहुण्याला पाळला पाहिजे. आणि इतर भाषणात सर्वसाधारण उपदेश केलेला असतो. कार्यकर्त्यांपैकी कित्येकांचा वेळ पाहुण्यांच्या सरबराईत फुकट जातो हे ९६ / आमची संस्कृती
निराळेच. मीही ह्या अशाच पाहुण्यांपैकी, त्यांतून कोणत्याही त-हेचे सामाजिक कार्य प्रत्यक्ष अंग मोडून न केलेली. तेव्हा माझे भाषण वरील त-हेच्या पाहुण्यांसारखे किंबहुना त्याहूनही कमी दर्जाचे झाले तर नवल नाही व मी त्याबद्दल आपणा सर्वांची क्षमा मागून ठेवते.
प्रत्यक्ष समाजकार्य करणा-या धुरीणांना मी काय सांगणार असा विचार करताना माझ्या मनात आले की, कार्य काय करावे हे अंगी पात्रता नसताना सांगण्याचा अतिक्रम न करता समाजधारणेला कुठच्या गोष्टीची आवश्यकता आहे हे सांगितले तर कार्यकर्त्यांना त्याचा कदाचित उपयोग होईल. रणक्षेत्रावर शिपाई लढत असतात, ते आपल्या कामांत कसूर करीत नाहीत; पण त्यांना कल्पना नसते. प्रत्यक्ष लढाईत न उतरता लांब बसून, नकाशा पुढे ठेवून, शत्रूच्या हालचाली, डोंगर, नद्या, नाले, प्रदेशाचा उंचसखलपणा, वगैरे सर्व ध्यानात धरून कुठून व कशी चढाई करावी, आपल्या फळीत कच्चेपणा कुठे आहे, संरक्षण हालचाली कशा कराव्या वगैरे गोष्टी पुष्कळदा लांब असणा-या माणसाला सांगता येतात. तसाच काहीसा माझा आजचा प्रयत्न आहे.
समाजातील घटकांचे परस्परावलंबन, समाजिक समता म्हणजे काय व हल्लीच्या काळी आपली स्थिती सुधारण्यास आपणास काय करता येईल ह्याविषयी काही थोड्या गोष्टी मी आपणांशी बोलायचे योजले आहे.
समाजातील घटकांचे परस्परावलंबित्व
आमची संस्कृती / ९७
निरक्षरांपुढे पडलेला अंधार दूर होत नाही, काही थोडे घरे बांधून, मोटारी ठेवून राहिले म्हणून ज्यांना घरदार नाही अशांची दैना कमी होत नाही. काही थोड्यांना भरपूर अन्न व कपडे मिळाले म्हणून अर्धपोटी उघड्या नागड्यांना ऊबही येत नाही व त्यांचे पोटही भरत नाही. जेव्हा बहुतेक सर्वांच्या प्राथमिक गरजा भागतील तेव्हा सर्व घटक मिळून एक बलशाली समाज निर्माण होईल, एरवी नाही. हे साध्य होण्यास एका घटकाची वेदना ती सर्व घटकांची, ही भावना असली पाहिजे. पायाच्या करंगळीला टोचले तर सर्व शरीराला वेदना झाल्या पाहिजेत. अगदी हीच प्राथमिक भावना आपणात नष्ट होत चालली आहे. जातिनिष्ठ समाजात एक एक जात, आपण एका विराट समाजाचा लहानसा अवयव आहो हे विसरून सबंध समाज जणू आपणातच सामावला आहे ह्या भावनेने वर्तन करीत असते. ब्रिटिशांच्या राजवटीत व सध्याच्या काळात जातिनिष्ठा पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. पूर्वी आपापल्या गावी सर्वांना सांभाळून वागावे लागे. जात किंवा गाव वाळीत टाकील तर जिणे अशक्यप्राय होत असे. ब्रिटिशांच्या राज्यात कुटुंबाला, जातीला व गावाला धाब्यावर बसविणे शक्य झाले. पूर्वी आपल्या गावांतील व भोवतालच्या पाच दहा गावांतीलच जातभाई माहीत असत. ब्रिटिशांच्या दळणवळणादी साधनांमुळे सातासमुद्राच्या पलीकडचे जातभाई ओळखीचे होऊ लागले व इतर जातीच्या शेजा-यांपेक्षा जवळचे वाटू लागले. ब्रिटिशांआधी कोकणस्थ चितपावन संघ, अखिल भारतीय धनगर समाज, मराठा शिक्षण मंडळ अशासारख्या केवळ विशिष्ट जातीच्या कल्याणासाठी काढलेल्या संस्था कोणत्या तरी राजवटीत होत्या काय? संस्थेचा उद्देश कल्याणप्रद असला तरी तीमुळे जातीय भावना बळावते व समाजाचे कल्याण तेच जातीचे कल्याण ही भावना नष्ट होण्याच्या मार्गावर लागते. दोनशे वर्षांपूर्वीपासून मद्रास इलाख्यात वस्ती करून राहिलेले, घरची बोली तामीळ झालेले चितपावन युवक पुण्याच्या चितपावन संघाकडून मदत मिळवून मद्रासला शिक्षण करतात ही गोष्ट काय सांगते? तुमच्या सातारच्या धनगरांचे कल्याण सातारा जिल्ह्याच्या समृद्धीवर अवलंबून आहे, की पंजाबच्या जातभाईंच्या संघटनेवर अवलंबून आहे? एके काळी महाराष्ट्राचे राज्यकर्ते असलेले व उद्याच्या भविष्यकाळात राज्यसूत्रे ९८ / आमची संस्कृती
ज्यांच्याकडे जाणार आहेत ते मराठे जातीयवादात बुडून राहिले तर इतर जमातींना पोटात भय वाटणार नाही का? काही जातींना वाटते की आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण कायम वर्चस्व टिकवू, काहींना वाटते की, संख्याधिक्याच्या बळावर आपण इतरांना मारून काढू. पण हे दोन्ही मार्ग जातिदृष्ट्या व समाजदृष्ट्या विघातक आहेत. ह्याने जातीचेही कल्याण होणार नाही व समाजाचेही कल्याण होणार नाही. आजच्या तात्कालिक स्वार्थासाठी मात्र निरनिराळ्या जातींचे लोक एकत्र आलेले दिसतात. एखाद्या धाडसी दरोड्यांतील आरोपींची नावे वाचली तर ब्राह्मण, मराठे, महार, मुसलमान वगैरे निरनिराळ्या जातीचे लोक एकत्र दिसतात. तसेच निवडणुकीच्या धामधुमीत पक्ष उभे करताना तो सर्वमान्य आहे हे दाखवण्याच्या खटपटीत निरनिराळ्या जातींच्या लोकांची नावे दिसतात. पण दरोड्याच्या लुटीचे वाटे करण्याची वेळ आली किंवा इलेक्शन आटोपल्यावर मंत्री उपमंत्री नेमण्याची वेळ आली की, हा जातीवाद ऐक्याचा देखावा मृगजळाप्रमाणे विरून जातो व सहानुभूतिशून्य रखरखीत तापलेले, भडकलेले समाजजीवन मात्र खाली उरते. समाजातील घटक एकमेकांवर अवलंबून आहेत याचा अर्थ ज्या वेळी सर्व घटकांची ऊर्जितावस्था येईल, ज्या वेळी सर्व घटक सहकार्याने राहतील त्याचवेळी भरभराटलेले संस्कृतिसंपन्न समाजजीवन शक्य होईल, एरवी नाही.
सामाजिक समता
आमची संस्कृती / ९९
निग्रो लोकांना निग्रोपणाची चीड येत नाही तर निग्रो म्हणून मिळणाच्या सामाजिक वागणुकीचा त्यांना संताप येतो. वरच्या जातींना ह्या चिडीची कल्पना यावयाची नाही. पण आपल्या सुदैवाने आपणावर अशी एक राष्ट्रीय आपत्ती कोसळली होती की, ह्या अन्यायाची थोडीशी चुणूक आपणा सर्वांना दिसली असेल. इंग्रजांच्या राजवटीत काही क्लबांवर, काही कंपन्यांच्या आवरात, हिंदी माणूस व कुत्रे यांना मज्जाव (Indians & dogs not allowed) अशा त-हेच्या पाट्या असत. आपल्या भूमीवर आपल्याला अशी वागणूक मिळावी म्हणून सर्व देशभक्तांचा संतापाने भडका उडे, पण अगदी अशीच वागणूक आपण आपल्या देशबांधवांना देतो हे त्यांच्या ध्यानी येत नसे व अजूनही येत नाही. मनुष्यगणनेत जातींची नावे गेली. कायद्याने सर्व जातींना समानता दिली, पण खेड्यापाड्यांतून, मंदिरे, विहिरी, आखाडे, चावडी ह्या ठिकाणी सर्वांना प्रवेश मिळतो का? ह्या सर्व ठिकाणी कुत्री व गाढवे जाऊ शकतात. पण काही जातींतील माणसांची तेथे जाण्याची छाती नाही. ही झाली सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतींतील विषमता. अगदी अशीच विषमता संपत्तीच्या बाबतींतही दिसते. पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संशोधन संस्थेने गेल्या पंधरा वर्षांत महाराष्ट्रातील काही शहरे व बरीचशी खेडेगावे ह्यांची आर्थिक पाहणी केली. त्यात त्यांना दिसून आले की, सुस्थितीच्या बाबतीत श्रेष्ठ, कनिष्ठ अशी वर्गवारी केल्यास ब्राह्मण-मराठे-व महार असा क्रम लागतो. काही मराठा घराणी सधन असतील. काही महार काही मराठ्यांपेक्षा खाऊन पिऊन सुखी असतील. पण एकंदर सबंध जातीचा विचार केला तर, ब्राह्मण व तत्सम जाती मराठे व तत्सम जातींपेक्षा व मराठे आदि जाती अस्पृश्यांपेक्षा राहणीच्या मानात वरचढ आहेत. जेथे समाजाचे मोठाले घटक अशा विषम परिस्थितीत आहेत तेथे एकमेकांविषयी प्रेम व बंधुभाव नांदणे शक्य नाही.
सामाजिक समता व विषमता हे शब्द आपण वारंवार उपयोगितो. पण त्याचा अर्थ व व्याप्ती काय हे पुष्कळदा समजत नाही. सामाजिक समता म्हणजे समाजातील प्रत्येकाचे उत्पन्न सारखेच असले पाहिजे असे नव्हे. कारण जरी राष्ट्रीय संपत्तीची अशी वाटणी केली तरी थोड्याच अवकाशात व्यक्तींच्या स्वभावानुसार व कष्टांनुसार त्यांत फरक होईल. ज्या समाजात १०० / आमची संस्कृती
आमची संस्कृती / १०१
येण्यासारखीसुद्धा स्थिती नसली म्हणजे वाईट वाटते व विषमतेविरुद्ध संताप येतो. वरील समाजांतून गरिबाला शिक्षण वगैरे मिळून वर येण्यास संधी मिळते म्हणजे आजचा गरीब उद्याचा श्रीमंत होतो व दर पिढीस नव्याने परिश्रम न केल्यास कालचा श्रीमंत आज कंगाल होतो. अशा त-हेची समाजव्यवस्था होणे आपल्या समाजात अत्यावश्यक आहे. त्याशिवाय समाजात एकोपा, प्रयत्नशीलता व शांती नांदणार नाही. अशी व्यवस्था राजकीय सत्तेने केली पाहिजे, एकट्या, दुकट्या समाजसेवकाचे हे काम नव्हे. ती करताना परस्परद्वेषाचा फैलाव होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे. पण आपली सध्याची स्थिती विषमतेच्या इतक्या पराकोटीला गेली आहे की, वर सांगितलेल्या प्रकारांनी सामाजिक समता स्थापण्याचे प्रयत्न निकडीने झाले पाहिजेत. तसे झाले नाही तर सामाजिक व राजकीय क्रांती ह्यांच्या आगीत किती जीवांचा बळी पडेल ते सांगवत नाही. माझा पिंड स्त्रीचा आहे. सृजन, संगोपन व संवर्धन ही भाषा मला कळते व पटते. पण क्रांतीच्या नावाखाली चाललेला बेफाट प्रचार आणि संहारक मार्गाचा उपदेश मला पटत नाही, संहारातून जीवनाची मूल्ये निष्पन्न होतील असे वाटत नाही. सामाजिक पुनर्रचना समतेच्या पायावर तातडीने न झाल्यास मात्र तेच आपल्या नशिबी आहे हे निश्चित.
समाज व व्यक्ती
समाजाच्या घटकांचे परस्परावलंबन कसे असते हे पाहून आता व्यक्ती व समाज ह्यांचे परस्परसंबंध कसे असावे हे थोडक्यात सांगते. आपल्या समाजात ज्याप्रमाणे निरनिराळे घटक एकमेकांविषयी बेफिकीर आहेत. त्याचप्रमाणे व्यक्तीही आपल्याला अगदी साधीसुधी तरी सामाजिक कर्तव्ये आहेत हे विसरून गेली आहे. स्वत: अगदी स्वच्छ राहिले, आपले घर झाडून लोटून साफ ठेवले व मग घरातील सर्व घाण रस्त्याच्या कोप-यात टाकली किंवा म्युनिसिपालिटीच्या डब्यात नीट न टाकता लांब उभे राहून, एक हात नाकाला लावून भिरकावून दिली. तर त्या स्वच्छतेचे काहीही फळ मिळणार नाही. ह्या घाणीत वावरणाच्या माशा, डांस सर्व रोग घेऊन तुमच्या घरात पायाच्या धुळीबरोबर किंवा वाच्याबरोबर येणारच. तेव्हा फक्त एकाने श्रीमंत असून जशी समाजधारणा १०२ / आमची संस्कृती
होत नाही, तसे एकाने स्वच्छ राहून आरोग्य वाढत नाही. सर्वांनी मिळून स्वच्छता पाळली पाहिजे. सर्वांची मालमत्ता ही कोणाचीच नव्हे अशी वृत्ती ठेवून चालणार नाही. रस्त्यावर लावलेली झाडे सर्वांच्या मालकीची, त्यांना पाणी घातले नाही तर निदान खच्ची तरी करू नये; शाळा, चावडी, वसतिगृहे सर्वांची; ती झाडली नाहीत तर निदान थुकून, रेघोट्या ओढून, मोडतोड करून त्यांची नासधूस करू नये. चालण्याचा रस्ता सर्वांचा, निदान आपल्याबरोबर इतरही त्या रस्त्याने जात येत आहेत, त्यांची पण सोय पाहावी एवढ्या साध्यासुध्या गोष्टीसुद्धा आज आपणाला कळेनाशा झाल्या आहेत. एका व्यक्तीच्या क्षुद्र क्षणिक गरजेसाठी पुढील पिढ्यांची आपण किती कुचंबणा करतो हे रस्त्यावरील छायेची झाडे चोरून तोडणा-याला, शाळा कॉलेजातील पुस्तकांतील पाने फाडून नेणा-यांना, जेथे कळत नाही तेथे स्त्रियांची बेअदबी होईल असे वर्तन करू नये, थोडक्या भांडणासाठी तट पाडून सबंध गाव बिघडवू नये हे कसे कळणार?
जेथे जेथे सरकारने असे करावे असे आपण म्हणतो तेव्हा, माझ्या हातून अमके झाले पाहिजे हे विसरतो. सरकारने आटोकाट प्रयत्न केले तरी प्रत्येक व्यक्तीने निष्ठेने त्यास हातभार लावला पाहिजे. समता व सुसंस्कृत जीवन निर्माण होण्यासाठी संपत्तीची निर्मिती, योग्य वाटप व सर्वांनी मिळून जतन आवश्यक आहे. तसेच कितीही संपत्ती निर्माण केली तरी प्रजा जर अविरतपणे वाढतच राहिली तर अपुरीच पडणार. सार्वजनिक स्वच्छता व औषधोपचार ह्यांनी मृत्यूला बंध घातला आहे. पाटबंधारे, सडका, रेल्वे वगैरेंनी उत्पादन व ने-आण सुलभ झाल्याने दुष्काळ नावाच्या मृत्यूला शह दिला आहे. अशा वेळी जननालाही बंध पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने व कुटुंबाने आपल्याला किती मुले झेपतात व कितीच भरण-पोषण नीट त-हेने होईल हा विचार करूनच कुटुंबाचा विस्तार केला पाहिजे व अशा त-हेने नव्या समाजाच्या रचनेला मदत केली पाहिजे.
- १९५४