आमची संस्कृती/भारतातील वन्य समाज
=== ४. भारतातील वन्य समाज ===
भारतातील एकंदर लोकसंख्या ३६,११,५१,६६९ (छत्तीस कोटी, अकरा लक्ष, एकावन्न हजार, सहाशे एकूणसत्तर) इतकी आहे (१९५१). त्यांपैकी शेकडा १७.३ टक्के शहरांत व शेकडा ८२.७ टक्के म्हणजे २९,८६,७२,४३० (एकोणतीस कोटी, शहाऐंशी लक्ष, बहात्तर हजार, चारशे तीस) ग्रामीण विभागांतील आहे. ह्या ग्रामीण विभागापैकी २,२५,११,८५४ (दोन कोटी, पंचवीस लक्ष, अकरा हजार, आठशे चौपन्न) रानात राहणारे * आदिवासी आहेत. म्हणजे १९५१ साली भारतातील लोकसंख्येत शेकडा पाच लोक आदिवासी किंवा वन्य म्हणून गणले गेले. ग्रामीण जनतेच्या मानाने हे प्रमाण ८ टक्क्यांपेक्षा थोडे जास्त आहे.
आदिवासी सर्व भारतभर सर्व प्रांतांतून सारख्या प्रमाणात विखुरलेले नाहीत. काही प्रांतांतून आदिवासी जमाती अत्यल्प प्रमाणात आहेत; पंजाब व उत्तर प्रदेशच्या सपाट मैदानात ते जवळजवळ नाहीत. केरळ, मद्रास, म्हैसूर ह्या प्रदेशांतून त्यांची संख्या दीड लाखांच्या आतच आहे.
- मुंबई येथील जी.एस.घुर्ये ह्यांचे या विषयावरील Aborigines, so-called and Their future— Poona 1943 हे पुस्तक जिज्ञासूंनी वाचावे. आंध्र, आसाम, बिहार, मुंबई, मध्यप्रदेश, ओरिसा, राजस्थान व पश्चिम बंगाल या प्रदेशांतून ती १५ ते ३९ लाख आहे. प्रांताप्रांतातून संख्या वेगवेगळाली आहे एवढेच नव्हे, तर इतर लोकसंख्येशीही त्याचे प्रमाण भिन्न भिन्न आहे.
केरळात आदिवासींचे प्रमाण शेकडा १ टक्का, आंध्रात ३ टक्के, मुंबई प्रांतात ८ टक्के, बिहारात १० टक्के, आसामात व मध्यप्रदेशात प्रत्येकी १९ टक्के व ओरिसात २१ टक्के असे आहे.
भाषांची परस्पर-दुर्बोधता
वन्येतर भारतात जी प्रमुख भाषाकुले सापडतात ती वन्यांच्या बोलींमध्येही सापडतात, हे या लेखाच्या शेवटी दिलेल्या निरनिराळ्या प्रांतातील मुख्य वन्य जमाती व त्यांची वसतिस्थाने यासंबंधीच्या माहितीवरून दिसून येईल. ज्याप्रमाणे एका भाषा-कुलातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या वन्येतर भारतीयांना एकमेकांचे बोलणे कळणे अवघड जाते तसेच वन्यांच्या बाबतीतही होते. भिली भाषा कातकऱ्यांना किंवा वारल्यांना कळत नाही, त्याचप्रमाणे सोलेगा, चेंचू, मालपंटारम व कादर ह्यांच्या भाषा परस्परांना अनाकलनीय आहेत. तोच प्रकार उरांव, गड, कोलाम व खोंड लोकांत व मुंडा, संथाळ, बोंडो व खासत आहे. हिंदी, उडिया, मराठी, बंगाली ह्या भाषा जशा निरनिराळ्या, तशाच एकाच कुलांतील वन्य भाषाही निरनिराळ्या आहेत. लिखित वाड्याची परंपरा अजिबात नसल्यामुळे व निरनिराळे समाज दूरदूर राहत असल्यामुळे भाषांची परस्पर-दुर्बोधता वाढलेली आहे.
आचारविचारांतही विविधता
ही विविधता भाषेतच आहे असे नव्हे तर इतर आचारविचारातही भरपूर प्रमाणात आढळते. काही वन्य जमार्तीत पितृप्रधान कुटुंबसंस्था आहे; तर काहींत मातृप्रधान कुटुंबसंस्था आहेत. काही बहुपत्नीक, तर काही काही जमाती बहुपतिक आहेत. काहींमध्ये उच्चनीच कुळी आहेत तर काहींत समानता आहे. काही जमातींत तर अस्पृश्यतासुद्धा आढळते. उदा. गोंड व परधान, परधान हे गडांचे आश्रित व अस्पृश्य गणले जातात. कम्मरा ही जमात कोयांशेजारी राहते व अस्पृश्यासारखी गणली जाते. बहुतेक जाती निकृष्ट तऱ्हेची शेती करतात (चेंचू, बोंडो, हो, भिल्ल). काही उत्कृष्ट शेती करतात (मुंडा, खोंड, संथाळ, वारली, कोया वगैरे). एखाददुसरी पशुपालन करते. निलगिरीतील तोडा म्हशी बाळगतात, शेती बिलकुल करीत नाहीत. बहुतेक सर्वच वन्य जमाती शिकारीत व जनावरांचा माग काढण्यात निष्णात असतात. हिंदू संस्कृतीची दाट छाया, त्यांची भाषा, संस्कार व चालिरीती ह्यांवर पसरलेली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या संस्कारांची व आचारविचारांची छाया हिंदू संस्कृतीवर पसरलेली आहे.
सरकारी व्यवस्थेचे स्वरूप
वन्यांच्या विकासासाठी व संरक्षणासाठी आपल्या घटनेत काही खास योजना केलेल्या आहेत. कित्येक कोटी रुपये विकासासाठी वेगवेगळे ठेवलेले आहेत. केंद्रीय लोकसभेत त्याचप्रमाणे निरनिराळ्या राज्यांच्या सभेत त्यांच्यासाठी खास राखीव जागा ठेवल्या आहेत. सर्व भारतभर वन्यांसाठी ज्या सोयी केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी नीट होते की नाही ते पाहून त्यांच्या परिस्थितीचे वृत्त दरवर्षी राष्ट्राध्यक्षांना सादर करावे लागते. हे सर्व करण्यास एका खास अधिकाऱ्याची नेमणूक झालेली आहे. त्याच्या हाताखाली संबंध भारतासाठी पाच प्रादेशिक अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. ह्याशिवाय एक मध्यवर्ती व दर राज्यात एक ह्याप्रमाणे वन्य व मागासलेल्या जमातीच्या उन्नतीसाठी मंडळे आहेत. प्रत्येक राज्यात मागासलेल्या जमातींच्या कल्याणासाठी एक निराळा अधिकारी व त्याच्या हाताखाली बरेच दुय्यम अधिकारी असतात. आसाम व त्रिपुरामधील काही प्रदेश राज्यांतून तोडून खासे केंद्राच्या ताब्यात ठेवला आहे व केंद्रातर्फे तेथील सर्व राज्यकारभार चालतो. पूर्वी वन्यांचा प्रदेश त्या त्या प्रांतांच्या गव्हर्नराच्या खास देखरेखीखाली असे व राज्य-विधान सभेत त्याबद्दल काही करता येत नसे. आता ती परिस्थिती बदललेली आहे व साधारपणे जो वन्य प्रदेश ज्या भाषिक राज्यांत येतो त्या भाषिक राज्यात तेथील वन्य जमाती व प्रदेश घालण्यात आला आहे. त्याला काही अपवाद आहेत ते पुढे पाहू.
उणीवा व खाचखळगे
वन्यांसाठी व मागासलेल्यांसाठी जी खास तरतूद केली आहे ती योग्यच आहे; पण त्यात काही उणीवा व काही खाचखळगे राहिलेले आहेत.
मुख्य उणीव म्हणजे वन्य व वन्येतरांचे संबंध काय आहेत, भारतात वन्यांचे स्थान काय करावे वगैरे मूलभूत प्रश्नांवर ठाम विचार झालेला नाही. दुसरे म्हणजे वन्य व मागासलेले कोणाला म्हणावे हा बिकट प्रश्नही अजून नीट सुटलेला नाही. ह्या मूलभूत प्रश्नांवरील गोंधळामुळेच इतर. गोंधळ निर्माण झालेले आहेत.
वन्य-वन्येतरांचे संबंध
युरोपीय लोक १५ व्या ख्रिस्त शतकापासून जगाच्या निरनिराळ्या भागांत पसरले तेव्हा पहिल्याने त्यांचा वन्य लोकांशी संबंध आला. गोरी कातडी, कापड कापून, बेतून शिवलेले अंगभर कपडे, झपाट्याने वाढत जाणारे विज्ञान व यंत्रयुगाची सुरुवात व सर्वांत वर कडी म्हणजे विजिगीषु, असहिष्णु, एकेश्वरी पंथ, ह्यामुळे युरोपियांना वन्य जमाती आपल्यापासून सर्वथा भिन्न व नीच पायरीवर आहेत असे वाटले; कित्येक युरोपियाना पारध करून सबंध जमातीच्या जमाती नष्ट करून टाकल्या. ज्या काही उरल्या त्यांना आपल्या धर्माची फक्त दीक्षा दिली; पण इतर बाबतीत त्यांना युरोपीय समाजापासून अलिप्त ठेवले. युरोपियांचे जेव्हा वन्यांवर आक्रमण झाले तेव्हा युरोपीय आक्रमक व वन्य ह्या दोन समाजांच्या संस्कृतीत फार मोठे अंतर होते. दोन्ही जगाच्या निरनिराळ्या भागांत अलिप्तपणे राहत होत्या. एक समाज भौतिक संस्कृतीत व ज्ञानात झपाट्याने पुढे गेलेला होता तर एक अश्मयुगीन संस्कृतीत स्थायिक होता. त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा दोघांमध्ये एका मानव्याखेरीज काही समान नव्हते व वन्य मानवच आहेत हेही पहिल्या आक्रमकांना बरेचदा मान्य नव्हते. ह्याउलट पतामधील वन्य-वन्येतरांचे संबंध गेल्या तीन हजार वर्षांचे तरी निदान आहेत. === दुर्लघ्य भेदच नाहीत ===
आर्यांच्या पशुपाल टोळ्या जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्यांना ठिकठिकाणी पसरलेले अनार्य लोक भेटले. ह्या अनार्यांचे संस्कार, राहणीची पद्धती, रूप वगैरे आर्याहून भिन्न होते. संस्कृतीने अनार्य आर्यांपेक्षा कमी होते असे म्हणण्यास काही पुरावा नाही. आर्यांच्याजवळ पशू व चाके असलेली वाहने होती. शेती करणाच्या स्थायिक लोकांवर धाड घालून त्यांचा पराभव करणे पाठीवर बिऱ्हाड असलेल्या भटक्या टोळ्यांना शक्य झाले. आर्य-अनार्यांचा संघर्ष पिढ्यानपिढ्या चालत आला असला पाहिजे. या संघर्षातच संस्कृतिसंगमाची बीजे होती; शरीरसंकराचीही होती. या कालांत भव्य नवी संस्कृती निर्माण होत होती व त्या निर्मितीत आर्य व अनार्य या दोघांचाही भाग होता. आर्य भाषा इतरांचे बरेच शब्द घेऊन उत्तर भारतात सर्वांची भाषा बनली. आर्यांच्या जुन्या देवांपैकी काही नष्ट झाले. काहींचे नामरूप बदलले व काही अगदी नवी दैवते भारतीय धर्मात शिरली. शिस्नदेवा: म्हणून ज्या पूर्वेच्या लोकांची ऋग्वेदात अवहेलना आहे त्यांचाच देव शंकर म्हणून भारताचे एक आवडते व पूज्य दैवत होऊन बसले. तांदूळ हे अनार्याचे धान्य भारतीयांचे आवडते खाद्य झाले. वेदांत न सापडणाच्या स्वर्ग, नरक व पुनर्जन्म या कल्पना धर्माच्या आधारस्तंभ झाल्या. आर्यअनार्याचे पूर्ण मिश्रण झाले, पण काही लोक आर्यांच्या उपद्रवापासून जरा दूर-दुर्गम डोंगरांत वा जंगलांत जाऊन राहिले. त्यांनी आपली स्वतंत्रता टिकवली, पण ते सांस्कृतिकट्या मागासलेले राहिले. तरीही त्यांच्या जंगलात ब्राह्मण, जैन व बौद्ध लोकांचा प्रवेश होत होता; व इकडच्या कल्पना तिकडे जात होत्या. अशा परिस्थितीत भारतीय वन्य समाज हा वन्येतर भारतीयांपासून दुर्लंघ्य सांस्कृतिक भेदाने विभागलेला आहे असे म्हणणे व त्या आधारावर वन्यांना इतर भारतीयांपासून वेगळे ठेवणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करणे आहे.
वन्येतर भारतीयांमध्ये असे कितीतरी लोक आहेत की ज्यांची सांस्कृतिक पायरी वन्यांपेक्षा खात्रीनेच वरची नाही. तेही निर्वस्त्र, निरक्षर, निर्धन जीवन जगत आहेत. वन्य जमाती व त्यांचा प्रदेश हे सर्वस्वी भारतीय आहेत व इतर भारतीयांशी त्यांचे जीवन जितक्या लवकर निगडीत करता येईल तितके वन्यांचे व वन्येतरांचे कल्याण होईल.
एकत्र करण्याचा उपदव्याप
भारतीय इतिहासात कित्येक मोठमोठ्या जमाती दूरदूरवर पसरलेल्या आढळून येतात. त्या आता आपापल्या प्रांतांशी समरस झालेल्या आहेत. फक्त नावामुळे किंवा ऐतिहासिक संशोधनाने त्यांचे मूळ ठिकाण काय ते कळून येते. त्या जमातींना एकत्र करावे व त्यांच्या पूर्वकालीन एकतेची जाणीव त्यांना करून द्यावी असे कोणीही आज म्हणणार नाही. एवढेच नाही तर ती एकात्मता आता येणेही शक्य नाही. स्वत:ला अहिर म्हणवणाच्या जाती काठेवाडपासून तो तहत बिहारपर्यंत पसरलेल्या आहेत. असिरगड (अहिरगड), ग्वालगड, अहिराणी भाषा वगैरे गोष्टी, त्यांचे एके काळचे वैभव व वर्चस्व दाखवतात. तीच गोष्ट 'गुजर' ह्या जमातीची; तीच कथा स्वत:स कायस्थ म्हणवणाच्या जातीची. ह्या जमाती कधीकाळी एके ठिकाणी असतील पण आज मात्र ज्या प्रांतात आहेत तेथील भाषा व संस्कृती त्यांनी आत्मसात केली आहे. हाच प्रकार बहुप्रांतिक गोंड व भिल्ल लोकांचा आहे. असे असताना मांडला वगैरे जिल्ह्यांतले गोंड बस्तार गोंडांना जवळ आणण्यासाठी मध्यप्रदेशाच्या सीमा वाढवून थेट तेलंगणापर्यंत नेऊन भिडवणे म्हणजे गोंडांचे कल्याण साधणे नसून तेलंगण महाराष्ट्राचे नाक कापून भारतास धोक्यात घालणे आहे. आज खानदेशातील भिल्लाला महाराष्ट्राचा व मराठीचा अभिमान वाटतो. गुजराथी भिल्लाला गुजरातबद्दल वाटतो. म्हणजे भिल्ल ही त्या त्या प्रांतातली एक जमात झाली आहे व तिचे संरक्षण व कल्याण करण्याची जबाबदारी त्या त्या प्रांतांवर पडली. गोंडांच्या बाबतीतही तेच व्हावयास पाहिजे. गोंड नावाची जमात मध्यप्रदेशात आहे, महाराष्ट्रात आहे, तेलंगणात आहे, ओरिसात आहे, ही माहिती मानवशास्त्राच्या अभ्यासकाला होती, पण गोंडांना नव्हती व ती असावयाचे कारणही नाही. जे ते गोंड आपापल्या प्रदेशांत राहत होते, सोयरीक करीत होते, प्रादेशिक भाषा आत्मसात करीत होते, पण गोंडांचे कैवारी म्हणवणाच्या काही लोकांनी त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. हैदराबादी राज्यांत मराठी लोकांना उर्दूत शिकावे लागे पण गोंडांसाठी गोंडी भाषेत पुस्तके लिहिली गेली; व ती शिकण्यासाठी शाळा स्थापल्या गेल्या. मुंडा प्रदेशातील मिशनच्यांनी हाच उपदव्याप करून मुंड लोकांना एकतेची नव्याने जाणीव प्रांतिक संस्कृतीत सामावून घ्या
शक्य तितक्या लवकर सर्व दृष्ट्या त्यांना इतर भारतीयांबरोबर आणणे इष्ट आहे. त्यांच्यावर सावकार, जमीनदार वगैरेंचे आक्रमण होऊ नये, सरकारी अधिकारी व जंगल कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून त्यांना उपद्रव पोचू नये, म्हणून जी दक्षता घ्यावयाची ती दक्षता सर्वच निरक्षर मागासलेल्या जमातींच्या बाबतीतही घ्यावयाची असल्यामुळे, इतर लोककल्याणाची जी खाती आहेत त्यांतच त्यांच्या खात्याचाही समावेश व्हावा. गोंड, भिल्ल, उराव, कोया वगैरे संख्येने मातबर असलेल्या जाती तीन चार भाषिक प्रांतांतून विभागलेल्या आहेत. गोंडी, भिली, कुरुख व कुयी अशा चार भाषा हे लोक बोलतात व त्याशिवाय प्रादेशिक भाषाही उत्तम बोलतात. गोंड मध्यप्रदेशात हिंदी बोलतात, नागपूर प्रांतात व पश्चिम आदिलाबाद जिल्ह्यात मराठी बोलतात, तेलंगणाच्या भागात तेलगू बोलतात. बस्तारमध्ये मुख्यत्वेकरून गोंडी बोलतात. भिल्ल प्रांतपरत्वे गुजराथी, राजस्थानी व मराठी भाषा बोलतात. उराव कुरुखखेरीज हिंदी व उडिया बोलतात. तीच गोष्ट कोयांची, मुंडांची व खोंडांची. एका जमातीची भाषा दुसरीला येत नाही, इतकेच नव्हे तर वन्य जमातींना एकमेकांचे अस्तित्वहीं माहीत नाही. या सर्व भाषा निरक्षर आहेत. म्हणजे त्यांना लिपी नाही व लिहिलेले वाङ्मय नाही. अशा परिस्थितीत ज्या ज्या प्रांतांच्यामध्ये किंवा शेजारी वन्य येतील त्यांत त्यांना समाविष्ट करून त्या त्या प्रांतिक संस्कृतीत त्यांना सामावून घेणे हाच मार्ग योग्य दिसतो. पण सरकारचे धोरण या बाबतीत निश्चित असे काही ठरलेले नाही. कुठल्या एका विशिष्ट तत्त्वावर त्या प्रश्नाचा विचारच झाला नाही. जुने युरोपीय शास्त्रज्ञ भारतीय परिस्थिती न कळल्यामुळे किंवा दुसऱ्या काही हेतूने जे म्हणत आले त्याला अजूनही आपले सरकार काही अंशाने चिकटून आहे. युरोपीय शास्त्रज्ञांच्या म्हणण्याचा सारांश असा की, वन्य हे वन्येतरांपासून वेगळे व अलिप्त ठेवले पाहिजेत. सुदैवाने हा विचार हल्लीच्या राजवटीत तितक्या जोरात कोणी उच्चारीत नाही, पण वन्यविषयक धोरण मात्र बघऱ्याच प्रमाणात त्या विचारप्रणालीचे द्योतक वाटते. 'मागासलेले' म्हणून मान्यता (!) मिळवण्याची धडपड करते. उत्तर आंध्रात 'वेलमा' म्हणून शेतकरी व जमीनदार वर्ग आहे. त्यांच्या निरनिराळे पोटभेद होते व आहेत. ह्यांपैकी 'कोप्पल वेलमा' म्हणू जंगलपट्यात राहणारी जात 'मागासलेली' म्हणून मानली गेली व आता इतर वेलमा जाती नष्ट होऊन 'कोप्पल वेलमा' एवढीच एक जात त्या विभागात राहिली आहे.
दुमजली घरे असलेल्या, इंग्रजीत अस्खलित बोलणाऱ्या, सोन्याचं बटणे व रिस्टवॉचेस असलेल्या हायस्कुलात शिकणाच्या मुली ज्यांच्या घरी आहेत अशा 'कोप्पल वेलमांच्या शहरी घरांतून मी गेल्या वर्षी हिंडून आले व त्या सर्वांनी आम्ही मागासलेले' असूनही शाळा फी माफ होत नाही म्हणून खेद व्यक्त केला!
निरनिराळ्या जमाती आम्हांला मागासलेले' म्हणा म्हणून विनंती करतात तर पुढारलेल्या समजलेल्या जमातींच्या पोटांत खरोखर मागासलेल्या (कुंभार, कोळी, घिसाडी, बुरूड इत्यादी) किती तरी जाती आहेत की, त्यांची बिचाराऱ्यांची कोठे दादही लागत नाही.
कोट्यवधी रुपये कसे खर्च होतात?
वन्यांसाठी निराळा कमिशनर, निराळा अंमलदार व निराळा विभाग असे उत्पन्न झाले म्हणजे कित्येकांचे पोट व प्रतिष्ठा त्या विभागाच्या मोठेपणावर व विस्तारावर अवलंबून असते. तो विभाग कधीच नष्ट होऊ नये म्हणून धडपड चालते. इतकेच काय तर शिक्षण, आरोग्य वगैरे विषय त्या त्या मंत्र्यांकडून काढून वन्य व मागासलेल्या जमातीपुरते त्या विभागाच्या अधिकारांत ठेवावे असे म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेलेली मी प्रत्यक्ष ऐकलेली आहे. राज्ययंत्रांत सवतासुभा निर्माण करून हा विभाग म्हणजे एक स्वतंत्र संस्थान बनण्याचा धोका दृष्टीआड करून चालणार नाही. वन्यांसाठी एक स्वतंत्र विभाग केंद्र सरकारचा आहे. केंद्राजवळ पैसे आहेत व ते मिळण्यावर प्रांताची सुधारणा, योजना अवलंबून असते. प्रांतीय ऑफिसरला दर वेळी केंद्रीय पाहणीदारांपुढे उदोउदो कराव लागतो. प्रांताच्या ऑफिसरला एखाद्या खेड्यासाठी वर्षाचे पन्नास रुपरे मिळण्याची मारामार पडते तर केंद्रीय सरकार बन्यांच्या वार्षिव करून दिली. निरक्षर वन्य लोकांना साक्षर करताना त्यांच्या बोलीभाषेपासून सुरुवात व्हावी पण दर वर्षीच्या अभ्यासक्रमात प्रादेशिक भाषेतील शब्द जास्त जास्त प्रमाणात येऊन शेवटी त्यांना प्रादेशिक भाषा उत्तम लिहिता वाचता येण्याची व्यवस्था झाली पाहिजे
आदिवासींच्या मेळाव्याचा धोका
एवढ्यावरच भागले नाही. सरकार दरवर्षी आदिवासी जमातींचा मेळावा भरवते. त्रावणकोरच्या रानापासून तो बिहारच्या जंगलापर्यंतच्या आदिवासींच्या तुकड्या हजारो रुपये खचून ह्या मेळाव्यासाठी आणवल्या जातात व आपण सर्व आदिवासी' इतरांपासून निराळे अशी एक नवीनच भावना त्यांच्यात निर्माण होऊ लागली आहे.
वन्यांच्या मुलखात काम करणारे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी दरवर्षी काही दिवस आपल्यापुढील प्रश्नांचा ऊहापोह करणे आवश्यक आहे; पण त्या वेळी आदिवासींचा मेळावा भरवण्याचे व त्यांच्या नाचगाण्याचे प्रदर्शन राष्ट्रपती किंवा पंतप्रधान किंवा दुसऱ्या कोणापुढे करण्याचे प्रयोजन काय? ही प्रथा इतकी दुष्ट आहे व त्यांतून इतक्या भयानक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे की, ती जितक्या लवकर बंद पडेल तितके बरे.
भारतात मुख्य भाषांचे भाषिक प्रांत झाले की, त्या त्या प्रांतांत आदिवासींना शक्य तितक्या लवकर सर्वस्वी समरस व एकात्म होण्याचे धोरण आखले पाहिजे. गुजराथपासून वेगळा होऊन मराठी भाषिकांचा एक प्रांत व्हावा म्हटले तर त्यामुळे भारताच्या एकतेला तडे गेले म्हणून गवगवा होतो पण जे दूर दूर विभागलेले आहेत, ज्यांना वाङ्मय नाही, ज्यांना लांब लांब असलेल्या बांधवांची जाणीव नाही त्यांना एकत्र आणण्याचा अट्टाहास करणे म्हणजे भारताचे पूर्वी कधीही अस्तित्वात नव्हते असे नवे तकडे पाडण्याची पूर्वतयारीच आहे हे कसे कोणी लक्षात घेत नाही?
'आम्हांला मागासलेले म्हणा'
वन्य मागासलेल्या जमाती कोणत्या, ह्याचा निर्णयही अजून होत नाही. दर वर्षी कित्येक जमाती आम्हांला 'वन्य' किंवा 'मागासलेले' ह्या | वर्गात घाला म्हणून अर्ज करतात. काहींचे अर्ज मान्य होतात; काहींचे नाहीत. काही वेळा एका विभागातील सबंध जमातची जमात आम्ही मेळाव्यासाठी किंवा वन्यांच्या नाचाचा फड दिल्लीला स्वातंत्र्यदिना'च्या दिवशी नेण्यासाठी हजारोंनी रुपये खर्च करते!
वन्यांच्या नावाने जो कोट्यवधी रुपये खर्च होतो, त्यापैकी वन्यांच्या प्रत्यक्ष वाट्याला किती जातो, अधिकाऱ्यांचा फिरतीवर, ऑफिसवर व कल्याण केंद्रातील अधिकाऱ्यांवर किती खर्च होतो, याची पाहणी झाली तर बरे होईल.
केंद्राने हे पैसे प्रांतांच्या स्वाधीन करून अमक्या प्रदेशात अमके करा असे सांगितले तर कदाचित जास्त लाभ होईल.
नव्या भिंती उभारू नका
वन्य हे त्या त्या भाषिक प्रांताचे अविभाज्य घटक आहेत हे धोरण ठेवून त्यांच्या कल्याणाची योजना आखली व वन्य' 'वन्येतर' हा फरक तात्पुरता आहे, तो लवकरच नष्ट होईल असे धोरण ठेवले, तर वन्यांचे, भाषिक प्रांतांचे व भारताचेही अंती हित होईल. ह्या धोरणानुसार वन्यांसाठी शैक्षणिक योजना आखाव्यात. वन्य व वन्येतरांना एकत्र आणण्याचे प्रयत्न शाळांतून व्हावेत. एखादा भिल्ल प्राथमिक शिक्षक असेल तर शहरांतून काम करण्याची त्याला संधी द्यावी. त्यांच्यासाठी ज्या कल्याणकारी योजना आखावयाच्या त्यांत त्यांच्या शेजारी राहणाच्या निर्धन मागासलेल्या लोकांचाही समावेश करावा. वन्यांना दिल्लीला नाचावयास पाठवण्याऐवजी ते व त्यांच्या विभागांतले लोक टोळ्याटोळ्यांनी प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रातून पाठवावेत. खोंड, कोया, मंडा, वगैरे यांना पुरीच्या जगन्नाथाचे दर्शन घडवले; तेथील ओबडधोबड भयानक मूर्तीच्या पायावर त्यांनी डोके ठेवले व तेथील मिष्टान्नाचा प्रसाद त्यांनी आपल्या इतर बांधवांबरोबर खाल्ला म्हणजे वन्येतरांचे देव आपल्या देवांसारखेच आहेत व आपण सर्व एक आहोत ही भावना त्यांच्यात लावेल. भिल्ल, ठाकूरांना पंढरीच्या वारीला पाठवले तर काळा विठोबा आपलाच हे त्यांना ताबडतोब पटेल.
एवढेच नव्हे तर काही दशकांत विद्वान पंडित वन्य, सप्रमाण असेही दाखवू शकतील की, हिंदूची ही पूज्यतम दैवते मूळ वन्यांचीच होती!
वन्यांना भारतसंचारासाठी पाठवायचेच असेल तर एका भाषिक
प्रांतातील वन्य व वन्येतर मुलांचा मेळावा करून त्यांना विशाल भारताच्या दर्शनास न्यावे. प्रांतिक भाषा व संस्कृती या पायरीवरून त्यांना भारतीय बनवण्याचा उद्योग व्हावा. वन्य म्हणून निराळी जमात उत्पन्न करून भारतात नव्या भिंती उभारण्याचा उपक्रम शक्य तितक्या लवकर टाकून द्यावा.
टीप: निरनिराळ्या प्रांतांतील आदिवासींची वस्ती सार्वत्रिक नसून प्रांतांच्या काही विशिष्ट विभागांतच आढळते. बहुतेक करून डोंगराळ जंगली विभागात यांची वस्ती आढळते. निरनिराळ्या प्रांतांतील मुख्य मुख्य वन्य जमाती व त्यांची वसतिस्थाने खालीलप्रमाणे आहेत
आंध्रप्रदेश
१. चेंबू- महबूबनगर व उत्तर कर्नूल जिल्ह्यांतील नल्लमलै डोंगर व तेथीलच कृष्णाकाठची अरण्ये.
२. गोंड (दीड लाख)- आदिलाबाद जिल्हा.
३. कोया.
४. कम्मर- बोरगम पहाड तालुका व भद्राचलम ते जवळजवळ राजमहेंद्रीपर्यंतचा गोदावरीचा प्रदेश.
५. कोंडा रेड्डी- भद्राचलम व बोरगम पहाडमधील गोदातट.
६. सवरा- गुम्मलक्ष्मीपुरम, सीतम पेटा (श्रीकाकुलम जिल्हा.)
७. गदबा.
८. कोंडा दोरा- उत्तर आंध्र व दक्षिण ओरिसा.
९. बोगता- चिंतापल्ली.
१०. यानाडी- मध्य आंध्रात कृष्णेच्या तीरावर समुद्रापर्यंत.
आसाम
१. खासी,
२. सिंटेंग- खासी व जयंती टेकड्या.
३. काचरी- गोलपारा, कामरूप, डारांग, भूतानच्या डोंगराच्या पायथ्याशी.
४. मिकिर- नवगंज व सिवसागर जिल्ह्यांमध्ये मिकिर डोंगर आहेत, त्याच्या उतारावर.
५. नागा जमाती, सेमा, आवो, अंगामी, कोन्याक वगैरे - नागा
टेकड्या. आसामची पूर्वसीमा.
६. मिश्मि- नॉर्थ ईस्ट फ्राँटिअर एजन्सी, मिश्मि टेकड्या; ७,००० फूट उंच.
बिहार
१. मुसाहर- (भुइआपैकी असावेत) उत्तर बिहार, चंपारण, मुझफरपूर
जिल्हे, नेपाळच्या सरहद्दीपाशी. बहुतेक दक्षिण बिहारमधून तिकडे मजूर म्हणून नेलेले असावेत- जसे आसामच्या चहाच्या मळ्यांतून आज लोक जातात त्याप्रमाणे.
२. उरांव (साडेसहा लाख)- गुलाम लोहारडगा, रांची, मुख्यत्वे रांची
जिल्हा.
३. मुंडा (पाच लाख)- दक्षिण रांची, खुटी तालुका.
४. खाडिया- दक्षिण बिहार (नेतरहाटचे डोंगर).
५. अगारिया- सुंदरगड (ओरिसा) आणि दक्षिण रांची (बिहार.)
६. सवरिया पहाडिया आणि,
७. माल पहाडिया- संताळ परगण्यालगतचा डोंगराळ भाग.
८. संताळ (आठ लाखांवर)- संताळ परगणा व त्यालगतचा प्रदेश.
९. हो (साडेतीन लाख)- सिंगभूम जिल्हा, कोलहान.
१०. थारू- चंपारण.
मध्यप्रदेश
१. अगारिया- ओरिसा सीमेजवळ,
२. गोंड- छिंदवाडा, बैतूल, होशंगाबाद, निमाड, रायपूर, मांडला,
माडिया गोंड-बस्तार.
३. हळबा- रायपूर. ,
४.खाडिया- दक्षिण बिहार, उत्तर ओरिसा व लगतचा मध्यभारत.
५. उरांव- सुरगुजा.
६. बैगा- दक्षिण मध्यप्रदेश.
७. कोरवा ऊर्फ कोरकू- मध्यप्रदेश, सुरगुजा.
केरळ
१. कादर- कोचीन.
२. मालपंटारम- त्रावणकोर.
३. येरवा- मलबार.
४. मृदुवन- त्रावणकोर.
पश्चिम बंगाल
१. संथाळ- संथाळ परगण्यांना लागून असलेला प. बंगालचा भाग.
मुंबई
१. भिल्ल (बावीस लाखांवर)- मध्यभारत, राजपुताना, गुजराथ, पश्चिम खानदेश, पश्चिम नगर, औरंगाबाद; थोडे वऱ्हाडात.
२. वारली (एक लाख)- ठाणे जिल्हा व दमण.
३. कातकरी- ठाणे, कुलाबा, पश्चिम पुणे.
४. ठाकूर- ठाणे, पश्चिम पुणे, कुलाबा.
५. कोरकू- एलिचपूर विभागांतील जंगलांत.
६. गोंड- भंडारा, चांदा.
७. परधान- गोंडांच्या शेजारी.
८. कोलाम- चांदा, यवतमाळ.
९. हळबा- भंडारा.
म्हैसूर
१. बेरड- दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक (बेळगाव ते चितळदुर्ग)
२. सोलेगा- मद्रास व म्हैसूर यांच्या सीमेवरील बिलिंगिरिरंगन टेकड्या.
३. बेट्टा कुरबा, आणि
४. जेनु कुरुबा- कुर्ग व दक्षिण म्हैसूर.
५. येरवा- कुर्ग व उत्तर मलबार.
६. तोडा, आणि
७. बडगा- निलगिरी. ओरिसा
१. भुंइया- बिहार, ओरिसा, मध्यप्रदेश.
२. मुंडा- (स्मत लाख)- उत्तर ओरिसा, सुंदरगड.
३. गोंड- (बत्तीस लाख) उत्तर ओरिसा, कोएल नदीच्या उगमाचा प्रदेश.
४. जुआंग- उत्तर ओरिसा।
५. खोंड- (साडेतीन लाख)- दक्षिण व मध्य ओरिसा- कोरापुट, कंधमाळ, फुलबानी, उत्तर आंध्र, मध्यप्रदेश.
६. कोया (दीड लाख)- उत्तर प्रदेश (गोदाकाठ), दक्षिण ओरिसा.
७. सवरा (साडेतीन लाख)- उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण व मध्य ओरिसा, मध्यप्रदेश, दक्षिण बिहार.
८. पोरजा- दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्र.
९. बोंडो- दक्षिण ओरिसा.
आदिवासी किंवा वन्य ही काही एक अखंड सलग जमात नव्हे. त्यांच्यात शंभर दोनशेवर पृथक पृथक जमाती आहेत. सर्व जरी वन्य असल्या तरी त्यांची भाषा, पोशाख, चालिरीती ह्या सर्वांत खूप फरक आहे.
आदिवासी ज्या भाषा बोलतात त्या मुख्यत्वेकरून चार मोठ्या भाषाकुलांत आढळतात. ती भाषाकुले व त्यांतील आदिवासी बोलतात त्या भाषा खालीलप्रमाणे आहेत.
इंडो-युरोपीय भाषाकुल:-भिल्ल (भिल्ली), कातकरी, ठाकूर, वारली.
द्राविड भाषाकुल:- तोडा, बेट्टा, कुरबा, जेनु कुरुबा, सोलेगायेरवा, मृदुवन, मालपंटारम, चेंचू, कादर, गोंड (गोंडी), कोलाम (कोलामी), कोया (कुई), खोंड (खोंडी), उराव व कोरकू (कुरुख), पहाडिया, माल पहाडिया (कुरुख) कोंडा रेड्डी, कोंडा दोरा, कम्मरा.
ऑस्ट्रो एशिआटिक व मॉन ख्मेर भाषाकुल:-बोंडो, जुआंग, मुंबा, गदग, सवरा, संथाळ, हो, खासी, सिटेंग.
टिबेटो-बर्मन भाषाकुल:-मिकिर, मिश्मि व सर्व नागा जमाती.
- १९५७