आमची संस्कृती/ सामाजिक स्थित्यंतर घडविण्यातील व्यक्तीचे कार्य

६४ / आमची संस्कृती





 ६.सामाजिक स्थित्यंतर घडविण्यातील व्यक्तींचे कार्य


 आगरकरांच्या शताब्दीनिमित्त मला बोलावून माझा जो गौरव केला त्याबद्दल आजच्या सभेच्या चालकांचे आभार मानण्याच्या वेळीच,पुण्यात स्त्री म्हणून मला जे शिक्षण मिळाले, वारंवार उत्तेजन मिळाले व आज तुम्हांपुढे उभे राहावयास मिळाले त्यांचे श्रेय बहुतांशी आगरकरांच्या प्रयत्नांना आहे. म्हणून त्यांच्या ऋणाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून,त्यांच्या स्मृतीला आदरपूर्वक श्रद्धांजली वाहून मगच मला काय सांगायचे ते थोडक्यात सांगते.
 आगरकरांचे निबंध वाचल्याला मला पुष्कळ वर्षे लोटली. ह्या वर्षी ते परत हातात घेऊन वाचले. त्यांची विविधता, त्यांतील शुद्ध बालबोध भाषा, त्यांतील ओज, त्यांतील तळमळ, प्रत्येक निबंधातून प्रत्ययास येणारी सत्यप्रियता, निर्भीडपणा व आठवड्यामागून आठवडे,महिन्यामागून महिने, वर्षांमागून वर्षे, लोकनिंदा व उपहास सहन करून लिहिण्यास लागणारी प्रखर कर्तव्यबुद्धी ह्यांची प्रतीती येऊन मन आश्रयचकित झाले, आनंदाने पोट भरून गेले व त्याच वेळी आजच्या महाराष्ट्रातील दुर्दशा मनात येऊन अतोनात खिन्नता वाटली.

 गुलामी मनोवृत्ती आजही कायम

 काही काही सुधारणांबद्दलचा अट्टाहास आज अतिरेकी वाटेल: 

आमची संस्कृती / ६


 उभा राहतो. ह्या पुढा-यांना नि:संदिग्धपणे जाब विचारणे जरूर नाही का? की पक्षभक्तीपुढे सत्यासही हार खावी लागते? ह्या बाबतीत श्री. काकासाहेब गाडगीळांनी काढलेले पत्रक आगरकरांच्या विचारसरणीस धरून आहे व काँग्रेसभक्तांनीही चौकशीची मागणी उचलून धरणे सत्यास व न्यायास धरून होईल. जोपर्यंत असत्य व अन्याय यांविरुद्ध आगरकरांच्या हिरीरीने आपण तुटून पडत नाही तोपर्यंत समाजकल्याण व सर्वोदय कदापि होणे शक्य नाही.

 जनतेचा रोष व उपहास जुमानला नाही.
 आगरकरांच्या पुढेमागे काही वर्षे जन्मलेले लोक त्या वेळी आपापल्या परीने महाराष्ट्राला राजकीयष्ट्या, सामाजिकदृष्ट्या व धार्मिकष्ट्या जागे करण्याचे प्रयत्न करीत होते. अशाच त-हेचे सर्वांगीण आंदोलन बंगालमध्ये पण होत होते. बंगालमध्ये धार्मिक सुधारणेची चळवळ जास्त यशस्वी होऊन ब्रह्मो समाजाची स्थापना झाली; पंजाबमध्येही दयानंदांनी आर्य समाजाची स्थापना केली. बंगालमधील बहुतेक सुधारक ह्या नव्या पंथाचे झाले. महाराष्ट्रात मात्र सुधारक म्हणून ज्यांची नावे प्रामुख्याने पुढे येतात असे लोकहितवादी, आगरकर, कर्वे वगैरे मंडळी नवधर्मसंस्थापनेपासून सर्वस्वी अलिप्त राहिली. त्याचा परिणाम असा झाला की, हे लोक- म्हणजे लोकहितवादी व आगरकर, लिहिताना, ‘आम्ही हिंदू लोक' असे प्रथम पुरुषी लिहित, व जळजळीत झोंबणारी टीका स्वत:च्याच समाजावर करीत. अशा त-हेचे व इतके अव्याहत लिखाण समाजसुधारणेबाबत दुस-या कोणत्याही प्रांतात झालेले नाही. केसरीमधील राजकीय लेख व सुधारकामधील सामाजिक लेख समाजाची झोप, आळस व उदासीनता नाहीशी करीत होते, बिचा-या महाराष्ट्रीय हिंदू समाजाला क्षणाची उसंत मिळू देत नव्हते. सबंध पणे सुधारकाने आज कशावर बरे शस्त्र उपसले, म्हणून उत्सुक होते. समाजाची सदसदविवेकबुद्धी जागी करण्यासाठी त्यांची धडपड व त्यांचा दीर्घोद्योग हे, त्यांचे स्वदेशप्रेम व आशावादी वृत्ती ह्यांचे द्योतक आहे.
 'यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं नाचरणीयं नाकरणीय।' हे वचन त्यांच्या लेखांतून दोन-तीनदा आले आहे ते त्याज्य म्हणूनच. एकदा मनाला ६६ / आमची संस्कृती
विचार करून पटले म्हणून नव्हे, तर बरेचसे प्रतिष्ठित लोक करतात म्हणून.आमची गुलामाची मनोवृत्ती जशीच्या तशी कायम आहे. पूर्वीचे गुलाम एका मालकामागून जात होते, आम्ही दुसच्या मालकामागून जात आहो. पूर्वीचीच आमिषे निराळ्या नावाने आजही आम्हांला झुलवीत आहेत.

 पक्षभक्तीपुढे सत्यासही हार खावी लागावी?
 आगरकरांची विचारसरणी किती तर्कशुद्ध होती हे त्यांच्या पुढील वाक्यांवरून दिसून येईल. कोणी किती व कसले अन्न खावे, घरात राहावे, कोणत्या प्रकारचे कपडे वापरावे, कोणता धंदा करावा, दानधर्म किती करावा, कोणते खेळ खेळावेत, कशा प्रकारचा व्यायाम करावा वगैरे गोष्टींचा लोकांशी म्हणण्यासारखा संबंध नाही. अशा गोष्टींत ज्याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. याच्या उलट कोणत्याही मनुष्याशी केलेले करार पाळणे, कोणासही निष्कारण पीडा न देणे, खरे बोलणे, शक्तीनुसार परोपकार करणे, कायदे पाळणे, कर देणे वगैरे गोष्टींत लोकांशी संबंध येतो म्हणून त्या रूढ राजकीय व सामाजिक नियमांस अनुसरून वर्तन करणे जरूर आहे. पण हे नियम ज्याला मान्य नाहीत त्याने काय करावे?... मन:पूतं समाचरेत या मंत्राच्या ख-या अर्थाच्या अनुरोधाने आपले वर्तन चालू द्यावे.'
 ‘सत्यभाषण, प्रामाणिकपणा, व्यवस्थितपणा वगैरे लोकसंमत पण लोकांच्या आचरणात बेताबेतानेच दिसणाच्या गुणांसंबंधाने लोक काय म्हणतील ह्याचा विचार करू नये. धैर्याने असले गुण आपल्या वर्तनात आणून लोकांत त्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 आगरकरांनी वरवरच्या सुधारणा व त्यांचा आंतरिक पाया ह्याचा खोल विचार केलेला होता. आज आंतरिक पायाच ढासळून पडलेला आहे. तेव्हा समाजाची नवी उभारणी करण्याचे मोठे कार्य आपणावर पडलेले आहे आणि त्यासाठी मन व बुद्धी शुद्ध व खंबीर करण्यासाठी आगरकरांच्या लेखांचे मनन आवश्यक होईल. सत्यभाषणाविषयी एकच उदाहरण घेते. महाराष्ट्रीयांनी मुंबईस हिंसक कृत्ये केली असे विधान मोठया पुढा-यांनी निरनिराळ्या सभांतून पुन:पुन: केले आहे. मुंबईत ल याली त्यात मेलेले लोक हिंसक, का मारणारे हिंसक हा प्रश्न मनापुढे ६८ / आमची संस्कृती
एखादी गोष्ट पटली व समाजाला जरी ती पटली नाही तरी त्याप्रमाणे आचरण करणे, त्यासाठी त्याग करणे व ती समाजाला पटवण्याचा वारंवार अप्रतिहत प्रयत्न करणे हे ते आपले कर्तव्य समजत. महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र हा त्यांचा लेख अति वाचनीय व हृद्य झाला आहे. त्यात त्यांनी 'स्नेह दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि।आराधनाय लोकानां मुंचतो नास्ति में व्यथा।।' हे उत्तररामचरितांतील रामाचे वचन उदधृत केले आहे. केवळ लोकप्रिय होण्यासाठी आपल्या सदसदविवेकबुद्धीला पटलेल्या गोष्टी टाकून देण्याचा मार्ग त्यांना बिलकूल पसंत नव्हता. ते म्हणतात‘लोकछंदानुवर्तन (ह्या लेखकास) अशक्य झाले आहे. इतकेच नाही तर लोकांस अप्रिय परंतु पथ्यकारक असे विचार त्यांच्या मर्जीविरुद्ध पुन:पुन: त्यांच्यापुढे आणणे हेच आपले कर्तव्य व जीविताचे सार्थक, अशी त्यांची दृढ़ कल्पना झाल्यामुळे जनसमूहाच्या रोषाचे व उपहासाचे स्थान त्याने आपणास करून घेतले आहे. 'इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार' ही खडतर प्रतिज्ञा करून त्यांनी संबंध आयुष्यभर ती आचरणात आणून दाखविली. अमकी गोष्ट चांगली का वाईट, ह्याचा निर्णयच झाला नाही तर कृती होणे कठीण; पण तो निर्णय होऊनही वाईटाचा प्रतिकार व चांगल्याचा अंगीकार आज आपल्या हातून होत नाही.

 धैर्य, कणखरपणा व झुंजार वृत्ती कोठे गेली?

 त्यांच्या वेळी टिळक काय किंवा आगरकर काय, आपल्या साध्या राहणीचा गाजावाजा करीत नसत. अंत:शुद्धीसाठी जाहिरात देऊन उपास करण्याची गरजही त्यांना भासत नसे. सुधारणा करण्यासाठी कंठशोष करीत असताना काही सुधारकांनी दुर्वर्तन केले म्हणजे लगेच सुधारणा नकोत असे म्हणण्याइतका त्यांचा बुद्धिवाद व ध्येयवाद कच्चा नव्हता. एखादी गोष्ट योग्य व न्यायाची असे समजल्यावर ती अंमलात येण्यासाठी जिवाचा आटापिटा करावयाचा एवढे त्यांना माहीत होते. अमका असे वागला- दे आपले प्रयत्न सोडून, तमक्याने वाईट वर्तन केले, कर उपास, अशा त-हेने मूळ मुद्याशी संबंध नाही अशा गोष्टी पुढे करून ते ध्येयापासून दूर गेले नाहीत. ती माणसे ध्येयाने वेडीपिशी झाली होती. त्यांना स्वत:च भान राहिले नव्हते. दुर्दैवाने हल्ली आम्ही तसे नाही. स्वत:चे, स्वत:च्या 

आमची संस्कृती / ६९

 कुटुंबाचे, स्वत:च्या अधिकारयोगाचे आम्हांस इतके भान आहे की, कोणतीही गोष्ट करताना क्षणभरही आम्ही स्वत:स विसरत नाही.
 'इष्ट वाटेल ते बोलेन आणि शक्य ते करीन' असे म्हणण्यास आत्मविश्वास दांडगा पाहिजे. मन:पूतं समाचरेत' म्हणताना स्वत:च्या मनाच्या शुद्धतेची व निर्मळतेची स्वत:ला शंका असता कामा नये. मनोमालिन्य व मनोदौर्बल्य ह्या लोकांच्या आसपास नव्हते. मग आज ५० वर्षांनीच आम्ही इतके दुर्बल व भेकड कसे बनलो हे कळत नाही. मोठेपणाची, विशाल वृत्तीची, झुंजारपणाची परंपरा आज कुठे नाहीशी झाली? बुद्धी नष्ट झाली असे वाटत नाही. भाषावार प्रांतरचनेच्या बाबतीत महाराष्ट्रावर अन्याय झाला हे पटण्याइतकी अक्कल सर्वांना आहे; पण त्या श्रद्धेवरहुकूम वागण्याचे धैर्य, कणखरपणा व झुंजार वृत्ती मात्र नाहीशी झालेली दिसते; असे का?
 माणसाला दोन तहेने लढा द्यावा लागतो; परकीयांशी व स्वकीयांशी. परकीयांशी लढा देताना काही लोक धैर्याचे मेरू असतात. स्वकीयांशी, आप्तांशी झगडण्याचा प्रसंग आला की धैर्य गळून जाते. ज्यांच्याशी झगडा करावयाचा ते वयाने मोठे असतात. त्यांचा शब्द प्रमाण मानण्यात सर्व बालपण व तारुण्य गेलेले असते. त्यांच्या आचारविचारांचा कित्ता पुढे ठेवून आपल्या मनाला, वृत्तीला वळण लागलेले असते, त्यांनी भरणपोषण केलेले असते. त्यांनी मोठ्या पदाला चढविलेले असते. भक्ती, प्रेम, अनुयायीपणा वगैरे हजारो नाजूक बंधनांनी माणूस अशा आप्तांशी जखडलेले असते. अशांच्या मनाविरुद्ध जाण्याचा कणखरपणा प्रत्येकाला साधत नाही. महादेव गोविंद रानडे ह्यांनी अशा प्रत्येक प्रसंगी माघार घेतली हे सर्वांना माहीतच आहे. प्रत्यक्ष झगडा करणेच कठीण असते असे नव्हे. तर आपल्या माणसांचे विचार व कृती ह्यांचे योग्य मूल्यमापन करणेही आपुलकीच्या भावनेमुळे शक्य होत नाही. ह्या अनिवार मायेमुळे दृष्टीवर आवरण पडते, सत्यासत्याचा विवेक राहत नाही व मनुष्य अर्जुनाप्रमाणे कथं भीष्मं अहं संख्ये द्रोणं च मधुसूदन।इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजा अरिसूदन' असे म्हणून हीनदीन होऊन राहतो. अशा लोकांचे वर्णन आगरकरांनी उत्कृष्ट केलेले आहे. अशा लोकांना जे दैन्य येते तेच आज महाराष्ट्रातील पुढा-यांना आले आहे. ७० / आमची संस्कृती

 अधिकारशाही विचारस्वातंत्र्य नाहीसे करते
 हे लोक परकी जुलमाविरुद्ध लढावयास वाघ होते. पण स्वकीयांनी केलेल्या जुलमाविरुद्ध लढण्याच्या कामी मिंधेपणामुळे, भीतीने, अत्यादरामुळे म्हणा वाटले तर, त्यांना अवसान नाही. 'बुद्धिमंदिरात सत्याचा दीप प्रकाशित झाल्याबरोबर वृत्ती आनंदमय होऊन... ज्याचे देहावसान सुटते असा एखादा महात्माच आईबापांची, गणगोताची, धनद्रव्याची, जातीची, देशाची किंवा समग्र मनुष्यतेची पर्वा न ठेवता... अमर्याद प्रेरणाबलाच्या भरवशावर हवे तेवढे महत्कृत्य हाती घेऊन ते तडीस नेतो. सामान्य मनुष्यांनी अशा नरवरांचे आश्चर्य करावे, पूजन करावे, स्मरण करावे, शिष्यत्व करावे - ते पुढे म्हणतात- ‘पण अनुकरण करू नये' - मी म्हणते शक्य तर अनुकरण करावे. अन्याय झाला, मोठा अन्याय झाला अशी जर खात्री आहे तर ज्यांनी तो केला ते आप्त म्हणून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये, ही केवढी लाजिरवाणी गोष्ट! परकीयांचे राज्य गेले, आता आपले राज्य आहे ह्या एका भ्रांतीमुळे आमच्यातली अन्यायाची चीडच नाहीशी होऊ लागली आहे. हाच आदर्श तरुण पिढीपुढे राहिला तर तिला विचाराचे स्वातंत्र्यच नाहीसे होईल. व्यक्तिपूजेमुळे काय अनर्थ झाला ह्याचा पाढा सर्व जगाला कळावा म्हणून रशियन पुढारी कंठरवाने ओरडत आहेत. स्टालिन, हिटलर व मुसोलिनी हे। महान देशभक्तच होते, पण त्यांच्या अनुयायांच्या भेकडपणामुळे ते सर्वसत्ताधीश बनले व सत्तेमुळे भय उत्पन्न होऊन मी म्हणेन ते सत्य व मी देईन तो न्याय अशी त्यांची अवस्था झाली. आगरकरांच्या निबंधांत व आचरणात सध्याच्या पिढीसाठी काही मोठा धडा असला तर हाच आहे. तुम्ही किती मोठे असला तरी मनुष्यच आहात. तुम्ही देशभक्त आहात तसा मीही आहे, मलाही बुद्धी आहे, ही जाणीव अहोरात्र मनात बाळगून त्याप्रमाणे वर्तन झाले नाही तर स्वातंत्र्य उपभोगण्यास आम्ही पात्र राहणार नाही. लोकशाही राज्य म्हणजे बहुसंख्यांचे अल्पसंख्यांकांवर राज्य असा अर्थ पुष्कळ करतात पण तो अर्थ कोणालाही संमत नाही. पुष्कळांच्या सुखापायी एकाला अन्याय झाला तरी हरकत नाही. चार

[ला तरी हरकत नाही; चार-दोन लोक मेले तरी चालेल पण शांतता प्रस्थापित झाली म्हणजे झाले: अमक्या पार्टीचे सदस्य म्हटले की स्वत:ची बुद्धी व भावना व सदसदविवेक बाजूला ठेवली 

आमची संस्कृती / ७१

पाहिजेत, अशी पुष्कळांची लोकशाही राज्याबद्दल कल्पना असते. ही लोकशाही नसून सबंध समाजाचा अध:पात आहे. जेथे जेथे समाजकल्याणाचे नाव पुढे करून व्यक्तींची तोंडे बंद करतात, देशहिताची सबब पुढे करून एखाद्या जमातीवर भयंकर अन्याय केला जातो तेथे खास समजावे की, लोकशाही बुडून अधिकारशाहीला आरंभ झाला. ही अधिकारशाही राजाची असो की राज्यकर्त्या पुरुषांची असो, तिला मान तुकवली की विचारस्वातंत्र्य नाहीसे झालेच म्हणून समजावे. ते गेले म्हणजे समाजाचा विनाशकाल जवळ आला म्हणून मानण्यास हरकत नाही.
 अधिकारयोगासारखी बुद्धी व शील नष्ट करणारी दुसरी गोष्ट नाही. कोठच्याही तव्हेचा अधिकार नसताना जी माणसे उदार असतात, सहकार्याने वागतात, लोकांच्यावर विश्वास ठेवतात, आर्जवी असतात, तीच अधिकारावर आली म्हणजे स्वजनद्रोह करतात, उघड करावयाच्या गोष्टी पडद्याआड करू लागतात. ख-याखोट्याची कदर बाळगीत नाहीत. ही गोष्ट फक्त राजकारणी लोकांतच दिसते असे नसून सर्वच सामाजिक बाबींत दिसते. एखादा अधिकारी माणूस जाणूनबुजून अपकृत्य करू लागला म्हणजे काहीजण लोभाने व काहीजण भीतीने गप्प बसतात. ह्या अभेद्य भिंतीवर आपटून तिच्याशी झगडा देण्याची हिंमत करणारे आगरकरांसारखे महात्मे फार थोडे असतात.  आगरकरांचा आणखी एक अमोल गुण म्हणजे त्यांचा दुर्दम्य आशावाद. त्यांच्यासारखा झगडा सबंध आयुष्यात कधीही देण्याचा प्रसंग मजवर न येऊनही मी निराशावादी बनत चालले आहे. आयुष्यात जे लहानमोठे प्रसंग पाहिले त्यांवरून असे वाटू लागले आहे की, न्याय व सत्य हे शब्द गरिबांना झुलवण्यासाठी श्रीमंतांनी व सत्ताधीशांनी उत्पन्न केलेले आहेत. त्या दोन्ही गोष्टी गरिबांना, वशिला नसलेल्यांना अप्राप्त आहेत व श्रीमंतांना त्यांची जरूरी नाही. पण आगरकरांचा दृढ विश्वास होता की, आज नाही उद्या आपण जिंकणारच. कितीही गरीब, अपमानित, लाथाडलेला असलो तरी माझ्या दृष्टीला जे योग्य असेल त्यासाठी मी झगडणारच व त्यात मी खासच विजयी होईन, हा भरवसा त्यांनी कधी सोडला नाही. आगरकर ज्याला धर्म म्हणत त्याच्या बुडाशी ही भावना होती. ती त्यांना जशी स्फूर्ती देई तशीच अविरत झगडण्याचे बळ देई व ७२ / आमची संस्कृती

स्वकीयांशी भांडण्याचे धैर्य देई. स्वत:च्या धर्मात शिरलेल्या दुष्ट रूढींविरुद्ध त्यांनी दिलेला झगडा हे पाखंड नसून एक प्रकारचे धर्मयुद्धच होते.

 समाजसुधारणेचे मर्म व आचरणातील पथ्य

 आगरकरांच्या आयुष्यातील ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यांच्या बुद्धीची शुद्धता त्यावरून समजून येते. आपल्या समाजातील रोगांना कंटाळून समाज सोडून देऊन चालणार नाही हे त्यांनी व इतर महाराष्ट्रीय समाजसुधारकांनी ओळखले होते. उपहास झाला, बहिष्कार पडला, निंदेचे प्रहार झाले तरी ते सोसावयाचे, पण समाजावर रागावून बाहेर पडावयाचे नाही, तरच समाजाची सुधारणा होईल हे आगरकरांनी फार स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. ज्या देशात आपले शेकडो पूर्वज जन्मास आले, वाढले, मरण पावले; ज्या देशातील हजारो पिढ्यानी अनेक गोष्टींत मोठ्या कष्टाने केलेल्या अनेक सुधारणांचे फळ आपणास आयतेच प्राप्त झाले, अशा देशांतील धर्माचा, रीतिरिवाजांचा व लोकांचा सर्वथैव त्याग करणा-या मनुष्यास खच्या सुधारकाची पदवी कधीही शोभणार नाही. स्वभूमीत, स्वलोकांत, स्वधर्मात आणि स्वाचारांत राहून, अविचारी व अज्ञान देशबांधवांच्या निंदेस किंवा छळास न भिती त्यांच्याशी कधी भांडून, कधी युक्तिवाद करून, कधी लाडीगोडी लावून, अथवा सामर्थ्य असल्यास कधी त्यांना दटावून त्यांची सुधारणा करणे यांतच खरी देशप्रीती, खरी बंधुता, खरा देशाभिमान, खरे शहाणपण व खुरा पुरुषार्थ आहे. समाजसुधारणेचे मर्म आगरकरांनी जितक्या स्प४ शब्दांत सांगितले आहे तितक्या स्पष्टपणे ते कोणी दुस-याने मांडलेले मला आठवत नाही. पण आपल्या मागल्या पिढीतील सर्व समाजसुधारकाना ९ कळले होते व त्यांची कृतीही त्याबरहुकूम झाली. आगरकर, टिळक, लोकहितवादी, फुले, कर्वे, शिंदे, गोखले व रानडे पतिपत्नी ही सवय मंडळी वरील तत्त्वाला चिकटून होती व म्हणूनच त्यांच्या प्रयत्नाने सब महाराष्ट्र समाज उजळून निघाला. He chastiseth best, who loveth ६.६ असे एक वाक्य बायबलात आहे. रागावण्याचा. दंडण्याचा हक कोणाला? तर जो अंत:करणपूर्वक प्रेम करतो त्याला. अशा रागावण्याचा 

आमची संस्कृती /७३

समाजाने जरी किती धिक्कार केला तरी शेवटी समाजावर त्याचा परिणाम होतोच होतो. आपलेच माणूस रागे भरले तर ते भलाईमुळे, आपल्या कल्याणासाठी, ह्याची न कळत समाजाला जाणीव असते व रागावून एकमेकांचे वाभाडे निघाले तरी त्यांतून कल्याणच निष्पन्न होते. धर्मांतरामुळे किंवा देशत्यागामुळे व्यक्तीचे प्रश्न सुटतील पण समाजाचे सुटणार नाहीत. समाजात राहूनच समाजाला वळण लावणे हे काही विशिष्ट राजकीय परिस्थितीत शक्य होणार नाही; पण अशी अवस्था जेथे नाही तेथे सुधारकांनी वरील पथ्य काटेकोरपणे पाळले पाहिजे. कितीही रागावले तरी ममत्वाची भावना ढळू देता कामा नये, आणि कितीही ममत्व असले तरी चूक झाली तर रागावण्याचे सोडता कामा नये, अशी ही दुहेरी भूमिका आगरकरांची व त्यांच्या समकालीन महाराष्ट्रीय पुढा-यांची होती. हे पथ्य कठीण का, हे समजणे सोपे आहे. आपले आणि परके ह्यांमधील फरक प्रत्येक व्यक्तीत निरनिराळ्या मार्गाने बिंबतो. पूर्वीच्या मागासलेल्या समाजात तो होता व संस्कृतीने परिपूर्ण असलेल्या समाजातील व्यक्तींतही तो असतो. आपल्याशी वागण्याचे नियम परक्यांशी वागण्याच्या नियमांहून अतिशय भिन्न असतात. ज्याला आपले म्हटले त्याचे सर्व दुर्गुण झाकायचे, त्याने केलेल्या प्रत्येक कृतीचे मंडन करावयाचे हीच तन्हा सर्वत्र दिसून येते. परकीय म्हटला म्हणजे थोडीशी तेढ मनात असतेच. त्याचे उणेदुणे काढण्याची मनोवृत्ती थोडी स्वाभाविक व बरीचशी आपल्या समाजजीवनात जाणूनबुजून पोसलेली असते. अशा वेळी स्वकीयांबद्दल अपरंपार प्रेम बाळगूनही परकीयांचा द्वेष न करणे व स्वकीयांच्या गुणावगुणांचा केवळ सभ्य दृष्टीने शोध करून अवगुणांवर प्रहार करावयाचा व गुणांचे पोषण करावयाचे- परकीयांचे चांगले ते घेऊन केवळ ते राज्यकर्ते किंवा बलशाली म्हणून त्याचे अधानुकरण करावयाचे नाही, हे आचार-नियम ऐकायला जितके सोपे तितकेच कृतीत आणणे कठीण आहे. लोकानुरंजन करून लोकप्रिय पुढारी होणे सोपे असते. अप्रिय पण पथ्यकारक गोष्टी लोकांपुढे मांडून त्यांच्या गळी उतरवणे फार कठीण असते. आजच्या सर्व जातींच्या व सर्व धर्माच्या सुशिक्षित तरुण पिढीने हे पथ्य पाळले तरच स्वराज्याचे सुराज्य होईल; तरच मागासलेल्या जमाती वरती येतील, एरवी नाही. ७४ / आमची संस्कृती

 आज प्रत्येकाच्या तोंडी असलेल्या काही विषयांचा येथे उल्लेख केला तर हा मुद्दा समजण्यास मदत होईल.

 सर्व मनुष्यजातीमध्ये बुद्धीचे सारखेच प्रमाण
 कॉलेजचे शिक्षण घेण्यास कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे.ह्याबद्दल आज बराच वादविवाद चाललेला आहे. स्वत:ला बहुजनसमाजाचे पुढारी म्हणविणाऱ्या बच्याच जणांना असे वाटते की,कॉलेज-प्रवेशासाठी लागणारे गुण शक्य तितके कमी व विषय कोणतेही असले तर बरे, कारण त्यामुळे बहुजन समाजातील खूप मुले कॉलेज शिक्षणाचा लाभ घेऊ शकतील व मागासलेल्या लोकांना पुढे येण्यास वाव मिळेल. दिसायला हा युक्तिवाद बिनतोड आहे,पण त्यात गृहीत धरलेल्या काही गोष्टी वस्तुस्थितीला धरून नाहीत व अपेक्षिलेला लाभ, लाभ न ठरता अंती हानी पदरात पडण्याचाही संभव आहे. काही लोकांनी बहुजन समाजाचे नाव पुढे करून शाळेतले इंग्रजी शिक्षण अगोदरच कमी करून टाकले आहे.

 ह्या युक्तिवादातले पहिले गृहीत असे की, बहुजन समाजाला काही अभ्यासक्रम व काही विषय झेपणारे नाहीत.अगदी बरोबर हाच युक्तिवाद ५०/७५ वर्षांपूर्वी इंग्रज राजकर्त्यांनी काळ्या लोकांविषयी केला होता. त्या वेळी तो उघड उघड कुटिल म्हणून धुडकावून टाकला. कारण तो परकीय राजसत्तेने केलेला होता. आता हा युक्तिवाद आप्त करीत आहेत व तो स्वत:च्या लोकांविषयी करीत आहेत. युक्तिवादापेक्षा त्यांत तथ्य काडीचेही नाही. अमक्या जमातीची मुले जास्त बुद्धिवान पण पूर्वीच्या अमक्याची कमी असे आतापर्यंत तरी झालेले नाही. उलट, बुद्धी मनुष्यजातीमध्ये सारख्या प्रमाणातच दिसून येते, असाच अर्वाचन शास्त्राचा निष्कर्ष आहे. पूर्वी मॅट्रिकच्या परीक्षेत ठराविक विषय असत ते सर्वांनी घेतलेच पाहिजेत असे होते. आता मुलांना विषय निवडता येतात व बऱ्याच विषयांचा (संस्कृत, गणित, इंग्लिश) अभ्यासक्रमही पूर्वीपेक्षा सोपा आहे. हे मी ऐकून सांगत नाही. मी स्वत: जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा पास झाले व तीन मुलांना मॅट्रिकचे विषय शिकविलेले आहेत. कॉलेजात मात्र उत्तरोत्तर पहिल्या वर्षापासून एम..पर्यंत शिक्षणक्रम काही

आमची संस्कृती / ७५

बाबतीत कठीण होत गेला आहेसोपे विषय घेऊन जेमतेम पासाचे मार्क मिळवणाच्या मुलाला कॉलेजचे पहिले वर्षच फार जड जाते, विषय कळतच नाही व मग प्रत्येक इयत्तेत दोन दोन-तीन तीन वर्षे काढून आयुष्याची मोलाची वर्षे फुकट घांलवून बरेचसे पैसे खर्जुन न्यूनगंड व विफलता पदरी घेऊन ही मुले कॉलेजातून परत फिरतात. कॉलेजचा शिक्षणक्रम सोपा करावा म्हणावे तर सर्वच शाखांमधून ज्ञान इतके फोफावलेले आहे की, हल्लीचा शिक्षणक्रमसुद्धा रसायन, पदार्थविज्ञान,जीवशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास वगैरे विषय समजण्याच्या दृष्टीने कोता पडतो, अशा वेळी साध्य काय व साधन काय ह्याचा नीट विचार झाला पाहिजे. माझा समाज सुशिक्षित करून सधन व संपन्न करणे हे माझे ध्येय आहे तर त्यातील तरुणांना खूप अभ्यास करावयास सांगणे, कष्टाशिवाय बिद्या व अर्थ मिळणे दुरापास्त आहे हे त्यांच्या मनात पटवणे, गरिबांसाठी भांडून भांडून सरकारकडून शिक्षणासाठी भरपूर पैसा काढणे ह्या गोष्टी न करता, भराभर शिक्षणाचे मानच कमी करून टाकणे म्हणजेथोडक्यात लोकानुरंजन करण्याचाच मार्ग नव्हे का? शिक्षणाचे मान कमी करण्याने आज काहींचा फायदा झाल्यासारखा दिसला तरी शेवटी सर्व समाजाचाच तोटा होणार नाही का? सगळेच बी.ए. आणि सगळेच मॅट्रिक असले तरी आकडेमोडीच्या खात्यात शेवटी तामीळ लोकच जास्त दिसतातते तो विषय त्यांना माहीत, त्यांच्या आकडेमोडीवर विसंबण्यास हरकत नाही ह्या भरवंशामुळेच ना! आमची शेतकन्यांची मुले नागर जमातीच्या मुलांइतकीच हुशार आहेत. त्यांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. ही समस्या सोडविण्याचा मार्ग आजचे पुढारी अनुसरतात तो खासच नव्हे.

 आगरकरांची आठवण आज का होते?
 त्याचप्रमाणे जातिभेदाच्या प्रश्नाबद्दल बलावयाचे ते फक्त कायद्याच्या भाषेतच आजकाल होते. ह्याउलट आज समाजहिताच्या दृष्टीने सर्व लोकांनी एकत्र जमून ह्यावर विचार होणे जरूर आहे असे कोणास वाटत नाही. समाजसुधारणेच्या सदरातून जाऊन आज हा प्रश्न एक राजकीय व पक्षीय प्रश्न होऊन बसला आहे. भावना जुन्या, हेवेदावे ७६ / आमची संस्कृती

जुनेच, नावे मात्र निराळी. अशा वेळी आगरकरांची आठवण तीव्रतेने होते.ते अशा नावांनी भुलले नसते. लोकशाहीच्या काळात बहुसंख्यांचे राजकारण, अल्पसंख्यांच्या पोटातली भीती व कर्तव्यच्युती ह्यांना त्यांनी वाचा फोडली असती व महाराष्ट्र समाजाच्या एकत्वाची तीव्रतेने जाणीव करून दिली असती. त्याचप्रमाणे महाराष्ट्राभिमान, भारताभिमान हे एकमेकांचे विघातक नसून पूरकच आहेत हे पण त्यांनी दाखवून दिले असते. त्यांचा देशाभिमान जाज्वल्य होता पण त्यांचे सर्व महत्त्वाचे लिखाण मराठी देशबांधवांना उद्देशून होते, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आगरकरांना सुधारणेच्या बाह्यांगाचे व अंतरंगाचे नीट आकलन होते व आंतरसुधारणा हीच बाह्य सुधारणेचा पाया असे त्यांचे ठाम मत होते. बायकांनी जाकिटे घालावी, पुरुषांनी जोडे घालावे, विधवावपन करू नये अशा किती तरी बाह्य सुधारणांचा त्यांनी जरी पुरस्कार केला. तरी त्याच्या बुडाशी समाजाच्या विचारांचे परिवर्तन हाच मुख्य मुद्दा होता आणि आज त्याच मुद्यावर विचार निर्भीडपणे व अव्याहत मांडण्याची जरूरी आहे. आज समाजसुधारणा व राजकीय वातावरण दंभाने व संशयान जे धूसर झाले आहे ते पुन्हा स्वच्छ करण्यासाठी आगरकरांची आवश्यकता आहे. आज आगरकर आपणांमध्ये नाहीत तरी त्यांचे स्मरण करून त्याच लेख परत परत वाचून सर्व विद्याथ्र्यांनी ते वातावरण निवळण्यास मदत करावी अशी विनंती करून तुम्हांपुढे बोलण्याची संधी दिल्याबद्दल चालकांचे आभार मानून लांबलेले भाषण संपवते.

- १९५६