आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना
पुणे जिल्ह्याच्या हवेली, भोर, वेल्हे व पुरंदर या ४ तालुक्यांमधील २५०
खेड्यांमध्ये १९६५ पासून सर्वंकष ग्रामीण विकासाचे काम. स्थानिक नेतृत्वविकसन,
स्त्री शक्ती प्रबोधन व चिरंजीवी विकासासाठी लोकसंघटन ही उद्दिष्टे.
पाणी
* पाणलोट क्षेत्र विकास - ३१ गावांच्या १६००० हेक्टर क्षेत्राची सर्वंकष
विकासाची योजना. सणसवाडी, ससेवाडी या गावांमध्ये पथदर्शी प्रकल्प • हातपंप
दुरुस्तीवर संशोधन व काम • सहकारी पाणीवापर संस्था उभारण्यासाठी महाराष्ट्रभर
प्रयत्न.
ऊर्जा
* गोमसंयंत्र - गोमसंयंत्र म्हणजेच बायोगॅस चा १९७५ पासून प्रसार. ३
जिल्ह्यांमध्ये सुमारे ४००० संयंत्रांचे बांधकाम • काहींना स्वच्छतागृहे जोडण्याचा
यशस्वी प्रयोग.
* सौर ऊर्जा -सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचे शिवापूर येथे स्थायी प्रात्यक्षिक.
स्वयंरोजगार
*व्यावसायिक प्रशिक्षण - शिवापूर येथे कृषि-तांत्रिक विद्यालयात महाराष्ट्र
शासनाने मान्य केलेले टर्नर, वेल्डर, वायरमन, संगणक परिचालक व माहिती तंत्रज्ञान
असे अभ्यासक्रम. • युवतींसाठी इलेक्ट्रॉनिक असेंब्लीचे प्रशिक्षण.
• तंत्रशिक्षणाबरोबर वर्तनकौशल्ये, विक्री कौशल्ये व उद्योजकता मार्गदर्शन. स्थानिक
साधन संपत्तीवर आधारित फळ प्रक्रिया, विविध खाद्यपदार्थ,नाचणी-वरई पासून
सकस पौष्टिक आहार, बांबूच्या वस्तू यासारख्या उत्पादनांसाठी प्रशिक्षण
* महिला बचत गट- प्रत्येकी २० महिला सदस्य संख्या असलेले सुमारे १५०
बचत गट चालू • काही उत्पादक उपक्रमांद्वारे राहणीमान उंचावण्यासाठी प्रशिक्षण.
* शिवगंगा उद्योग-वाखापासून शोभिवंत वस्तू करण्याचा महिलांचा कुटिरोद्योग.
पाणी ऊर्जा हाताला काम । संख्या शिक्षण संघटित ग्राम ॥
प्रभाग प्रमुख
ग्राम विकसन विभाग
ज्ञान प्रबोधिनी, ५१०, सदाशिव पेठ,
पुणे-४११०३०.
दूरभाष क्र. : ०२०-२४४७७६९१, २४४९१९५७
फॅक्स क्र : ०२०-२४४९१८०६
इ-मेल : jpgram@sify.com
मुद्रक :
रॅशनल प्रिंटर्स,
२१६, नारायण पेठ,पुणे ४११०३०
© सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन
प्रथम आवृती
रथसप्तमी, शके १९२२
द्वितीय आवृती
गुढीपाडवा, शके १९२६
(२१ मार्च २००४ )
किंमत : रुपये ५०/-