आरती करू तुज गजानना
आरती करू तुज गजानना,
देवा माझा नमस्कार घ्यावा रे ॥ ध्रु ॥
शंभू नंदना जयसुद सदना,
रिद्धी सिद्धी पती रमणा रे,
ब्रम्हा विष्णू ध्यानी निरंतर,
आवड करुनी तव चरणा रे ॥ १ ॥
मुकुट-कुंडले हार विराजीत
छत्र चामरे झळकळती रे,
सुंदर वरूनी सोंडची बरवी
दुर्वांकुर बहू प्रीती रे ॥ २ ॥
अग्रपूजेचा तू अधिकारी
गौरीहराच्या तनया रे,
पार्वतीचे स्तनपान कराया
उदरी विष्णू आला रे ॥ ३ ॥
भाव लोचना भव भय हरणा,
सुहास्य मूषक वाहन रे,
वरदहस्त तू कृपा जयाचा,
राज गजानन घ्यावा रे ॥ ४ ॥
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.