गणपतीची आरती/आरती करूं गणपतीला दे
<poem> आरती करूं गणपतीला दे सुमतीला चरण कमला नमन हे करुनि भक्तिला ॥ धृ. ॥
मूषक वाहना सिंदूर वदना कलिमल दहना जन सुख सदना गाती जन तव गुण लीला देसिल्या त्वरीत दासाला ॥ १ ॥
त्रस्त मी होय संसारी प्रीती भारी कनकदारीं गांजिती मला हे भारी ॥ अघोर पापी ऎसा झालो, सद्बोधांमृत नच मी प्यालो दावून स्वरूप तूं करी मला पदरी दे ठाव दासाला ॥ २ ॥
<poem>
![]() |
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. | ![]() |