गणपतीची आरती/आरती शंकरतनयाची । मोरया
<poem> आरती शंकरतनयाची । मोरया पार्वतीनंदनाची ॥ धृ ॥
पद्मासमान तुझे चरण । वंदिती सकळ सुरमुनी तीं ॥ उंदिर वाहन हें तुझे । त्यावरी बैसोनी फिरसी । चाल ॥ वर्तुल गजासमीप मान । पायीं पैंजण, रुणझुण करिती, सताल सुस्वर, नुपुरें, सुंदर, गणेशाची वाजति झनन विनायकाची ॥ १ ॥ ॥ आरती ॥
भाद्री शुद्ध चतुर्थीला । तुजला ते दिनीं पुजिती ॥ एकविस दुर्वांकुरानीं । अर्पूनी तुजला नित्य ध्याती ॥ चाल ॥ नामाचा अगाध हो महिमा । शेंदूर अंगी चर्चित सुंदर, कर्णी कुंडल, झळकती सिद्धि नायकाची लखलखती एकदंताची ॥ २॥ आरती ॥
माघ शुद्ध चतुर्थीला । गणपती पुळ्यामध्यें तुजला । तेथें यात्राचि भरुनि । जन्मोत्सव तुझा करिती ॥ चाल ॥ तुझी अगाध हो करणी । अग्रपूजेचा मान देऊनी, सकळ सुरवर ध्याऊनि सत्वर तुजलाची पूजिती ॥ मोरया, तुजलाची पूजिति ॥ ३ ॥ आरती ॥
संकष्टिचीं व्रतें तुझी । करतील नरनारी जगती ।। त्यासी प्रसन्न तूं होसी । मनीषा पूर्ण करिसि त्यांची ॥ चाल ॥ वर्णकाय तुझा महिमा । तुझिया स्मरणे, हरतील पापे सद्बुद्धि तू देई आम्हांला ॥ हीच तुम्हा विनंती मोरया, हीच तुम्हां विनंती ॥ ४ ॥ आरती ॥
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |