गणपतीची आरती/आवडी गंगाजळें देवा न्हाणी

<poem> आवडी गंगाजळें देवा न्हाणीलें॥ भक्तीचें भूषण प्रेमसुगंधे अर्पीले॥ अहं हा धूप जाळू गणपतीपुढे॥ माझ्या मोरयापुढें॥ जंव जंव धूप जळे तवं तवं देवा आवडे॥१॥

पंचप्राणहीत धूपदीप जो केला॥ नैवेद्याकारणे उत्तम प्रकार अर्पिला॥ मध्वनाथस्वामी पंचोपचारि पूजीला॥ मग एकार्तीसी प्रेमे प्रारंभ केला॥२॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg