मुख्य मेनू उघडा

<poem>

गजवदना पुजूनी तुला करित आरती। तारी मला षड्‌रिपु हे नित्य पीडीती॥धृ॥

अति सुंदर रत्नमाळा कंठि शोभती। ऋद्दिसिद्धि नायिकादि चमर वारिती॥ इंद्रादिक सुरवरनर नित्य पूजिती। निशिदिनि मी ध्यातो तुला तारी गणपती ॥१॥

भक्तकामकल्पद्रुम शारदापती। वर्णिती हे वेद चारी आणखी स्मृती॥ निशिदिनि जे भजति तुला तारिं त्यांप्रती। वसुदेव लीन पदीं देविभो मती ॥२॥


<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg