गणपतीची आरती/जग ताराया अवतरलासी भक्त

<poem>

जग ताराया अवतरलासी भक्त पूजिती सद्‌भावे। कनवाळु तूं मुषकवाहन भक्तसंकटी तूं पावें ॥ बहु प्रेमानें ओवाळिन तुज मन वांछी तव गुण गावे। विघ्नहराया येई झडकरी ऋद्धिसिद्धिसह तू धावे॥१॥

वक्रतुंड गुणवंत विघ्नहर गौरिनंदन गणपति जो। आरति ओवाळीन मी त्यासी विघ्नांतक जगतारक जो॥धृ.॥

शुंडा शोभे सिंदुरचर्चित मस्तकी मुकुट झळाळी । मुक्ताहार हे कंठी रुळती कस्तुरितिलक हा तव भाळी ॥ मोरेश्वर सुत वासुदेव तुज प्रार्थी दीना प्रतिपाळी ॥ भक्तजनातें मंगलमूर्ती रक्षीं अतिसंकटकाळीं ॥ २ ॥ वक्रतुंड गुणवंत ॥


<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.