गणपतीची आरती/पाश करि उत्पल शंख गदा

<poem> पाश करि उत्पल शंख गदा। चक्रधान्याग्र ऋजा सुखदा॥ इक्षु धनु मातु लिंग सुसदा । हरी निजदंत कृतांतमंदा॥चाल॥ विराजे रत्‍नकलशशुंडा। दंड अतिप्रचंड, मंडित उदंड वरदित अखंड, किलब्रह्मांड मंडनाची॥ प्रभातंशंड खंडनाची॥१॥

आरती जगद्वंदनाची। उमाशिवसांबवंदनाची ॥धृ.॥

स्वयें जी भूषविणार जगा। वल्लभा दिव्यभव्यसुभगा॥ स्वहस्ती अमल- कमल विभगा। विहगगजवक्रहंस विहगा॥ चाल॥ भुजें परिरभणानुसरली। करुनि चपलता, परि न विकलता, तरुसि जशी लता वसंताची॥ सदा शीलता सुसंताची॥आर.॥२॥

प्रथम उत्पन्न विश्वकर्ता। प्रकृति रक्षूंना प्रलयिंहर्ता॥ गु्णगुण वेदशास्त्रपढता। सकलसिद्धयर्थ स्वार्थ्मर्ता॥चाल॥ असा विघ्नेश इश घ्यावा। अभय करणार, विभय भरणार, सुकवि तरणार, सदैवाची॥ कुमति हरणार राघवाची॥ आरती.॥३॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.