गणपतीची आरती/बुद्धी दे विनायका

<poem> अवनिशा.., अलंपता बुद्धीनाथ तू बुद्धीदाता धार्मिका गौरीसुता बुद्धी दे विनायका !॥१॥

गजवक्त्रा.., एकदंता चतुर्भुज तू देवव्रता सिद्धीपती विघ्नहर्त्या सौख्य दे गणनायका !॥२॥

धुम्रवर्णा.., एकद्रिष्टा मंगलमुर्ति गजानना महाबळा मुक्तिदात्या सन्मति दे सिद्धीनाथा !॥३॥

शुभगुणांकना सिद्धीप्रिया शुभानन तू वक्रतुंडा स्कंदपुर्वजा सिद्धीदायका सामर्थ्य दे तू विघ्नेश्वरा !॥४॥

अल्पमति मी भक्त तुझा तु समृद्धी दे गणराया विघ्न हरो चराचराचे दे पसायदान वरदेश्वरा !॥५॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg