गणपतीची आरती/शिवतनया वक्रतुंड गौरीच्या

<poem> शिवतनया वक्रतुंड गौरीच्या बालका। ओवाळू तुजलागी विश्वाच्या पालका॥धृ.॥

उंदीर वाहन तुझे वामांगी शारदा। भक्तांते रक्षितोंसी वारुनियां आपदा॥ स्तवितो मी दिन तुजला सद्‌बुध्दी द्या सदा। गणराया वर देई उद्धरि तूं भाविकां॥१॥ शिवतनया.॥

गिरिजांकी बॆसुनिया प्रेमाने खेळसी। वधुनिया राक्षसाला लीलेते दाविसी॥ निशिदिनि जीं ध्याति तुजला सत्वर त्यां पावसी॥ प्रार्थीतसे वासुदेव तारी या सेवका॥२॥ शिवतनया.॥ <poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg