THE GANPATI FESTIVAL.



गणेशचतुर्थी.

 हा सण भाद्रपद मासांत येतो, परंतु त्याच्या पूर्वी महिन्या दीड महिन्यापासून गणपती करण्याचे काम गांवांत चालू असते. कित्येक लोकांचा हा धंदाच होऊन बसला आहे. चांगली चिकणमाती घेऊन तींत कापूस वगैरे घालून कुटावी व बाजारांत वि- कण्याकरितां गणपती करावे. या धंद्यावर दर वर्षी पांच पन्नास पासून शंभर दोनशे रुपये एक एक
कारागीर मिळवितो. गणपती घरीं आणिल्यावर त्या- च्यावर टीका होऊ लागतात. कोणी ह्मणतो. ह्या ग- णपतीचें ध्यान चांगले साधले. कोणी ह्मणतो, आ. सनाचा आव फार चांगला झाला, पण अंमळ सोड बिनसली. अणखी एकजण ह्मणतो, ह्या गणोबाचें पोट तर खपाट्यास गेलें. दुसऱ्या गणपतीला पाहून ह्मणतो याचे दोंद भले मोठे झालें. आतां याच्या य- जमानास काय कमी आहे ? याप्रमाणे त्या बापड्या देवावर टीका चालतात, व त्या तो मुकाट्याने ऐकत बसतो. त्याच्या पूजेस आरंभ होण्यापूर्वी त्याला बराच वेळ एकीकडे बनावें लागते, कारण यजमान व घर- चीं माणसें त्याच्यासाठी आरास करण्यांत गुंतलेली असतात. पूजेच्या आरंभी प्राणप्रतिष्ठा होते, ह्मणजे ब्राम्हण मंत्राच्या योगानें त्याजमध्ये देवत्व आणितात, पण तें आल्याचे लक्षण कांहींच दिसत नाहीं. पूजे- च्या आरंभी इतर देवांस जसे स्नान घालतात तसे यास घालीत नाहींत, कारण जलस्नानाने गणोबाची सर्व कळा जाईल अशी भक्तांस भीति असते. गण- पतीच्या पूजेत विशेष हें आहे की त्याला २१ मो-- दकांचा नैवेद्य लागतो. त्याला लाडवांची मोठी आ-
बड आहे. तुकारामानींही याविषयीं लटले आहे कीं,
गणोवा विकराळ | लाडू मोदकांचा काळ ||

 गणपतीस मेवामिठाईची इतकी गोडी होती की एकदां त्याचा बाप महादेव याजवर कोणी वैरी चढाई करून येत असतां त्यास निवारायास बापाने ह्या आ- पल्या पुत्रास पाठविलें, परंतु त्या शत्रूने याच्या पुढे मिठाईची रास ठेविली, तिला तो इतका लुब्ध झाला कीं, शत्रु बापावर चढाई करून केव्हां गेला हेंही त्याला समजलें नाहीं, व तेव्हांपासून त्याचे जे दोंद वाढले, ते अद्याप झडले नाहीं !

 गणपतीपुढे भजन, कीर्त्तन, पुराण चालते इत- केंच नाहीं, तर कळवंतिणींचा नाच, रांडांच्या बैठका, जुगार, सोंगट्यांचे खेळ, असेही प्रकार चालतात. मुंबईत गणपतीच्या नव्या नव्या तहा निघतात, त्यांत आह्मी एकदां अशी एक तन्हा पाहिली कीं, गण- पतीच्या हातांत बाटली दिली होती, तेव्हां भक्तही बाटलीतील तीर्थ लंबोदराचा प्रसाद मानून प्राशन करीत असतील हें उघडच आहे.

 गणपतीची उत्पत्ति सर्वांस ठाऊकच आहे. तो
पार्वतीच्या अंगाच्या मळीपासून झाला, व तिचें द्वार रक्षीत असतां शिवाने बाहेरून येऊन तो आपणाला आंत जाऊं देईना ह्मणून त्याचा शिरच्छेद केला; पुढे पार्वतीने व्याजकरितां शोक केला ह्मणून हत्तीचें मस्तक आणून त्याला लाविले. ह्यावरून त्याला गजानन असे नांव पडले व ते तुह्मी त्यास भूषणप्रद मानून त्याचें दर्शन घेतेवेळीं “हे गजानना" असे हाणतां, परंतु वैष्णवपंथी यावरून त्याला "नरपशु" म्हणतात. विचारसागर नामक गुजराथी ग्रंथांत शिवाचे वर्णन करितांना असे म्हटले आहे कीं-

"तेनो पुत्र गणेशजी तेवो ।
रूप विलक्षण नरपशु जेवो ॥”

 वाचकहो, ज्याला तुह्मी देव मानितां त्याच्या उत्प- त्तीची कायहो ही कथा ! तो तमच्या कोणऱ्या कार्या- साठी ह्मणून अशा प्रकारे उत्पन्न झाला ? अशा क- थेवर तुमचा विश्वास तरी कसा बसतो? जर पार्वतीला आपल्या अंगाच्या मळीचा सजीव पुतळा करितां आला, तर शिवाने त्याचे मस्तक छेदल्यावर पुनः तें निर्माण करायास तिला शक्ति नव्हती काय ? अथवा शिवा- काही तसे करण्याचे सामर्थ्य नव्हते काय ? तसेच
त्याच्या एका दांताविषयींची गोष्ट पाहा. शिव पार्वती एकांतीं असतां त्यांनीं गणोबाला द्वार रक्षणार्थ ठेविलें होतें, इतक्यांत परशरामाची स्वारी शिवदर्शनास आली व त्याला गणपतीने आंत जाण्याचा प्रतिबंध केला, ह्मणून परशरामाने बुकी मारून त्याचा एक दांत पा- डला. अहो, ज्याला तुह्मी विनायक व विघ्नहर्त्ता ह्मण- तां त्याला आपणावर आलेली ही दोन विघ्न निवारण करितां आलीं नाहींत, तो तुमचीं विघ्ने कशी दूर क रील ? मित्रहो, विचार करा.

 गणेशचतुर्थीच्या दिवशीं तह्मी चंद्रदर्शन घेत नाहीं, कारण तसे केल्यानें तुलावर चोरीचा आळ येईल असा चंद्रास गणपतीचा श्राप आहे असे तुह्मी ह्मणतां, पण असे पाहा कीं, तुमच्याशिवाय शेकडो व हजारो लोक त्या दिवशी चंद्राला पाहतात त्यांजवर कधीं असा आ- ळ येत नाहीं. तेव्हां ही गोष्ट कशी खरी मानावी ?

 गणपतीला कांहीं दिवस घरांत ठेविल्यावर तुझी त्याला बाहेर नेऊन पाण्यांत टाकतां, हे एक त्या विघ्न- हर्त्यांवर विघ्नच नव्हे काय ? आणि तुझाला याची गरज नाहीं काय ? गणपती बुडाल्यावर तुमचीं विघ्ने कोण हरण करील ? हा पोरखेळ नव्हे काय ? बाव्हला
बाहुलींचा खेळ झाल्यावर मुलें जशीं त्यांस ढकलून देऊन हुर्यो ! करितात तसें तुह्मी मोरया ! ह्मणून त्या- ला पाण्यांत टाकितां कीं नाहीं ? इतका पैसा खर्चा- वा, नाच तमाशे करावे, वेळ दवडावा, जागरणें क रावीं, प्रकृति बिघडन घ्यावी व शेवटीं गणोबाला त्याचा कांहीं अपराध नसतां सन्याशाप्रमाणे जलस- माध द्यावी हें न्यायदृष्ट्या तरी योग्य आहे काय ?

 गणपतीला हिंदु लोक विद्येचा देव समजतात, परंतु त्याच्या विद्येचें उदाहरण एकही त्याच्या चरि- त्रांत दृष्टीस पडत नाहीं. त्याने कोणती विद्या शिक- विली ? त्याने नास्तिक मत (बोद्ध मत ) शिकविलें अशी कथा पुराणांतरी आहे. तसेच सर्व मंगल का- यांच्या आरंभी त्याचे पूजन करितात, व ग्रंथारंभी त्याचे नमन लिहितात, परंतु ह्या दोन्ही चाली जुन्या वैदिक कालांत व वैदिक ग्रंथांत कोठे आढळत ना- हीत. ऋग्वेदाच्या आरंभी श्रीगणेशायनमः नाहीं व वेदांत, सांख्य, योग इ० शास्त्रांच्याही आरंभीं नाहीं.

 पण हा सर्वच प्रकार अथपासून इतिपर्यंत व्यर्थ आहे, यांत धर्म ह्मणून कांहीं नाहीं. ईश्वराने असे करण्याविषयीं मनुष्यांस कोठे आज्ञा दिली नाहीं.
 तर ईश्वराची इच्छा काय आहे त्याच्या शास्त्रांत प्रगट केली आहे. ती जाणा. ती परमेश्वराची भ-क्ति आत्म्याने व सत्यतेने केली पाहिजे, कारण पर- मेश्वर निराकार परमात्मा आहे, व तो सत्य आहे. मनुष्ये पापी आहेत. त्यांच्या पापांची क्षमा झाली पाहिजे, त्याशिवाय परमेश्वर त्यांस जवळ घेणार नाहीं. याकरितां त्याने आपला एकुलता पुत्र प्रभु येशु ख्री- स्त जगांत पाठविला. त्याने आह्मांकरितां प्रायश्चित्त केलें. जे त्याजवर विश्वास ठेवितात त्यांची महाविघ्ने दूर होतात. तीं वि पाप व पापाचा दंड ह्मणजे अ- क्षय नरकवारा हीं आहेत. येशूच्या पुण्याने पापाची क्षमा मिळते, व नरकवास चुकतो; मरणाचें भय दूर होते. येशूवर विश्वास ठेवणारास देवाचा पवित्र आ- त्मा मिळतो, तो आत्मा आमचें मळीण अंतःकरण शुद्ध करितो, आह्मांस पवित्र आचरण करायास शक्ति देतो. हेच तारण आहे. प्रिय मित्रहो, ह्या गोष्टीचा विचार करा. ख्रिस्ती शास्त्र वाचून पाहा. प्रभु येशुचे गुण, सामर्थ्य, कर्मों, दया व प्रीति यांचा अनुभव घ्या. त्याचा उपदेश ऐका. "त्याजमध्यें ज्ञा- नाचे व बुद्धीचे अवघे संग्रह आहेत.” (कल. २: ३ )
तोच "मार्ग, सत्य व जीवन" आहे. (यो० १४:६)
 "जो बुद्धिमान तो हे अर्थ ध्यानांत घरील, आ-
णि परमेश्वराची परम दया समजेल." ( गी० १७:४३)
 "जर कोणी ज्ञानाविषयीं उणा आहे तर देव जो
सर्वांस उदारपणे देतो त्यापाशीं त्याने मागावें ह्मणजे त्याला मिळेल.” (याको. १: ५)
 "हे परमेश्वरा, उत्तम बुद्धि व ज्ञान मला शिकव." (गीत ११९: ६६)
 "अहो कष्टकरी व ओझ्याने लादलेले, तुझी सर्व
माझ्याजवळ या, ह्मणजे मी तुलाला विसांवा देईन.
तुझी आपणावर माझें जूं घ्या व भजपासून शिका,
म्हणजे तुम्ही आपल्या जिवांस विसांवा पावाल."
 मित्रहो, ह्या ईश्वरी शास्त्रवचनांचे मनन करा.
आणि ह्यांत शेवटीं जें तुम्हांस प्रभु येशूचे आमंत्रण
आहे ते घ्या, व त्याजपाशीं या. व्यापासून तुम्हाला
ईश्वरी ज्ञान प्राप्त होईल व शांतिहि पावाल.

_________
BOMBAY TRACT AND BOOK SOCIETY,

Marathi Gratuitous Series. 1st.

Edition. 10,000 Copies. A. D. 1885.

Printed at the A. V. Press, Two Tanks, Bombay.