तुकाराम गाथा/गाथा १५०१ ते १८००
<poem> 1501
तुह्मी बैसलेती निर्गुणाचे खोळे । आह्मां कां हे डोळे कान दिले ॥1॥ नाइकवे तुझी अपकीिर्त्त देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥ आपुले पोटीं तों राखियेला वाव । आह्मांसी कां भाव अल्प दिला ॥2॥ तुका ह्मणे दुःखी असें हें कळों द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥3॥
1502
सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥1॥ सारा अवघें गाबाळ । डोऑया आडील पडळ ॥ध्रु.॥ शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥2॥ तुका ह्मणे कळे । परि होताती अंधळे ॥3॥
1503
अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥1॥ विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥ध्रु.॥ माझी कोणी न धरो शंका ।हो कां लोकां निद्वपद्व ॥2॥ तुका ह्मणे जें जें भेटे । तें तें वाटे मी ऐसें ॥3॥
1504
सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥1॥ येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥ अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रह्मांडाचा ॥2॥ तुका ह्मणे नाहीं चालत तांतडी । प्राप्तकाळघडी आल्याविण ॥3॥
1505
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥ थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥2॥ भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥3॥ तुका ह्मणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें जरवतसे ॥4॥
1506
जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥1॥ तुह्मी सांभािळलों संतीं । भय निवारली खंती ॥ध्रु.॥ कृत्याकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥2॥ तुका ह्मणे काळ । आतां करूं न शके बळ ॥3॥
1507
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥1॥ तुह्मी जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु.॥ काय वोळलें संचित । ऐसें नेणें अगणित ॥2॥ तुका ह्मणे नेणें । काय केलें नारायणें ॥3॥
1508
असें येथींचिया दिनें । भाग्यहीन सकळां ॥1॥ भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ध्रु.॥ आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥2॥ तुका ह्मणे केली कोणें । एवढा नेणें लौकिक ॥3॥
1509
गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें ॥1॥ काय जाणों तरले किती । नाव ऐती या बैसा ॥ध्रु.॥ सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥2॥ तुका ह्मणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥3॥
1510
सर्वकाळ माझे चित्तीं । हे चि खंती राहिली ॥1॥ बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥ वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥2॥ तुका ह्मणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥3॥
1511
जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥1॥ दुःख पावायाचें मूळ । रहनी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु.॥ माळामुद्रांवरी। कैंचा सोंगें जोडे हरि ॥2॥ तुका ह्मणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥3॥
1512
अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥1॥ येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥ संग हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा ॥2॥ तुका ह्मणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥3॥
1513
ब्रह्मरूपाचीं कर्में ब्रह्मरूप । विरहित संकल्प होती जाती ॥1॥ ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥ नानाभाषामतें आळविती बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥2॥ तुका ह्मणे माझें नमन जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥3॥
1514
नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥1॥ वाया हातीं माप चाले सज्जनाचें । कीतिऩ मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥ प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥2॥ तुका ह्मणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥3॥
1515
तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥1॥ तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥ अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥2॥ तुका ह्मणे विधिनिषधाचे डोहीं । पडिले त्यां नाहीं देव कधीं ॥3॥
1516
पटे ढाळूं आह्मी विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥1॥ निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥ बिळवंत जेणें रचिलें सकळ । आह्मां त्याचें बळ अंकितांसी ॥2॥ तुका ह्मणे आह्मी देखत चि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥3॥
1517
कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥1॥ कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥ध्रु.॥ निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥2॥ तुका ह्मणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥3॥
1518
सांडोनी दों अक्षरां । काय करूं हा पसारा । विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडेसी ॥1॥ ह्मणोनि बोबडा उत्तरीं । वाचें जपें निरंतरीं । नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ध्रु.॥ सर्वमय ऐसें वेदांचें वचन । श्रुति गर्जती पुराणें । नाहीं आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥2॥ शेवटीं ब्रह्मार्पण । या चि मंत्राचें कारण । काना मात्र वांयांविण । तुका ह्मणे बिंदुलीं ॥3॥
1519
हरिनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥1॥ फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥ हरिनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥2॥ हरिनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें किळकाळ ॥3॥ येणें चि बळें सरते आह्मी । हरिचे नामें लोकीं तिहीं ॥4॥ तुका ह्मणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥5॥
1520
नव्हें हें गुरुत्व मेघवृिष्ट वाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥1॥ आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥ देहपिंड दान दिला एकसरें । मुिळचें तें खरें टांकसाळ ॥2॥ तुका ह्मणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥3॥
1521
घटीं अलिप्त असे रवि । अिग्न काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥1॥ भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥ देह संकल्पासारिखें । एक एकांसी पारिखें । सुख आणि दुःखें । अंगी कर्में त्रिविध ॥2॥ तुका ह्मणे कोडें । न कळे तयासी सांकडें । त्याचिया निवाडें । उगवे केलें विंदान ॥3॥
1522
सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय ॥1॥ चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ध्रु.॥ नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥2॥ तुका ह्मणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥3॥
1523
जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥1॥ डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु.॥ सरसावलें मन । केले सोज्वळ लोचन ॥2॥ तुका ह्मणे सवें । आतां असिजेत देवें ॥3॥
1524
तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥1॥ जेथें तें च नाहीं जालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु.॥ वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥2॥ शेष उरला तुका । जीवा जीवीं जाला चुका ॥3॥
1525
पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥1॥ आवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥ध्रु.॥ भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशीं शयन ॥2॥ पांघरोनि तुका दिशा ॥ केला वास अलक्षीं ॥3॥
1526
विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रह्मरस ठसावला ॥1॥ माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥ लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥2॥ तुका ह्मणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊमिऩ एकमय ॥3॥
1527
कृष्णरामनाम मांडीं पां वोळी । तेणें होइल होळी पापा धुनी ॥1॥
ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नास ब्रह्मरसा ॥ध्रु.॥
जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढें आस नुरे मागुताली ॥2॥ तुका ह्मणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणीं चुकतील ॥3॥
1528
परमार्थी तो न ह्मणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥1॥ थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥ पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥2॥ तुका ह्मणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥3॥
1529
ज्याचा ऐसा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥1॥ देव तया जवळी असे । पाप नासे दरुषणें ॥ध्रु.॥ कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥2॥ तुका ह्मणे भेदाभेद । गेले वाद खंडोनि ॥3॥
1530
सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥1॥ न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥ देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥2॥ तुका ह्मणे आहे भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥3॥
1531
Yाानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥1॥ ह्मणोनियां ऐसे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ध्रु.॥ वेदपारायण पंडित वाचक । न मिळती एक एकांमधीं ॥2॥ पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखें चेष्टा विपरीत ॥3॥ आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करती रागें गुरगुरु ॥4॥ तुका ह्मणे मज कोणांचा पांगिला । नको बा विठ्ठला करूं आतां ॥5॥
1532
पंढरीची वाट पाहें निरंतर । निडळावरी कर ठेवूनियां ॥1॥ जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥ पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥2॥ तुका ह्मणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥3॥
1533
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥1॥ नासिवंत आटी िप्रयापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥ नाव धड करा सहजरा नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥2॥ तुका ह्मणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरिरामबाणीं ॥3॥
1534
पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥1॥ करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥ सत्यासाटीं माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥2॥ तुका ह्मणे माझी कळवऑयाची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥3॥
1535
तुज ह्मणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥1॥ आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥ आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥2॥ प्रेमरसपान्हा पाजीं माझे आइऩ । धांवें वो विठाइऩ वोरसोनि ॥3॥ तुका ह्मणे माझें कोण हरी दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥4॥
1536
भिH तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥1॥ जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥ कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥2॥ तुका ह्मणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥3॥
1537
पापी ह्मणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥1॥ ऐशा विचाराचे घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥ एकवेळ जेणें पुत्राच्या उद्देशें ॥ घेतल्याचें कैसें नेलें दुःख ॥2॥ तुका ह्मणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥3॥
1538
उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती ॥1॥ ख्यात केली अजामेळें । होतें निघालें दिवाळें ॥ध्रु.॥ मोकलिला प्रायिश्चतीं । कोणी न धरिती हातीं ॥2॥ तुका ह्मणे मुH वाट । वैकुंठीची घडघडाट ॥3॥
1539
सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरि बा गोविंदा रामकृष्णा ॥1॥ पुण्य पर्वकाळ तीथॉ ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥ अवघे चि लाभ बैसलिया घरा । येती भाव धरा एके ठायीं ॥2॥ सेऑया मेंढएा गाइऩ सेवा घेती ह्मैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥3॥ तुका ह्मणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभ चि ॥4॥
1540
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥1॥ तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥ देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥2॥ काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥3॥ तुका ह्मणे देवभHांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥4॥
1541
पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरिदासांची ॥1॥ ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिथॉ जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥ चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥2॥ भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥3॥ तुका ह्मणे मन जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥4॥
1542
येणें बोधें आह्मी असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥1॥ आह्मी भूमीवरी एक दइवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥ तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥2॥ न चळे हा मंत्र न ह्मणों यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥3॥ तुका ह्मणे माझा विठ्ठल विसांवा । सांटवीन हांवा हृदयांत ॥4॥
1543
बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरिभH । कृपावंत मानसीं ॥1॥ ह्मणवी ह्मणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु.॥ असे भूतदया मानसीं । अवघा देखे हृषीकेशी । जीवें न विसंबे तयासी । मागें मागें हिंडतसे ॥2॥ तुका ह्मणे निविऩकार । शरणागतां वज्रपंजर । जे जे अनुसरले नर । तयां जन्म चुकलें ॥3॥
1544
तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥1॥ लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥ जाला हरिनामाचा तारा। सीड लागलें फरारा ॥2॥ तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥3॥
1545
आळवीन स्वरें । कैशा मधुरा उत्तरें ॥1॥ यें वो यें वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दें गे ॥ध्रु.॥ पसरूनि चोंची । वचन हें करुणेची ॥2॥ तुका ह्मणे बळी । आह्मी लडिवाळें आळीं ॥3॥
1546
सकिळकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥1॥ रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥ शंखचक्रपद्मगदा। गरुडासहित ये गोविंदा ॥2॥ तुका ह्मणे कान्हा । भूक लागली नयनां ॥3॥
1547
पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥1॥ तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ध्रु.॥ ब्रह्मांडनायका । भHजनाच्या पाळका ॥2॥ जीवांचिया जीवा । तुका ह्मणे देवदेवा ॥3॥
1548
करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥1॥ लागो हा चि छंद । मना गोविंद गोविंद ॥2॥ तुका ह्मणे मना । मज भीक द्यावी दीना ॥3॥
1549
आपुलिया लाजा । धांवे भHांचिया काजा ॥1॥ नाम धरिलें दिनानाथ । सत्य करावया व्रत ॥ध्रु.॥ आघात निवारी। छाया पीतांबरें करी ॥2॥ उभा कर कटीं । तुका ह्मणे याजसाटीं ॥3॥
1550
साधावया भिHकाज । नाहीं लाज हा धरीत ॥1॥ ऐसियासी शरण जावें । शHी जीवें न वंची ॥ध्रु.॥ भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥2॥ तुका ह्मणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥3॥
1551
धेनु चरे वनांतरीं । चित्त बाळकापें घरीं ॥1॥ तैसें करीं वो माझे आइऩ । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु.॥ न काढितां तळमळी । जिवनाबाहेर मासोळी ॥2॥ तुका ह्मणे कुडी । जीवाप्राणांची आवडी ॥3॥
1552
हरिजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥1॥ रूपा येऊनियां धरी अवतार । भHां अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥ दुर्वास हा छळों आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जािळत फिरे ॥2॥ द्रौपदीच्या क्षोभें कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केलें ॥3॥ न साहे चि बब्रु पांडवां पारिखा । धुडाविला सखा बिळभद्र ॥4॥ तुका ह्मणे अंगीं राखिली दुगपधि । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥5॥
1553
ज्यासी आवडी हरिनामांची । तो चि एक बहु शुचि ॥1॥ जपतो हरिनामें बीज । तो चि वर्णांमाजी द्विज ॥2॥ तुका ह्मणे वर्णा धर्म । अवघें आहे सम ब्रह्म ॥3॥
1554
विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥1॥ आह्मां विठ्ठल जीवन । टाळ चिपिळया धन ॥ध्रु.॥ विठ्ठल हे वाणी। अमृत हे संजिवनी ॥2॥ रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥3॥
1555
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥1॥ भाग्यवंता छंद मनीं । कोडें कानीं ऐकती ॥ध्रु.॥ विठ्ठल हें दैवत भोळें। चाड काळें न धरावी ॥2॥ तुका ह्मणे भलते याती । विठ्ठल चित्तीं ते शुद्ध ॥3॥
1556
ह्मणे विठ्ठल ब्रह्म नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥1॥ मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु.॥ नाहीं विठ्ठल जया ठावा । तो ही डोळां न पाहावा ॥2॥ तुका ह्मणे नाहीं। त्याची भीड मज कांहीं ॥3॥
1557
एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥1॥ मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥ मरणांची तंव गांठोडी पदरीं । जिणें तो चि वरि माप भरी ॥2॥ तुका ह्मणे धींग वाहाती मारग । अंगा आलें मग हालों नेदी ॥3॥
1558
संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥1॥ ह्मणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥ भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥2॥ तुका ह्मणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥3॥
1559
संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥1॥ हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥ ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥2॥ तुका ह्मणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥3॥
1560
जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥1॥ ते काय गुण लागती येरां । कागा पिंजरा शोभेना ॥ध्रु.॥ शिकविलें तें सुजात सोसी । मग तयासी मोल चढे ॥2॥ तुका ह्मणे वेषधारी ॥ हिजडएा नारी नव्हती ॥3॥
1561
वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥1॥ नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥ फुगातें काउळें । ह्मणे मी राजहंसा आगळें ॥2॥ गजाहूनि खर । ह्मणे चांगला मी फार ॥3॥ मुलाम्याचें नाणें । तुका ह्मणे नव्हे सोनें ॥4॥
1562
मुH होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥1॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥2॥ तुका ह्मणे वांयां गेलें वांयां विण । जैसा मृगशीण मृगजळीं ॥3॥
1563
पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत ॥1॥ राही रखुमाइऩ सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ध्रु.॥ उद्धव अक्रूर व्यास आंबॠषि । भाइऩ नारदासी गौरवीन ॥2॥ गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचें कवतुक वाटे मज ॥3॥ मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥4॥ निवृित्त Yाानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥5॥ नागोजन मित्रा नरहरि सोनारा । रोहिदास कबिरा सोइऩिरया ॥6॥ परसो भागवता सुरदास सांवता । गाइऩन नेणतां सकळांसी ॥7॥ चोखामेळा संत जिवाचे सोइरे । न पडे विसर यांचा घडी ॥8॥ जीवींच्या जीवना एका जनादऩना । पाटका कान्हया मिराबाइऩ ॥9॥ आणीक हे संत महानुभाव मुनि । सकळां चरणीं जीव माझा ॥10॥ आनंदें ओविया गाइऩन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥11॥ तुका ह्मणे माझा बिळया बापमाय । हरुषें नांदों सये घराचारी ॥12॥
1564
पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोदेशीं ॥1॥ पोटाभेणें जिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ॥ध्रु.॥ जप तप अनुष्ठान। पोटासाटीं जाले दीन ॥2॥ पोटें सांडियेली चवी । नीचापुढें तें नाचवी ॥3॥ पोट काशियानें भरे । तुका ह्मणे झुरझुरूं मरे ॥4॥
आरत्या ॥ 13 ॥ 1565
जगदेश जगदेश तुज ह्मणती । परि या जनामाजी असशील युिH । पुण्यपापविरहित सकळां अधिपति । दृष्टा परि नळणी अलिप्त गति ॥1॥ जय देव जय देव जय पंढरिनाथा । श्रीपंढरिनाथा । नुरे पाप विठ्ठल ह्मणतां सर्वथा ॥ध्रु.॥ आगम निगम तुज नेणती कोणी । परि तूं भाव भिH जवळी च दोन्ही । नेणतां विधियुH राते पूजेनी । न माये ब्रह्मांडीं संपुष्टशयनीं ॥2॥ असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरी मुखएक चावितो धुडें । भHा शरणागता चाले तो पुढें । दावी वाट जाऊ नेदी वांकडें ॥3॥ एकाएकीं बहु विस्तरला सुखें । खेळे त्याची लीळा तो चि कवतुकें। तेथें नरनारी कवण बाळकें । काय पापपुण्य कवण सुखदुःखें ॥4॥
सकळा वर्मां तूं चि जाणशी एक । बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुखदुःख।
जाणों ह्मणतां तुज टकलीं बहुतेकें । तुका ह्मणे शरण आलों मज राखें ॥5॥
1566
दैत्यभारें पीडिली पृथुवी बाळा । ह्मणोनि तूज येणें जालें गोपाळा । भिHप्रतिपाळक उत्सव सोहळा । मंगळें तुज गाती आबळ बाळा ॥1॥ जय देव जय देव जय गरुडध्वजा । श्रीगरुडध्वजा। आरती ओवाळूं तुज भHीकाजा ॥ध्रु.॥ गुण रूप नाम नाहीं जयासी। चिंतितां तैसा चि होसी तयांसी । मत्स्य कूर्म वराह नरसिंह जालासी। असुरां काळ मुणि ठाके ध्यानासी ॥2॥ सहजर रूपें नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेती ह्मणती तुज विश्वंभरा। जीवनां जीवन तूं चि होसी दातारा । न कळे पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥3॥ संतां महंतां घरीं ह्मणवी ह्मणियारा । शंखचक्रगदाआयुधांचा भारा । सुदर्शन घरटी फिरे अवश्वरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥4॥ भावेंविण तुझें न घडे पूजन । सकळ ही गंगा जाल्या तुजपासून । उत्पित्त प्रळय तू चि करिसी पाळण । धरूनि राहिला तुका निश्चयीं चरण ॥5॥
1567
काय तुझा महिमा वणूप मी किती । नामें मात्रे भवपाश तुटती । पाहातां पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळां सहित जे उद्धरती ॥1॥ जय देव जय देव जय पंढरिराया । श्रीपंढरिराया। करुनियां कुरवंडी । सांडीन काया ॥ध्रु.॥ मंगळआरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाहीं उपमा । श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥2॥ धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी । विष्णूचें पूजन एकाभावेंसी। नित्यमुH पूज्य तिहीं लोकांसी ॥3॥ न वजे वांयां काळ जे तुज ध्याती । असे तुझा वास तयांच्या चित्तीं । धालें सुखें सदा प्रेमें डुल्लती । तीथॉ मिळन वास तयांचा वाहाती ॥4॥ देव भH तूं चि जालासी दोन्ही । वाढावया सुख भिH हे जनीं । जड जीवां उद्धार होय लागोनि । शरण तुका वंदी पाउलें दोन्ही ॥5॥
1568
कंसरायें गर्भ वधियेले सात । ह्मणोनि गोकुळासी आले अनंत । घ्यावया अवतार जालें हें चि निमित्य । असुर संहारूनि तारावे भH ॥1॥ जय देव जय देव जय विश्वरूपा । श्रीविश्वरूपा । ओवाळीन तुज देहदीपें बापा ॥ध्रु.॥ स्थूळरूप होऊनि धरितसे सानें । जैसा भाव तैसा तयांकारणें । दैत्यांसी भासला सिहीं गजान । काळासी महाकाळ यशोदेसी तान्हें ॥2॥ अनंत वर्णी कोणा न कळे चि पार । सगुण कीं निर्गुण हा ही निर्धार । पांगलीं साइऩ अठरा करितां वेव्हार । तो विळतसे गौिळयांचें खिल्लार ॥3॥ तेहतिस कोटि तिहीं देवांसी श्रेष्ठ । पाउलें पाताळीं नेणती स्वर्ग मुगुट । गििळलीं चौदा भूवनें तरि न भरे चि पोट । तो खाउन धाला गोपाळाचें उिच्छष्ट ॥4॥ महिमा वणूप तरि पांगलिया श्रुति । सिणला शेष चिरल्या जिव्हा करितां स्तुती । भावेंविण कांहीं न चले चि युिH । राखें शरण तुकयाबंधु करी विनंती ॥5॥
1569
परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरि मेघश्यामा । अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥1॥ जय देव जय देव जया जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥ध्रु.॥ गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा। गिरिधरकर भवसागरतारक दधिमथना । मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनवत्सळ सकळां मूळ जय जयनिधाना ॥2॥ विश्वंभरा सर्वेश्वर जगदाधारा । चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा । सुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यमूतिऩ मनोहरा ॥3॥ गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना सुरहरवरगौरी। नंदा नंदनवंदन त्रिभुवनांभीतरी । अनंतनामीं ठसा अवतारांवरी ॥4॥ सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संतां । भगवाना भगवंता कालकृदांता। उत्पित्तपाळणपासुन संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारीं रिति बहुतां ॥5॥
1570
पंढरि पुण्यभूमी भीमा दिक्षणावाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा महा पातकां धुनी । उतरलें वैकुंठमहासुख मेदिनी ॥1॥ जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा । आरती ओंवाळीन तुह्मां लIमीकांता ॥ध्रु.॥ नित्य नवा सोहळा हो महावाद्यां गजर । सन्मुख गरुड पारीं उभा जोडुनि कर । मंडितचतुर्भुजा कटीं मिरवती कर ॥2॥ हरिनाम कीर्तन हो आनंद महाद्वारीं । नाचती प्रेमसुखें नर तेथिंच्या नारी । जीवन्मुH लोक नित्य पाहाती हरी ॥3॥ आषाढी कातिऩकी हो गरुडटकयां भार । गर्जती नाम घोष महावैष्णववीर । पापासी रीग नाहीं असुर कांपती सुर ॥4॥ हें सुख पुंडलिकें कसें आणिलें बापें । निर्गुण साकारले आह्मांलागिं हें सोपें । ह्मणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखें ॥5॥
1571
अवतार गोकुळीं हो जन तारावयासी । लावण्यरूपडें हे तेजपुंजाळरासी । उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरां मही थोर मानसीं ॥1॥ जय देवा कृष्णनाथा जय रखुमाइऩकांता। आरती ओंवाळीन तुह्मां देवकीसुता । जय देवा कृष्णनाथा ॥ध्रु.॥ वसुदेवदेवकीची बंद फोडुनी शाळ । होउनि विश्वजनिता तया पोटिंचा बाळ । दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राजया उग्रसेना केला मथुरापाळ ॥2॥ राखतां गोधनें हो इंद्र कोपला वरि । मेघ जो कडाडिला शिळा वर्षतां धारीं । राखिलें गोकुळ हें नखीं धरिला गिरी। निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥3॥ कौतुक पाहावया माव ब्रह्म्यानें केली । वत्सें चोरोनियां सत्यलोकासि नेलीं । गोपाळ गाइऩवत्सें दोहीं ठायीं राखीलीं । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माउली ॥4॥ तारिलें भHजना दैत्य निदाऩळूनि । पांडवां साहकारी आडल्यां निर्वाणी । गुण मी काय वणूप मति केवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव देइप चरणीं ॥5॥
1572
सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरी रेख । मस्तकीं मुगुट कानीं कुंडलां तेज फांके। आरH दंत हिरे कैसे शोभले निके ॥1॥ जय देवा चुतर्भुजा जया लावण्यतेजा । आरती ओवाळीन भवतारिया हा वोजा । जय. ॥ध्रु.॥ उदार जुंझार हा जया वाणिती श्रुति । परतल्या नेति ह्मणती तयां न कळे गति । भाट हा चतुर्मुखें अनुवाद करिती । पांगलीं साही अठरा रूप न गति ॥2॥ ऐकोनि रूप ऐसें तुजलागीं धुंडिती। बोडके नग्न एक निराहार इऩित । साधनें योग नाना तपें दारुण किती। सांडिलें सुख दिली संसारा शांती ॥3॥ भरूनि माजी लोकां तिहीं नांदसि एक। कामिनी मनमोहना रूप नाम अनेक । नासति नाममात्रें भवपातकें शोक । पाउलें वंदिताती सिद्ध आणि साधक ॥4॥ उपमा द्यावयासी दुजें काय हें तुज । तkवासि तkवसार मूळ जालासी बीज । खेळसि बाळलीळा अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडोनि तुज ॥5॥
1573
सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ । झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरवलिं मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥1॥ जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाइऩवरा । आरती करीन काया । ओंवािळन सुंदरा । जय. ॥ध्रु.॥ गोजिरें ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी । हृदयीं ब्रह्मपद बाणलें शृंगारीं । गर्जति चरणीं वांकी कंठ कोकिळास्वरीं ॥2॥ घवघवित उटी अंगीं बावन चंदनांची । लल्हाट कस्तुरिचा कास पितांबरीची । कटिसूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची। संगीत सकळ मुद्रा पाउलें कुंकुमाचीं ॥3॥ सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सळ विश्व लाविलें ध्यानीं । आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥4॥ वणिऩतां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती । उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूतिऩ । तुकयाबंधु ह्मणे स्तवूं मी काय किती ॥5॥
1574
महा जी महादेवा महाकाळमदऩना । मांडियेलें उग्रतप महादीप्त दारुणा । परिधान व्याघ्रांबर चिदाभस्मलेपना । स्मशान क्रीडास्थळ तुह्मा जी त्रिनयना ॥1॥ जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा। आरती ओंवािळन कैवल्यदातारा । जय. ॥ध्रु.॥ रुद्र हें नाम तुह्मां उग्र संहारासी । शंकर शिव भोळा उदार सर्वस्वीं । उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देसी । आपुलें पद दासां ठाव देइप कैलासीं ॥2॥ त्रैलोक्यव्यापका हो जन आणि विजन । विराटस्वरूप हें तुझें साजिरें ध्यान । करितो वेद स्तुती कीर्ती मुखें आपण । जाणतां नेणवे हो तुमचें महिमान ॥3॥ बोलतां नाम महिमा असे आश्चर्य जगीं । उपदेश केल्यानंतरें पापें पळती वेगीं । हरहर वाणी गर्जे प्रेम संचरे अंगीं । राहिलि दृष्टी चरणीं रंग मीनला रंगीं ॥4॥ पुजूनि लिंग उभा तुका जोडोनी हात। करिती विYाापना परिसावी हे मात । अखंड राहूं द्यावें माझें चरणीं चित्त । घातले साष्टांग मागे मस्तकीं हात ॥5॥
1575
अवतारनामभेद गणा आदि अगाद । जयासि पार नाहीं पुढें खुंटला वाद । एक चि दंत शोभे मुख विक्राळ दोंद । ब्रह्मांडामाजि दावी अनंत हे छंद ॥1॥ जय जया गणपती ओंवािळत आरती । साजिया सरळ भुजा फरशकमळ शोभती ॥ध्रु.॥ हे मही ठेंगणी हो तुज नृत्यनायका । भोंवरि फेर देतां असुर मदिले एकां । घातले तोडरीं हो भHजनपाळका । सहस्र नाम तुज भुिHमुिHदायका ॥2॥ सुंदर शोभला हो रूपें लोपलीं तेजें । उपमा काय देऊं असे आणिक दुजें । रविशशितारागणें जयामाजी सहजें । उदरी सामावलीं जया ब्रह्मांडबीजें ॥3॥ वणिऩता शेष लीळा तया भागलीं मुखें । पांगुळले वेद चारी कैसे राहिले सुखें । अवतार जन्मला हो लिंगनाभी या मुखें । अमूर्त मूतिऩमंत होय भHीच्या सुखें ॥4॥ विश्व हें रूप तुझें हस्त पाद मुखडें । ऐसा चि भाव देइप तया नाचतां पुढें । धूप दीप पंचारति ओंवािळन निवाडें । राखें या शरणागता तुका खेळतां लाडें ॥5॥
1576
कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥1॥ ओंवाळूं गे माये सबाहए साजिरा । राहिरखुमाइऩसत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥ मंडितचतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें। श्रीमुखाची शोभा पाहातां तेज फांकलें ॥2॥ वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥3॥ सांवळा सकुमार जैसा कदऩळीगाभा । चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥4॥ ओंवािळतां मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृिष्ट समाधि तुकया लागली पायीं ॥5॥
1577
भHीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओंवाळूं आरती ॥1॥ ओंवाळू आरती माझ्या पंढरीनाथा। दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥ध्रु.॥ काय महिमा वणूप आतां सांगणें तें किती । कोटि ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥2॥ राही रखुमाइऩ दोही दों बाही । मयूर पिच्छचामरें ढािळति ठायीं ठायीं ॥3॥ तुका ह्मणे दीप घेऊनि उन्मनति शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥4॥
॥13॥
1578
धन्य दिवस आजि दरुषण संतांचें । नांदे तया घरीं दैवत पंढरीचें ॥1॥ धन्य पुण्य रूप कैसा जालें संसार । देव आणि भH दुजा नाहीं विचार ॥ध्रु.॥ धन्य पूर्व पुण्य वोडवलें निरुतें । संतांचें दर्शन जालें भाग्यें बहुतें ॥2॥ तुका ह्मणे धन्य आह्मां जोडली जोडी । संतांचे चरण आतां जीवें न सोडीं ॥3॥
1579
गाऊं वाणूं तुज विठो तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद ॥1॥ आनंद रे विठोबा जाला माझे मनीं। देखिले लोचनीं विटेसहित पाउले ॥ध्रु.॥ न करीं तपसाधनें रे मुHीचे सायास । हा चि जन्मोजन्मी गोड भHीचा रस ॥2॥ तुका ह्मणे आह्मां प्रेमा उणें तें काइऩ । पंढरीचा राणा सांटविला हृदयीं ॥3॥
1580
मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥1॥ या संतांसी निरवीं हें मज देइप । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥2॥ तुका ह्मणे आतां उदार होइप । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥3॥
स्वामींनीं काया ब्रह्म केली ते अभंग ॥ 24 ॥ 1581
शोधितां चि नये । ह्मणोनि वोळगतों पाये ॥1॥ आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥ परतोनि मन । गेलें ठायीं चि मुरोन ॥2॥ विसरला तुका । बोलों चालों जाला मुका ॥3॥
1582
रज्जुसर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥1॥ ह्मणोनि आठवती पाय । घेतों आलाय बलाय ॥ध्रु.॥ द्रुश द्रुमाकार लाणी। केलों सर्व सासी धणी ॥2॥ तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥3॥
1583
ह्मणवितों दास । परि मी असें उदास ॥1॥ हा चि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥ध्रु.॥ सरतें कर्तुत्व माझ्यानें । परि मी त्याही हून भिन्न ॥2॥ तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥1॥
1584
घोंटवीन लाळ ब्रह्मYाान्या हातीं । मुHां आत्मिस्थती सांडवीन ॥1॥ ब्रह्मभूत होते काया च कीर्तनीं । भाग्य तरी ॠणी देवा ऐसा ॥ध्रु.॥ तीर्थ भ्रमकासी आणीन आळस । कडु स्वर्गवास करिन भोग ॥2॥ सांडवीन तपोनिधा अभिमान । यYा आणि दान लाजवीन ॥3॥ भिHभाग्यप्रेमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निजठेवा ॥4॥ धन्य ह्मणवीन येहे लोकीं लोकां । भाग्य आह्मीं तुका देखियेला ॥5॥
1585
संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आह्मी या कीर्तनें शुद्ध जालों ॥1॥ आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥ ब्रह्मपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रह्मरस सेवूं सदा ॥3॥
1586
तुह्मी सनकादिक संत । ह्मणवितां कृपावंत ॥1॥ एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥ध्रु.॥ भाकूनि करुणा । विनवा वैकुंठींचा राणा ॥2॥ तुका ह्मणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥3॥
1587
आपुल्या माहेरा जाइऩन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥1॥ सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥ करुनी सिद्ध मूळ साउलें भातुकें । येती दिसें एकें न्यावयासी ॥2॥ त्या चि पंथें माझें लागलेंसे चित्त । वाट पाहें नित्य माहेराची ॥3॥ तुका ह्मणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप ॥4॥
1588
चिन्हें उमटताती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥1॥ आठवला बापमाय । येइल काय मूळ नेणों ॥ध्रु.॥ उत्कंठित जालें मन । ते चि खुण तेथींचि ॥2॥ तुका ह्मणे काम वारीं । आळस घरीं करमेना ॥3॥
1589
आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥1॥ आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ध्रु.॥ दळीं कांडीं लोकांऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥2॥ तुका ह्मणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥3॥
1590
येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥1॥ दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥ भूक भुके चि खाउनि धाय । नाहीं हाय अन्नाची ॥2॥ तुका ह्मणे सुख जालें । अंतर धालें त्यागुणें ॥3॥
1591
पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥1॥ गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी ह्मणे त्वरे ॥ध्रु.॥ मुगुटकुंडलांच्या दीिप्त । तेजें लोपला गभिस्त ॥2॥ मेघश्यामवर्ण हरि । मूतिऩ डोळस साजिरी ॥3॥ चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥4॥ पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥5॥ तुका जालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥6॥
1592
शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥1॥ ना भी ना भी भHराया । वेगीं पावलों सखया ॥ध्रु.॥ दुरूनि येतां दिसे दृष्टी। धाकें दोष पळती सृष्टी ॥2॥ तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरि आला ॥3॥
1593
पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥1॥ आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा । सुख वाटे मना । डोळे बाहएा स्फुरती ॥ध्रु.॥ उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥2॥ तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥3॥
1594
चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे ॥1॥ तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं । फेडावया धणी । प्रेमसुखाची आजि ॥ध्रु.॥ पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥2॥ आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥3॥
1595
पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥1॥ काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर । कण्या दरदर । पाण्यामाजी रांधिल्या ॥ध्रु.॥ घरीं मोडकिया बाजा । वरि वाकळांच्या शेजा ॥2॥ मुखशुिद्ध तुळसी दळ । तुका ह्मणे मी दुर्बळ ॥3॥
1596
संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥1॥ कांहीं ठेविलें चरणीं । घेतीं तें चि पुरवूनि । तुका पायवणी । घेऊनियां निराळा ॥ध्रु.॥ नसतां कांहीं संचित । भेटी जाली अवचित ॥2॥ देव मिळोनियां भH । तुका केलासे सनाथ ॥3॥
1597
अवघियांच्या आलों मुळें । एका वेळे न्यावया ॥1॥ सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥ध्रु.॥ जोंवरि ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥2॥ मंगळाचे वेळे उभे । असों शोभे सावध ॥3॥ अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥4॥ तुका ह्मणे पाहें वाट । बहु आट करूनि ॥5॥
1598
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुह्मीं ॥1॥ कर्मधर्में तुह्मां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥ वाढवूनि दिलों एकाचिये हातीं । सकळ नििंश्चती जाली तेथें ॥2॥ आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥3॥ वाढवितां लोभ होइऩल उसीर । अवघींच िस्थर करा ठायीं ॥4॥ धर्म अर्थ काम जाला एके ठायीं । मेळविला जिंहीं हाता हात ॥5॥ तुका ह्मणे आतां जाली हे चि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥6॥
1599
बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥1॥ जातों आतां आYाा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आह्मी करूं कोठें ॥ध्रु.॥ न घडे यावरि न धरवे धीर । पीडतां राष्टध देखोनि जग ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी दिसे मोकलिलें । काय आतां आलें जीवित्वाचें ॥3॥
1600
करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥1॥ अवघें एकमय । राज्य बोलों चालों नये ॥ध्रु.॥ दुजयाची सत्ता । न चलेसी जाली आतां ॥2॥ आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला लोकां ॥3॥
1601
आह्मी जातों तुह्मी कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥1॥ वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥2॥ अंतकाळीं विठो आह्मांसी पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ॥3॥
1602
तुका उतरला तुकीं । नवल जालें तिहीं लोकीं ॥1॥ नित्य करितों कीर्तन । हें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ तुका बैसला विमानीं । संत पाहाती लोचनीं ॥2॥ देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठासी नेला ॥3॥
1603
न देखिजे ऐसें केलें । या विठ्ठलें दुःखासी ॥1॥ कृपेचिये सिंव्हासनीं । अधिष्ठानीं बैसविलें ॥ध्रु.॥ वाजता तो नलगे वारा क्षीरसागरा शयनीं ॥2॥ तुका ह्मणें अवघें ठायीं । मज पायीं राखिलें ॥3॥
1604
वाराणसीपयपत असों सुखरूप । सांगावा निरोप संतांसी हा ॥1॥ येथूनियां आह्मां जाणें निजधामा । सवें असे आह्मां गरुड हा ॥2॥ कृपा असों द्यावी मज दीनावरी । जातोंसों माहेरी तुका ह्मणे ॥3॥ ॥24॥ शखे 1571 एकाहत्तरीं विरोधनामसंवत्सरीं फालगुनवद्य द्वितीया सोमवासरीं प्रथमप्रहरीं तुकोबा गुप्त जाले ॥1॥
1605
जाती पंढरीस । ह्मणे जाइपन तयांस ॥1॥ तया आहे संवसार । ऐसें बोले तो माहार ॥ध्रु.॥ असो नसो भाव । जो हा देखे पंढरिराव ॥2॥ चंद्रभागे न्हाती । तुका ह्मणे भलते याती ॥3॥
1606
धरियेलीं सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥1॥ तें हें ब्रह्म विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥ अंतर व्यापी बाहे । धांडोिळतां कोठें नोहे ॥2॥ योगयागतपें । ज्याकारणें दानजपें ॥3॥ दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥4॥ अवघी लीळा पाहे । तुका ह्मणे दासां साहे ॥5॥
1607
ज्याचे गर्जतां पवाडे । किळकाळ पायां पडे ॥1॥ तो हा पंढरीचा राणा । पुसा सा चौं अठरा जणां ॥ध्रु.॥ चिंतितां जयासी । भुिHमुिH कामारी दासी ॥2॥ वैकुंठासी जावें । तुका ह्मणे ज्याच्या नांवें ॥3॥
1608
ज्याचे गर्जतां पवाडे । श्रुतिशास्त्रां मौन्य पडे ॥1॥ तेथें माझी वाचा किती । पुरे करावया स्तुती ॥ध्रु.॥ सिणलें सहजर तोंडें । शेषाफणी ऐसें धेंडें ॥2॥ तुका ह्मणे मही । पत्र सिंधु न पुरे शाही ॥3॥
1609
देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥1॥ न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥ न चुके वाट न पडे फंदीं । नव्हे कधीं कधीं यमबाधा ॥2॥ तुका ह्मणे नारायण । येता गोऑया वारी वाण ॥3॥
1610
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥1॥ दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥ पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे द्रौपदीचा धांवा । केला तैसा मला पावें आतां ॥3॥
1611
कोठें गुंतलासी कोणांच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज ॥1॥ कोठें गुंतलासी भिHप्रेमसुखें । न सुटेती मुखें गोपिकांचीं ॥ध्रु.॥ काय पडिलें तुज कोणाचें संकट । दुरी पंथ वाट न चालवे ॥2॥ काय माझे तुज गुण दोष दिसती । ह्मणोनि श्रीपती कोपलासी ॥3॥ काय जालें सांग माझिया कपाळा । उरला जीव डोळां तुका ह्मणे ॥4॥
1612
परस्त्रीतें ह्मणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥1॥ काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥ धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्टएा हाते नुडवी काग ॥2॥ जें जें कर्म वसे अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥3॥ बोले तैसा चाले । तुका ह्मणे तो अमोल ॥4॥
1613
असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥1॥ जाइऩल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥ध्रु.॥ वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाटीं गेला ॥2॥ तुका ह्मणे आतां सांभळा रे पुढें । अंतरिंचे कुडें देइल दुःख ॥3॥
1614
जळों त्याचें तोंड । ऐसी कां ते व्याली रांड ॥1॥ सदा भोवयासी गांठी । क्रोध धडधडीत पोटीं ॥ध्रु.॥ फोडिली गोंवरी। ऐसी दिसे तोंडावरी ॥2॥ तुका ह्मणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥3॥
1615
तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार ॥1॥ एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणें ॥ध्रु.॥ कुले घालूनि उघडे। रागें पाहे लोकांकडे ॥2॥ खेळे जुतकर्म । मग बोंबली जुलूम ॥3॥ निजतां आला मोहो । वीतां ह्मणे मेला गोहो ॥4॥ तुका ह्मणे त्यांनीं। मनुष्यपणा केली हानी ॥5॥
1616
पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥1॥ तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥ सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥2॥ तुका ह्मणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥3॥
1617
पंडित ह्मणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥1॥ काय करावें घोकिलें । वेदपठण वांयां गेलें ॥ध्रु.॥ वेदीं सांगितलें तें न करी । सम ब्रह्म नेणे दुराचारी ॥2॥ तुका देखे जीवीं शिव । हा तेथींचा अनुभव ॥3॥
1618
पंडित तो चि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥1॥ अवघें सम ब्रह्म पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥ रिता नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं वासुदेव ॥2॥ तुका ह्मणे तो चि दास। त्यां देखिल्या जाती दोष ॥3॥
1619
ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण ॥1॥ नका करूं नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥ध्रु.॥ अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥2॥
तुका ह्मणे वाणी । सुखें वेचा नारायणीं ॥3॥
1620
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥1॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥ विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥2॥ विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥3॥
1621
काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥1॥ काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ध्रु.॥ काय तुझें आह्मां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ॥2॥ तुका ह्मणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥3॥
1622
संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥1॥ त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥ संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥2॥ तुका ह्मणे तो नष्ट। जाणा गाढव तो स्पष्ट ॥3॥
1623
आलें देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना ॥1॥ हरिश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरीं पाणी ॥ध्रु.॥ पांडवांचा साहाकारी। राज्यावरोनि केले दुरी ॥2॥ तुका ह्मणे उगेचि राहा । होइऩल तें सहज पाहा ॥3॥
1624
निजल्यानें गातां उभा नारायण । बैसल्या कीर्तन करितां डोले ॥1॥ उभा राहोनियां मुखीं नाम वदे । नाचे नाना छंदें गोविंद हा ॥ध्रु.॥ मारगीं चालतां मुखीं नाम वाणी । उभा चक्रपाणी मागें पुढें ॥2॥ तुका ह्मणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाटीं ॥3॥
1625
काम क्रोध आह्मी वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥1॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥ रििद्धसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥2॥ तुका ह्मणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रह्मांडाचा ॥3॥
1626
उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥1॥ तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥ध्रु.॥ अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥2॥ तुका ह्मणे काला । कोठें अभेद देखिला ॥3॥
1627
पंढरी पंढरी । ह्मणतां पापाची बोहोरी ॥1॥ धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्साव ॥ध्रु.॥ रििद्धसिद्धी लोटांगणीं। प्रेमसुखाचिया खाणी ॥2॥ अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ ह्मणे तुका ॥3॥
1628
भार घालीं देवा । न लगे देश डोइऩ घ्यावा ॥1॥ देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥ व्यवसाय निमित्त। फळ देतसे संचित ॥2॥ तुका ह्मणे फिरे । भोंवडीनें दम जिरे ॥3॥
1629
भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥1॥ शांती धरणें जिवासाटीं । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥ देह लेखावें असार । सत्य परउपकार ॥2॥ तुका ह्मणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रह्मरसी ॥3॥
1630
येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय ॥1॥ मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥ ऐकोनि मरसी कथा। जंव आहेसि तुं जीता ॥2॥ हुरमतीची चाड । तेणें न करावी बडबड ॥3॥ पुसेल कोणी त्यास । जा रे करीं उपदेश ॥4॥ आह्मी विठ्ठलाचे वीर । फोडूं किळकाळाचें शीर ॥5॥ घेऊं पुढती जन्म । वाणूं कीर्त मुखें नाम ॥6॥ तुका ह्मणे मुHी । नाहीं आस चि ये चित्ती ॥7॥
1631
आनुहातीं गुंतला नेणे बाहए रंग । वृित्त येतां मग बळ लागे ॥1॥ मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले आवेव आवरितां ॥ध्रु.॥ आणिकांची वाणी वेद तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥2॥ तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥3॥ तुका ह्मणे बाहए रंग तो विठ्ठल । अंतर निवालें ब्रह्मरसें ॥4॥
1632
ब्रह्मरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली सकळ ज्यांची ॥1॥ नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥ मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काइऩ निजसुखा ॥2॥ तीं चि पुण्यवंतें परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥3॥ तुका ह्मणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥ 4॥
1633
जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥1॥ दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ध्रु.॥ मागों नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावों कांहीं ॥2॥ तुका ह्मणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें मानेना हें ॥3॥
1634
आह्मां हरिच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रैलोकीं ॥1॥ देव उभा मागें-पुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥ जैसा केला तैसा होय। धांवे सोय धरोनि ॥2॥ तुका ह्मणे असों सुखें । गाऊं मुखें विठोबा ॥3॥
1635
परद्रव्यपरनारीचा अभिळास । तेथूनि हारास सर्वभाग्या ॥1॥ घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥ पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥2॥ तुका ह्मणे एकां तडतांथवड । काळ लागे नाड परी खरा ॥3॥
1636
समर्थाचें केलें । कोणां जाइऩल मोडिलें ॥1॥ वांयां करावी ते उरे । खटपटें सोस पुरे ॥ध्रु.॥ ठेविला जो ठेवा । आपुलाला तैसा खावा ॥2॥ ज्याचें त्याचें हातीं । भुके तयाची फजिती ॥3॥ तुका ह्मणे कोटी । बाळे जाले शूळ पोटी ॥4॥
1637
हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥1॥ याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥ देऊनियां जीव। बळी साधिला हा ठाव ॥2॥ तुका ह्मणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥3॥
1638
नेणे गति काय कवण अधोगति । मानिली नििंश्चती तुझ्या पायीं ॥1॥ कर्म धर्म कोण नेणें हा उपाव । तुझ्या पायीं भाव ठेवियेला ॥ध्रु.॥ नेणें निरसं पाप पुण्य नेणें काय । ह्मणऊनि पाय धरिले तुझे ॥2॥ वेडा मी अविचार न कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥3॥ तुका ह्मणे तुज करितां नव्हे काय । माझा तो उपाय कवण तेथें ॥4॥
1639
तुझा ह्मणऊनि जालों उतराइऩ । त्याचें वर्म काइऩ तें मी नेणें ॥1॥ हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा ॥ध्रु.॥ देवभHपण करावें जतन । दोहीं पक्षीं जाण तूं चि बळी ॥2॥ अभिमानें तुज लागली हे लाज । शरणागतां काज करावया ॥3॥ तुका ह्मणे बहु नेणता मी फार । ह्मणऊनि विचार जाणविला ॥4॥
1640
मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥1॥ सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥ पीतांबरें छाया करी लोभापर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥2॥ तुका ह्मणे हें चि करावें जीवन । वाचे नारायण तान भूक ॥3॥
1641
जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥1॥ ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो पातकांची राशी ॥ध्रु.॥ सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥2॥ तुका ह्मणे भय । करा जवळी तें नये ॥3॥
1642
अंतरींचें जाणां । तरि कां येऊं दिलें मना ॥1॥ तुमची करावी म्यां सेवा । आतां अव्हेरितां देवा ॥ध्रु.॥ नव्हती मोडामोडी । केली मागें ते चि घडी ॥2॥ तुका ह्मणे दिला वाव । पायीं लागों दिला भाव ॥3॥
1643
पवित्र होइऩन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥1॥ आपुरती बुिद्ध पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥ गाइऩन ओविया शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्या या ॥2॥ तुका ह्मणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥3॥
1644
काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥1॥ कोणे तरी काळें होइऩल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥ शता एकातरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटीं होइल दया ॥2॥ तुका ह्मणे नाहीं फांकों तरी देत । सर्वांचें उचित सांपडलें ॥3॥
1645
नाहीं कोणी दिस जात वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिका चि ॥1॥ एकाचिये माथां असावें निमित्त । नसो नाहीं हित कपाळीं तें ॥ध्रु.॥ कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥2॥ तुका ह्मणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे नाहीं होइऩल ते ॥3॥
1646
काय करील तें नव्हे विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाहीं ॥1॥ मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे ॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें नासी गर्भवास । नेदी करूं आस आणिकांची ॥2॥ तुका ह्मणे नेणों किती वांयां गेले । तयां उद्धरिलें पांडुरंगें ॥3॥
1647
संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥1॥ किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥ माजल्या न कळे उचित तें काय । नेघावें तें खाय घ्यावें सांडी ॥2॥ तुका ह्मणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥3॥
1648
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥1॥ तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥ काय करावीं तें बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेलीं ॥2॥ तुका ह्मणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैशी सवें श्वगॉ ॥3॥
1649
सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुिद्ध मग ॥1॥ आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥ नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥2॥ तुका ह्मणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥3॥
वाराणसीस यात्रा चालली तेव्हां स्वामींनीं भागीरथीस पत्र धाडिलें - ते अभंग ॥ 4 ॥ 1650
परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥ भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये ॥ध्रु.॥ जीतां भुिH मोक्ष मरणें तुझ्या तिरीं । अहिक्यपरत्री सुखरूप ॥2॥ तुका विष्णुदास संतांचें पोसनें । वागपुष्प तेणें पाठविलें ॥3॥
1651
तुह्मी विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥1॥ कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥ काय उणें तुह्मांपाशीं। मी तों अल्पें चि संतोषी ॥2॥ तुका ह्मणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥3॥
1652
पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं ॥1॥ माझें जालें गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥ केलें कर्मांतर । बोंब मारिली हरिहर ॥2॥ तुका ह्मणे माझें । भार उतरलें ओझें ॥3॥ ॥3॥
1653
मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥1॥ तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥ नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥2॥ जीवींचें ते जाणा । तुका ह्मणे नारायणा ॥3॥
1654
जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥1॥ हरूनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥ दावूनियां रूप डोळां। मन चाळा लावियेलें ॥2॥ आणीक तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥3॥ बोलिल्याचा आठव न घडे । वाणी ओढे ते सोइऩ ॥4॥ तुका ह्मणे प्रेमधगी । भरली अंगीं अखंड ॥5॥
1655
नको ऐसें जालें अन्न । भूक तान ते गेली ॥1॥ गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥ राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥2॥ देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥3॥ जाऊं नेदीं करितां सोस । क्षेमा दोष करवीन ॥4॥ तुका ह्मणे या च पाठी । आता साटी जीवाची ॥5॥
1656
वाट पाहें हरि कां नये आझूनि । निष्ठ कां मनीं धरियेलें ॥1॥ काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ध्रु.॥ नाहीं माझा धांवा पडियेला कानीं । कोठें चक्रपाणी गुंतलेती ॥2॥ नाही आलें कळों अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥3॥ बहुता दिसांचें राहिलें भातुकें । नाहीं कवतुकें कृवािळलें ॥4॥ तुका ह्मणे देइप एकवेळा भेटी । शीतळ हें पोटीं होइल मग ॥5॥
1657
नाहीं दिलें कधीं कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥1॥ ह्मणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ध्रु.॥ वेळोवेळां वाचे आठवितों नाम । अधिक चि प्रेम चढे घेतां ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥3॥
1658
आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रह्मरस ॥1॥ सुखें सेवीन अमृत । ब्रह्मपदींचें नििश्चत ॥ध्रु.॥ तुमचा निज ठेवा । आह्मी पाडियेला ठावा ॥2॥ तुका ह्मणे देवरांया । आतां लपालेती वांयां ॥3॥
1659
जेथें जेथें जासी । तेथें मज चि तूं पासी ॥1॥ ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥ चित्त जडलें पायीं । पाळती हें ठायीं ठायीं ॥2॥ तुका ह्मणे पोटीं । देव घालुनि सांगें गोष्टी ॥3॥
1660
सांपडला हातीं । तरी जाली हे नििंश्चती ॥1॥ नाहीं धांवा घेत मन । इंिद्रयांचें समाधान ॥ध्रु.॥ सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥2॥ तुका ह्मणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥3॥
1661
मुिHपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥1॥ बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि ते चि अंतीं अवसान ॥ध्रु.॥ भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तो चि गाती ॥2॥ बळ बुिद्ध त्यांची उपकारासाटीं । अमृत तें पोटी सांटवलें ॥3॥ दयावेंत तरी देवा च सारिखीं । आपुलीं पारखीं नोळखती ॥4॥ तुका ह्मणे त्यांचा जीव तो चि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ॥5॥
1662
सेवीन उिच्छष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन जोडा ॥1॥ ऐसें जन्म आतां मज देइप देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥ त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीत ते शिरीं जाइन मागें ॥2॥ तुका ह्मणे येथें राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनियां ॥3॥
1663
क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥1॥ आतां झडझडां चालें । देइप उचलूं पाउलें ॥ध्रु.॥ सांडीं हंसगती । बहु उत्कंठा हे चित्तीं ॥2॥ तुका ह्मणे आइऩ । श्रीरंगे विठाबाइऩ ॥3॥
1664
जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥1॥ कंठ कंठा मिळों देइप । माझा वोरस तूं घेइप ॥ध्रु.॥ नको पीतांबर । सांवरूं हे अळंकार ॥2॥ टाकीं वो भातुकें । लौकिकाचें कवतुकें ॥3॥ हातां पायां नको । कांहीं वेगळालें राखों ॥4॥ तुका ह्मणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥5॥
1665
कृपेचा ओलावा । दिसे वेगळा चि देवा ॥1॥ मी हें इच्छीतसें साचें । न लगे फुकटशाइऩ काचें ॥ध्रु.॥ जेणें जाय कळसा। पाया उत्तम तो तैसा ॥2॥ तुका ह्मणे घरीं । तुझ्या अवघिया परी ॥3॥
1666
दावूनियां कोणां कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं ॥1॥ तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥ रििद्धसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥2॥ उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळइऩ ॥3॥ दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥4॥ तुका ह्मणे पायांसाटीं । करीं आटी कळों द्या ॥5॥
1667
काय माता विसरे बाळा । कळवळा प्रीतीचा ॥1॥ आवडीनें गळां मिठी । घाली उठी बैसवी ॥ध्रु.॥ लावूं धांवे मुख स्तना । नये मना निराळें ॥2॥ भावंडाचें भातें दावी । आपुलें लावी त्यास जी ॥3॥ माझें थोडें त्याचें फार । उत्तर हें वाढवी ॥4॥ तुका ह्मणे नारायणा । तुह्मी जाणां बुझावूं ॥5॥
1668
तरीं आह्मी तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥1॥ आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येइप लवकरी धांवें नेटे ॥ध्रु.॥ पालवितों तुज उभी करोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥2॥ तुका ह्मणे तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥3॥
1669
करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥1॥ जाणतसां तुह्मीं रूपाचें लाघव । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥ काय ह्मणऊनि आलेती आकारा । आह्मां उजगरा करावया ॥2॥ तुका ह्मणे भीड होती आजिवरी । आतां देवा उरी कोण ठेवी ॥3॥
1670
धरूनि पालव असुडीन करें । मग काय बरें दिसे लोकीं ॥1॥ काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश ॥ध्रु.॥ अंतर पायांसी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदीं ॥2॥ रुसलेती तरी होइऩल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥3॥ सांपडलिया आधीं कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥4॥ तुका ह्मणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥5॥
1671
निष्ठा उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचा चि ॥1॥ तूं माझा जनिता तूं माझा जनिता । रखुमाइऩच्या कांता पांडुरंगा ॥ध्रु.॥ मुळींच्या ठेवण्यां आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों ॥2॥ पोटींच्या आठवा पडिला विसर । काहीं आला भार माथां तेणें ॥3॥ राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥4॥ तुका ह्मणे कांहीं बोलणें न लगे । आतां पांडुरंगे तूं मी ऐसें ॥5॥
1672
सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥1॥ सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥ अंतर तें नये दिसों । आतां सोस कासया ॥2॥ तुका ह्मणे जतन करूं । हें चि धरूं जीवेंसी ॥3॥
1673
मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥1॥ तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥ वाहों तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥2॥ तुका ह्मणे नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥3॥
1674
तुज नाहीं शिH । काम घेसी आह्मां हातीं ॥1॥ ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें नाहीं ॥ध्रु.॥ लपोनियां आड । आह्मां तुझा कैवाड ॥2॥ तुका ह्मणे तुजसाठी । आह्मां संवसारें तुटी ॥3॥
1675
तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥1॥ झडलें उरलें किती । आह्मी धरियेलें चित्तीं ॥ध्रु.॥ कळलासी नष्टा। यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥2॥ तुका ह्मणे बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥3॥
1676
भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥1॥ नये खंडों देऊं वाद । आह्मां भांडवलभेद ॥ध्रु.॥ शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं तुटी ॥2॥ तुका ह्मणे आळस । तो चि कारणांचा नास ॥3॥
1677
नव्हों गांढे आळसी । जो तूं आह्मांपुढें जासी ॥1॥ अरे दिलें आह्मां हातीं । वर्म वेवादाचें संतीं ॥ध्रु.॥ धरोनियां वाट। जालों शिरोमणि थोंट ॥2॥ तुका ह्मणे देवा । वाद करीन खरी सेवा ॥3॥
1678
तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥1॥ जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥ कुश्चीळ इंिद्रयें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥2॥ पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥3॥ पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥4॥ तुका ह्मणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥5॥
1679
ऐसें सत्य माझें येइऩल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥1॥ वचनांसारिखें तळमळी चित्त । बाहेरि तो आंत होइल भाव ॥ध्रु.॥ तरि मज ठाव द्यावा पायांपाशीं । सत्यत्वें जाणसी दास खरा ॥2॥ तुका ह्मणे सत्य निकट सेवकें । तरि च भातुकें प्रेम द्यावें ॥3॥
1680
आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥1॥ आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा ॥ध्रु.॥ आपुलें तें येथें काय चाले केलें । जोडावे ते भले हात पुढें ॥2॥ तुका ह्मणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होइऩल तें ॥3॥
1681
सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥1॥ हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥ चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥2॥ तुका ह्मणे कोणा। बोल ठेवितो शाहाणा ॥3॥
1682
आह्मी न देखों अवगुणां । पापी पवित्र शाहाणा ॥1॥ अवघीं रूपें तुझीं देवा । वंदूं भावें करूं सेवा ॥ध्रु.॥ मज मुHी सवें चाड । नेणें पाषाण धातु वाड ॥2॥ तुका ह्मणे घोटीं। विष अमृत तुजसाटीं ॥3॥
1683
मज नाहीं तुझ्या Yाानाची ते चाड । घेतां वाटे गोड नाम तुझें ॥1॥ नेणतें लेंकरूं आवडीचें तान्हें । बोलतों वचनें आवडीनें ॥ध्रु.॥ भHी नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाइऩ भार तुज ॥2॥ तुका ह्मणे नाचें निर्लज्ज होऊनि । नाहीं माझे मनीं दुजा भाव ॥3॥
1684
काय माझी संत पाहाती जाणीव । सर्व माझा भावत्यांचे पायीं ॥1॥ कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ध्रु.॥ बोबडा उत्तरीं ह्मणें हरिहरि । आणीक भीकारी नेणें दुजें॥2॥ तुका ह्मणे तुह्मी विठ्ठलाचे दास । करितों मी आस उिच्छष्टाची॥3॥
1685
जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रह्मांड भूषणु नारायण ॥1॥ सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥ गोडाचें ही गोड हर्षाचें ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥2॥ भावाचा निज भाव नांवांचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे ॥3॥ तुका ह्मणे जें हें साराचें हें सार । माझा अंगीकार तेणें केला ॥4॥
1686
आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥1॥ माय रखुमाइऩ पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥ बापुडा मी नव्हें दुर्बळ ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकांसी ॥2॥ दृष्ट नव्हों आह्मी अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥3॥ संवसार आह्मां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला धाकें ॥4॥ तुका ह्मणे जालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥5॥
1687
केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं ॥1॥ देव चि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाहए रंग ॥ध्रु.॥ त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना ॥2॥ तुका ह्मणे आपआपण्यां विचारा । कोण हा दुसरा सांगे तुह्मां ॥3॥
1688
हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥1॥ आवडी विठ्ठल गाइऩजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥ आणीकां अंतरीं निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥2॥ तुका ह्मणे बाण हा चि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥3॥
1689
हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरि ॥1॥ ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥ ज्याचें अंतर निर्मळ । त्याचें सबाहए कोमळ ॥2॥ तुका ह्मणे भावें । जिव्हें प्रेम वोसंडावें ॥3॥
1690
हरिची हरिकथा नावडे जया । अधम ह्मणतां तया वेळ लागे । मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥1॥ कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं। उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परिलाज लंड न धरी कांहीं ॥ध्रु.॥ ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी। देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥2॥ राम ह्मणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी । जन्मोजन्मींचा होइऩल नरकीं । तुका ह्मणे चुकी जरी यासी ॥3॥
1691
उपेिक्षला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आइऩिकली ॥1॥ आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥ माझ्या दोषासाटीं होइल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥2॥ तुका ह्मणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें चतुर्भुज ॥3॥
1692
आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥1॥ कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥ध्रु.॥ हातें जेवी एक मुखीं मागे घांस । माउली जयास तैसी बाळा ॥2॥ तुका ह्मणे माझें ध्यान विटेंवरी । तैसी च गोजिरी दिसे मूतिऩ ॥3॥
1693
धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥1॥ धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं । न पडों या वाहीं काळा हातीं ॥ध्रु.॥ ब्रह्मरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥2॥ तुका ह्मणे पोट धालें चि न धाये । खादलें चि खायें आवडीनें ॥3॥
1694
आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥1॥ न पुरे हा जन्म हें सुख सांटितां । पुढती ही आतां हें चि मागों ॥ध्रु.॥ मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतितां कोसपेणी ॥2॥ तुका ह्मणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तान ॥3॥
1695
नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । ह्मणऊनि मन िस्थरावलें ॥1॥ धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा ॥ध्रु.॥ शीतळ होऊनियां पावलों विश्रांती । न साहे पुढती घाली चित्ता ॥2॥ तुका ह्मणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें ॥3॥
1696
मायबापापुढें लाटिकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥1॥ कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरसे पांडुरंग ॥ध्रु.॥ नाहीं धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायीं च पाखर कविळते ॥2॥ तुका ह्मणे मज होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे ऐसें ॥3॥
1697
आठवों नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥1॥ मन धांवे तेथें तिचें चि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥ न लगे वोळावीं इंिद्रयें धांवतां । ठाव नाहीं रिता उरों दिला ॥2॥ तुका ह्मणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥3॥
1698
उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊनि तें ॥1॥ न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात ॥ध्रु.॥ नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाहीं द्वैताद्वैत ॥2॥ तुका ह्मणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाहए रूप ॥3॥
1699
आह्मां अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहों कंठीं ॥1॥ लाडिके डिंगर पंढरिरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥ आह्मां आणिकांची चाड चि नाहीं । सर्व सुखें पायीं विठोबाच्या ॥2॥ तुका ह्मणे आह्मी नेघों या मुHी । एकविण चित्तीं दुजें नाहीं ॥3॥
1700
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥1॥ डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥ संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥2॥ तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥3॥ जन्म नाहीं रे आणीक । तुका ह्मणे माझी भाक ॥4॥
1701
पैल घरीं जाली चोरी । देहा करीं बोंब ॥1॥ हाबा हाबा करिसी काये । फिराऊनि नेटएां वायें ॥ध्रु.॥ सांडुनियां शुद्धी। निजलासी गेली बुद्धी ॥2॥ चोरीं तुझा काढला बुर । वेगळें भावा घातलें दूर ॥3॥ भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥4॥ तुका ह्मणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥5॥
1702
किती वेळा खादला दगा । अझून कां जागसी ना ॥1॥ लाज नाहीं हिंडतां गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ध्रु.॥ सवें चोरा हातीं फांसे । देखतां कैसे न देखसी ॥2॥ तुका ह्मणे सांडिती वाट । तळपट करावया ॥3॥
1703
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥1॥ आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥ एके सांते सरिखीं वित्तें । हानि हित वेगळालीं ॥2॥ तुका ह्मणे हित धरा । नव्हे पुरा गांवढाळ ॥3॥
1704
निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥1॥ असो ज्याचें त्याचे त्याचे माथां । आपण करावी ते कथा ॥ध्रु.॥ उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥2॥ तुका ह्मणे धाक । तया इह ना परलोक ॥3॥
1705
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥1॥ केला न संडी कैवाड । जीवेंसाटीं तों हे होड ॥ध्रु.॥ धीर तो कारण । साहए होतो नारायण ॥2॥ तुका ह्मणे हरि । दासां रिक्षतो निर्धारीं ॥3॥
1706
हरिच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥1॥ राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥ हरिच्या दासां चिंता। अघटित हे वार्ता ॥2॥ खावे ल्यावें द्यावें । तुका ह्मणे पुरवावें ॥3॥
1707
दासां सर्व काळ । तेथें सुखाचे कल्लोळ ॥1॥ जेथें वसती हरिदास । पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥ फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥2॥ तुका ह्मणे घरीं । होय ह्मणियारा कामारी ॥3॥
1708
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥1॥ मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥ नाहीं निपराद । कोणां आह्मांमध्यें भेद ॥2॥ तुका ह्मणे मान । अवघें आमचें हें धन ॥3॥
1709
काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें ॥1॥ नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ध्रु.॥ काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥2॥ तुका ह्मणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥3॥
1710
आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥1॥ गोप्य धन वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी ॥ध्रु.॥ झणी दृिष्ट लागे आवडीच्या रसा । सेवूं जिरे तैसा आपणासी ॥2॥ तुका ह्मणे हें बहु सकुमार । न साहावे भार वचनाचा ॥3॥
1711
मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आह्मां जन्म घेणें युगायुगीं ॥1॥ विटे ऐसें सुख नव्हे भिHरस । पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥ देवा हातीं रूप धरविला आकार । नेदूं निराकार होऊं त्यासी ॥2॥ तुका ह्मणे चित्त निवांत राहिलें । ध्याइप तीं पाउलें विटेवरि ॥3॥
1712
नको बोलों भांडा । खीळ घालुन बैस तोंडा ॥1॥ ऐक विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥ध्रु.॥ प्रेमसुखा आड । काय वाजातें चाभाड ॥2॥ तुका ह्मणे हिता । कां रे नागवसी थीता ॥3॥
1713
अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न ह्मणावी ॥1॥ उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥ शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥2॥ तुका ह्मणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाइऩिवण नाहीं ॥3॥
1714
शूरां साजती हतियारें । गांढएां हासतील पोरें ॥1॥ काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥ पतिव्रते रूप साजे। सिंदळ काजळ लेतां लाजे ॥2॥
दासी पत्नी सुता । नव्हे सरी एक पिता ॥3॥
मान बुिद्धवंतां । थोर न मनिती पिता ॥4॥ तुका ह्मणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥5॥
1715
काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥1॥ हा तों ठायींचा विचार । आहे यातिवैराकार ॥ध्रु.॥ श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥2॥ तुका ह्मणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥3॥
1716
वाइटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥1॥ एकाविण एका । कैचें मोल होतें फुका ॥ध्रु.॥ विषें दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥2॥ कािळमेनें ज्योती । दिवस कळों आला राती ॥3॥ उंच निंच गारा । हिरा परिस मोहरा ॥4॥ तुका ह्मणे भले । ऐसे नष्टांनीं कळले ॥5॥
1717
असो खळ ऐसे फार । आह्मां त्यांचे उपकार ॥1॥ करिती पातकांची धुनी । मोल न घेतां साबनीं ॥ध्रु.॥ फुकाचे मजुर। ओझें वागविती भार ॥2॥ पार उतरुन ह्मणे तुका । आह्मां आपण जाती नरका ॥3॥
1718
संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥1॥ माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥ केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥2॥ तुमचे पायीं पाइतन । मोचे माझे तन मन ॥3॥ तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥4॥ तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥5॥ लागती पादुका । ते मी तळील मृित्तका ॥6॥ तुका ह्मणे पंढरिनाथा। दुजें न धरावें सर्वथा ॥7॥
1719
इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥1॥ यांचा विश्वास तो काइऩ । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥ सुगंध अभ्यंगें पािळतां । केश फिरले जाणतां ॥2॥ पिंड पािळतां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥3॥ करितां उपचार । कोणां नाहीं उपकार ॥4॥ अल्प जीवन करीं । तुका ह्मणे साधीं हरी ॥5॥
1720
यYानिमित्त तें शरिरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली ॥1॥ नव्हे ते भिH परलोकसाधन । विषयांनीं बंधन केलें तुज ॥ध्रु.॥ आशा धरूनि फळाची । तीथाअ व्रतीं मुिH कैंचि ॥2॥ तुका ह्मणे सिणसी वांया । शरण न वजतां पंढरिराया ॥3॥
1721 संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां । न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥1॥
ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ध्रु.॥
पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा ।
अनाथांच्या नाथें घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥2॥ अंतकाळीं गणिका पिक्षयाच्या छंदें । राम राम उच्चारिलें । तंव त्या दिनानाथा कृपा आली । त्यानें तयेसी वैकुंठा नेलें ॥3॥ अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्तीं जवळी असे । तुका ह्मणे भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये दशे ॥4॥
1722 दुष्टाचें चित्त न भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला।
पालथे घागरी घातलें जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥1॥ जन्मा येउनि तेणें पतन चि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा। जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा ॥ध्रु.॥ पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो। कुचर मुग नये चि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥2॥ तुका ह्मणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रेत्न कांहीं । ह्मणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥3॥
1723 कासियानें पूजा करूं केशीराजा । हा चि संदेह माझा फेडीं आतां ॥1॥
उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥ गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥2॥ फळदाता तूंच तांबोल अक्षता । तरी काय आतां वाहों तुज ॥3॥ वाहूं दिक्षणा जरी धातु नारायण । ब्रह्म तें चि अन्न दुजें काइऩ ॥4॥ गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥5॥ तुका ह्मणें मज अवघें तुझें नाम । धूप दीप रामकृष्णहरि ॥6॥
1724 गातां आइकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥1॥
रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥ विषयांच्या सुखें अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥2॥ वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥3॥ तीर्थाटण नाहीं केले उपकार । पािळलें शरीर पुष्ट लोभें ॥4॥ तुका ह्मणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥5॥
1725 तुझें ह्मणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥1॥
परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥ समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥2॥ लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥3॥ मृित्तका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥4॥ तुका ह्मणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥5॥
1726 जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षािळलें वरीं वरीं ॥1॥
अंतरींचें शुद्ध कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥ध्रु.॥ इंद्रावण फळ घोिळलें साकरा । भीतरील थारा मोडे चि ना ॥2॥ तुका ह्मणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कासया काुंफ्दां तुह्मी ॥3॥
1727 बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥1॥
येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥ राम कृष्ण हरि मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥2॥ तुका ह्मणे ऐसें देइऩन मी दिव्य । जरी होइल भाव एकविध ॥3॥
1728 धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥1॥
न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें ॥ध्रु.॥ सवाौत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥2॥ विष्णुपद गया रामधाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या ॥3॥ तुका ह्मणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नास अहंकाराचा ॥4॥
1729 धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥1॥
धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ध्रु.॥ धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥2॥ धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥3॥ धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥4॥ तुका ह्मणे धन्य संसारातें आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥5॥
1730 मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥1॥
नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ध्रु.॥ कर्णद्वारें पुराणिक। भुलवी शब्दें लावी भीक ॥2॥ वैष्णवां संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥3॥ आह्मां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥4॥ तुका ह्मणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥5॥
1731 मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ िस्थर नाहीं ॥1॥
आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥ धांव घालीं पुढें इंिद्रयांचे ओढी । केलें तडातडी चित्त माझें ॥2॥ तुका ह्मणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥3॥
1732 मागतियाचे दोनि च कर । अमित भांडार दातियाचें ॥1॥
काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥ एकें सांटवणें प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥2॥ तुका ह्मणे आतां आहे तेथें असो । अंखुनियां बैसों पायांपाशीं ॥3॥
1733 जिचें पीडे बाळ । प्राण तयेचा विकळ ॥1॥
ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ध्रु.॥ सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्तीं ॥2॥ तुका ह्मणे संत । तुह्मी बहु कृपावंत ॥3॥
1734 यावें माहेरास । हे च सर्वकाळ आस ॥1॥
घ्यावी उिच्छष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥ भोग उभा आड । आहे तोंवरी च नाड ॥2॥ तुका ह्मणे देवें । माझें सिद्धी पाववावें ॥3॥
1735 लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥1॥
ऐसी कळवऑयाची जाती । करी लाभेंविण प्रीती ॥ध्रु.॥ पोटीं भार वाहे। त्याचें सर्वस्व ही साहे ॥2॥ तुका ह्मणे माझें । तैसे तुह्मां संतां ओझें ॥3॥
1736 आह्मां गांजी जन । तरि कां मेला नारायण ॥1॥
जालों पोरटीं निढळें । नाहीं ठाव बुड आळें ॥ध्रु.॥ आह्मीं जना भ्यावें। तरि कां न लाजिजे देवें ॥2॥ तुका ह्मणे देश । जाला देवाविण ओस ॥3॥
1737 तुह्मी पाय संतीं । माझे ठेवियेले चित्तीं ॥1॥
आतां बाधूं न सके काळ । जालीं विषम शीतळ ॥ध्रु.॥ भय नाहीं मनीं । देव वसे घरीं रानीं ॥2॥ तुका ह्मणे भये । आतां स्वप्नीं ही नये ॥3॥
1738 काळाचे ही काळ । आह्मी विठोबाचे लडिवाळ ॥1॥
करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥ध्रु.॥ ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे समोरी ॥2॥ तुका ह्मणे बाण । हातीं हरिनाम तीक्षण ॥3॥
1739 जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥1॥
नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥ घरा व्याही पाहुणा आला । ह्मणे त्याला बरें नाहीं । तुमचे गावीं वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥2॥ उजवूं किती होतिल पोरें । मरतां बरें ह्मणे यांसी । ह्मणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोनें ॥3॥ पर्वकाळीं भट घरासी आला । बोंब घाला ह्मणे पोरां । तुमचा उणा होइऩल वांटा । काळ पिठासी आला ॥4॥ दाढी करितां अडका गेला । घरांत आला बाइलेपें । ह्मणे आतां उगवीं मोडी । डोइऩ बोडीं आपुली ॥5॥ तीर्थ स्वप्नीं नेणें गंगा । पूजन लिंगा गांविंचिया । आडकुनि दार बैसे दारीं। आल्या घर ह्मणे ओस ॥6॥ तुका ह्मणे ऐसे आहेत गा हरी। या ही तारीं जीवांसी । माझ्या भय वाटे चित्तीं । नरका जाती ह्मणोनि ॥7॥
1740 जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने ॥1॥ तो ही कारणांचा दास । देव ह्मणवितां पावे नास ॥ध्रु.॥ वेची अनुष्ठान। सिद्धी कराया प्रसन्न ॥2॥ तुका ह्मणे त्याचें । मुदल गेलें हाटवेचें ॥3॥
1741 घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥1॥
आह्मी भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ध्रु.॥ उगवूं जाणों मोडी । जाली नव्हे त्याची जोडी ॥2॥ तुका ह्मणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥3॥
1742 सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥1॥
आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥ मोकळी च पोतीं । नाहीं पुसायाची गुंती ॥2॥ तुका ह्मणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥3॥
1743 तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥1॥
जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ध्रु.॥ दाविल्या सारिखें । मागें नसावें पारिखें ॥2॥ मागें पुढें ॠण । तुका ह्मणे फिटे हीण ॥3॥
1744 नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥1॥
जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ध्रु.॥ राहों नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ॥2॥ होवा वाटे जना । तुका ह्मणे साटीं गुणां ॥3॥
अनघडसिद्धाच्या शब्देंकरून रामेश्वरभटाच्या शरीरीं दाह जाला तो ज्यानें शमला तो अभंग ॥ 1 ॥ 1745 चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥1॥
विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥ दुःख तें देइऩल सर्व सुख फळ । होतील शीतळ अिग्नज्वाळा ॥2॥ आवडेल जीवां जीवाचे परी । सकळां अंतरीं एक भाव ॥3॥ तुका ह्मणे कृपा केली नारायणें । जाणियेते येणें अनुभवें ॥4॥
1746 लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥1॥
मजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥ कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥2॥ चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥3॥ तुका ह्मणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥4॥
1747 बोलविसी माझें मुख । परी या जना वाटे दुःख ॥1॥
जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥ कठीण देतां काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥2॥ खाऊं नये तें चि मागे । निवारितां रडों लागे ॥3॥ वैद्या भीड काय । अतित्याइऩ जीवें जाय ॥4॥ नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥5॥ धन माया पुत्र दारा । हे तों आवडी नरका थारा ॥6॥ तुका ह्मणे यांत । आवडे ते करा मात ॥7॥
1748 पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥1॥
जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥ सुख पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥2॥ शूरा उल्हास अंगीं । गांढएा मरण ते प्रसंगीं ॥3॥ शुद्ध सोनें उजळे अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥4॥ तुका ह्मणे तो चि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥5॥
1749 चालिती आड वाटा । आणिकां द्राविती जे नीटा ॥1॥
न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥ विष सेवूनि वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥2॥ बुडतां हाक मारी । ठाव नाहीं आणिकां वारी ॥3॥ तुका ह्मणे न करीं हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥4॥
1750 कुळींचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होइऩन दासीसुत त्याचे घरीं ॥1॥
शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥ पंढरीस कोणी जाती वारेकरी । होइऩन त्यांचे घरीं पशुयाति ॥2॥ विठ्ठलचिंतन दिवसरात्रीं ध्यान । होइऩन पायतन त्याचे पायीं ॥3॥ तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होइन केरसुणी त्याचे घरीं ॥4॥ तुका ह्मणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥5॥
1751 अवघिया चाडा कुंटित करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना । करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों । मिथ्या संकल्प तो माझा तोडीं । तुझिये चरणीं माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवीं पिंडी रे रे ॥1॥
माझें साच काय केलें मृगजळ । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुकें खेळती कवतुकें । काय त्यांचें साचपण ॥ध्रु.॥ वेगळाल्या भावें चित्ता तडातोडी । केलों देशधडी मायाजाळें । गोत वित्त माय बाप बहिणी सुत । बंधुवर्ग माझीं बाळें । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें ।
जाणोनियां त्याग सर्वस्वें केला। सांभाळीं आपुलें जाळें ॥2॥
एकां जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय सोयरीं नव्हतीं माझीं । एकांचे पाळण एकांसी भांडण ।
चाड कवणिये काजीं । अधिक असे उणें कवण कवण्या गुणें । हे माव न कळे चि तुझी । ह्मणोनि चिंतनीं राहिलों श्रीपती। तुका ह्मणे भाक माझी ॥3॥
1752 आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास । कृपणें सांचलें धन। न जिरे क्षीर श्वानासी भिक्षतां । याती तयाचा गुण । तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥1॥
काय जालें यांस वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे । घेउनि स्फटिकमणी टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥ध्रु.॥ सिद्धीं सेविलें सेविती अधम । पात्रासारिखे फळ । सिंपिला मोतीं जन्मलें स्वाती । वरुषलें सर्वत्र जळ । कापुस पट नये चि कारणा । तयास पातला काळ ।
तें चि भुजंगें धरिलें कंठीं । मा विष जालें त्याची गरळ ॥2॥
भक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि केळें । घालुनियां घसां अंगोिळया। हाते वांत करू बळें । कुंथावयाची आवडी बोंबा । उन्हवणी रडवी बाळें ।
तुका ह्मणे जे जैसें करिती । ते पवती तैसीं च फळें ॥3॥
1753 चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥1॥
एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥ क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी तें जावें भोगें दुरी ॥2॥ तुका ह्मणे ऐसी बुिद्ध ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥3॥
1754 तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव-वाचाकायामन ॥1॥
भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥ नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥2॥ वर्म नेणें दिशा हिंडती मोकट । इंिद्रयें सुनाट दाही दिशा ॥3॥ वेरझारीफेरा सिणलों सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥4॥ तुका ह्मणे मन इंिद्रयांचे सोइऩ । धांवे यासी काइऩ करूं आतां ॥5॥
1755 स्वयें पाक करी । संशय तो चि धरी । संदेहसागरीं। आणीक परी बुडती ॥1॥
जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख। देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥ तो चि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥2॥ तो चि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी। वेठी आणि करियेले ॥3॥ अखंड ते ध्यान । समबुिद्ध समाधान । सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥4॥ करणें जयासाटीं । जो नातुडे कवणे आटी । तुका ह्मणे साटी । चित्तवित्तेंवांचूनि ॥5॥
1756 माझिया संचिता । दृढ देखोनि बिळवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या ॥1॥
तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एक संपादिसी । मान करिसी लोकांत ॥ध्रु.॥ तरि हें प्रारब्ध जी गाढें । कांहीं न चले तयापुढें । काय तुज म्यां कोंडें । रें सांकडें घालावें ॥2॥ भोगधीपति क्रियमाण । तें तुज नांगवे अजून। तरि का वांयांविण । तुज म्यां सीण करावा ॥3॥ तुज नव्हतां माझें कांहीं । परि मी न संडीं भिHसोइऩ । हो कां भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ॥4॥ तूं भितोसि माझिया दोषा । कांहीं मागणें ते आशा । तुका ह्मणे ऐसा । कांहीं न धरीं संकोच ॥5॥
1757 लोकमान देहसुख । संपित्तउपभोग अनेक । विटंबना दुःख । तुझिये भेटीवांचूनि ॥1॥
तरी मज ये भेट ये भेट । काय ठाकलासी नीट । थोर पुण्यें वीट । तुज दैवें चि लाधली ॥ध्रु.॥ काय ब्रह्मYाान करूं कोरडें । रितें मावेचें मापाडें । भेटीविण कुडें । तुझिये अवघें मज वाटे ॥2॥ आत्मिस्थतीचा विचार । काय करूं हा उद्धार। न देखतां धीर । चतुर्भुज मज नाहीं ।3॥
रिद्धीसिद्धी काय करूं । अथवा अगम्य विचारू । भेटीविण भारु । तुझिये वाटे मज यांचा ॥4॥ तुजवांचूनि कांहीं व्हावें । ऐसें नको माझिया जीवें। तुका ह्मणे द्यावें । दरुषण पायांचें ॥5॥
1758 तुझा ह्मणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें॥1॥ तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥ काय शब्दीं चि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥2॥ तुका ह्मणे आतां । अभय देइप पंढरिनाथा ॥3॥
1759 उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं ॥1॥ तरि मी पाहेन पाहेन। तुझे श्रीमुखचरण । उताविळ मन । तयाकारणें तेथें ॥ध्रु.॥ जनकश्रुतदेवा करीं । कैसा शोभलासी हरी । विदुराच्या घरीं । कण्या धरी कवतुकें ॥2॥ पांडवा अकांतीं । तेथें पावसी स्मरती । घातलें द्रौपदी । यागीं बिरडें चोळीचें ॥3॥ करी गोपीचें कवतुक । गाइऩगोपाळांसी सुख । दावीं तें चि मुख । दृष्टी माझ्या आपुलें ॥4॥ तरि तूं अनाथाचा दाता । मागतियां शरणागतां । तुका ह्मणें आतां। कोड पुरवीं हें माझें ॥5॥
1760 मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देइप मज हरी कृपादान ॥1॥
प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥ सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥2॥ तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥3॥ संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥4॥ तुका ह्मणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥5॥
1761 भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥1॥ न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥ध्रु.॥ नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें टोंके तस्करघाइऩ ॥2॥ तुका ह्मणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥3॥
1762 दिनदिन शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥1॥ कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥ विसरला मरण। त्याची नाहीं आठवण ॥2॥ देखत देखत पाहीं । तुका ह्मणे आठव नाहीं ॥3॥
1763 माझें मज आतां न देखें निरसतां । ह्मणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक । जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझीं कोणी मी कवणांचा । अर्थ मोहो सांडवला ।
तारीं मारीं करीं भलतें दातारा । होऊन तुझा आतां ठेलों रे ॥1॥
असो माझें कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप ।
बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥ध्रु.॥
पापपुण्यें श्रुति आटिल्या। शास्त्रांस न लगे चि ठाव । विधिनिषिधें गोविलीं पुराणें वेदांसी तो अहंभाव । ओंकाराचें मूळ व्यापिलें माया । तेथें न धरे च भाव । ह्मणऊन काबाड सांडिलें उपसतां । धरिलें तुझें चि नांव ॥2॥ तनमनइंिद्रयें ठेवूनि राहिलों । सर्व आशा तुझे पायीं । तप तीर्थ दान करवूं कवणा । हातीं अधीन तें मज काइऩ । आहिक्यें परत्रें चाड नाहीं सर्वथा । जन्म सदा मज देहीं । मायामोहपाश करीं विष तैसें । तुका ह्मणे माझ्याठायीं ॥3॥
1764 तुझें नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥1॥ रसना येरां रसां विटे । घेतां घोट अधिक हें ॥ध्रु.॥ आणिकां रसें मरण गांठी । येणें तुटी संसारें ॥2॥ तुका ह्मणे आहार जाला। हा विठ्ठला आह्मांसी ॥3॥
1765 धालों सुखें ढेकर देऊं । उमटे जेवूं तोंवरी ॥1॥ क्रीडा करूं निरांजनीं । न पुरे धणी हरिसवें ॥ध्रु.॥ अवघे खेळों अवघ्यामधीं । डाइप न पडों ऐसी बुिद्ध ॥2॥ तुका ह्मणे वांचवीत। आह्मां सत्ता समर्थ ॥3॥
1766 एकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग ह्मणऊनि॥1॥ उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ध्रु.॥ दुसरा परी एक ऐसा । वजे रिसा निकुरें ही ॥2॥ तुका ह्मणे कळत्यां कळे । येर खेळे खेळ ह्मुण ॥3॥
1767 बोलविले जेणें । तो चि याचें गुहए जाणे ॥1॥ मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥ मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥2॥ जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता॥3॥ मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥4॥ जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥5॥ त्याच्या साच गाइऩ ह्मैसी । येणें खेळावें मातीशीं ॥6॥ तुका ह्मणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥7॥
1768 कां हो तुह्मी माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥1॥ आणीक म्यां कोणां पुसावा विचार । मुळीं संवसार दुराविला ॥ध्रु.॥ स्वामिसेवा ह्मुण घेतली पदरीं । सांगितलें करीं कारण तें ॥2॥ तुका ह्मणें नाहीं शिकविलें जेणें । तो याच्या वचनें उगा राहे ॥3॥
1769 सेवकासी आYाा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥1॥ आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं टळों नये ॥ध्रु.॥ समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तपायरी ॥2॥ तुका ह्मणे तरी ह्मणवावें सेवक । खादलें तें हाक अन्न होय ॥3॥
1770 नये पुसों आYाा केली एकसरें । आह्मांसी दुसरें आतां नाहीं ॥1॥ ज्याचें तो बिळवंत सर्व निवारिता । आह्मां काय चिंता करणें लागें ॥ध्रु.॥ बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाहीं एक अंगीं तया ॥2॥ तुका ह्मणे मज होइऩल वारिता । तरी काय सत्ता नाहीं हातीं ॥3॥
1771 बिळवंत आह्मी समर्थाचे दास । घातली या कास किळकाळासी ॥1॥ तेथें मानसाचा कोण आला पाड । उलंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥ संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥2॥ तुका ह्मणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥3॥
1772 एका गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥1॥ मोडूनियां वाटा सूक्षम सगर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥ लावूनि मृदांग टाळश्रुतिघोष । सेवूं ब्रह्मरस आवडीनें ॥2॥ तुका ह्मणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रें ॥3॥
1773 वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥1॥ ह्मणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥ पूज्य जालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥2॥ तुका ह्मणे खूण न कळे चि निरुती। सांपडलों हातीं अहंकाराचे ॥3॥
1774 आतां काढाकाढी करीं बा पंढरिराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥1॥ जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा धर्म घ्यावे प्राण हा चि ॥ध्रु.॥ मनाचा स्वभाव इंिद्रयांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥2॥ तुका ह्मणे जाली अंधऑयाची परी । आतां मज हरी वाट दावीं ॥3॥
1775 सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥1॥ एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥ भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥2॥ परउपकार घडे तो भला । नाठएाळ तया दया नाहीं ॥3॥ जाणीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा॥4॥ हित तें अनहित केलें कैसें । तुका ह्मणे पिसें लागलें यास ॥5॥
1776 तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा ते चि घडी झडो माझी ॥1॥ हें मज देइप हें मज देइप । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥ बहिर कान तुझी कीर्ती नाइकतां । पाय न देखतां जात डोळे ॥3॥ मना तुझें ध्यान नाहीं नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो जळो ॥3॥ हातपाय तेणें पंथ न चलतां । जावे ते अनंता गळोनियां ॥4॥ तुजविण जिणें नाहीं मज चाड । तुका ह्मणे गोड नाम तुझें ॥5॥
1777. ह्मणसी होऊनी नििंश्चता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता
भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होइऩल तुझ्या ॥1॥
सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥ शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कधीं अराणूक । करिती तडातोडी
आंत बाहएात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥2॥
मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोडी ।
जागा होइप करीं हिताचा उपाय । तुका ह्मणे हाय करिसी मग ॥3॥
1778 कनवाळू कृपाळू भHांलागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाइऩ ॥1॥ पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥ध्रु.॥ भHांच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दाहा घेतले ॥2॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥3॥ उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥4॥ कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी जाली माउली ॥5॥ दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखादेठ घेऊनि ॥6॥ कृपाळू माउली भुिHमुिHभांडार । करीं माझा अंगीकार तुका ह्मणे विठ्ठले ॥7॥
1779 कवणा पाषाणासी धरूनि भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां ।
ह्मणऊनि नििश्चत राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥1॥
कवणाचें कारण न लगे कांहीं । सर्वांठायीं तूं एक।
कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काइऩ न दिसे देवा ॥ध्रु.॥
जळें जळ काय धोविलें एक । कवण तें पातक हरलें तेथें ।
पापपुण्य हे वासना सकळ । ते तुज समूळ समपिऩली ॥2॥
पितरस्वरूपी तूं चि जनादऩन। सव्य तें कवण अपसव्य ।
तुका ह्मणे जीत पिंड तुह्मां हातीं। देऊनि नििंश्चती मानियेली ॥3॥
1780 सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥1॥ न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥ मायबापें माझीं जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥2॥ पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥3॥ पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥4॥ जन साहेभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥5॥ कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥6॥ तुका ह्मणे मज तुझाची भरवसा । ह्मणऊनि आशा मोकलिली ॥7॥
1781 देवाचा भH तो देवासी गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची ।
कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघियां हातीं अंतरला ॥1॥
निष्काम वेडें ह्मणतील बापुडे । अवघियां सांकडें जाला कैसा ।
माझें ऐसें तया न ह्मणत कोणी । असे रानीं वनीं भलते ठायीं ॥ध्रु.॥
प्रातःस्नान करी विभूतिचर्चन । दखोनिया जन निंदा करी ।
कंठीं तुळसीमाळा बैसोनि निराळा । ह्मणती या चांडाळा काय जालें ॥2॥
गातां शंका नाहीं बैसे भलते ठायीं । शिव्या देती आइऩ बाप भाऊ ।
घरी बाइल ह्मणे कोठें व्याली रांड । बरें होतें शंड मरता तरी ॥3॥
जन्मोनि जाला अवघियां वेगळा । ह्मणोनि गोपाळा दुर्लभ तो ।
तुका ह्मणे जो संसारा रुसला । तेणें चि टाकिला सिद्धपंथ ॥4॥
1782 कस्तुरी भिनली जये मृित्तके । तयेसी आणिके कैसी सरी ॥1॥ लोखंडाचे अंगीं लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥2॥ तुका ह्मणे मी न वजें यातीवरी । पूज्यमान करीं वैष्णवांसी ॥ ।3॥
1783 अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाहीं तोंडीं कैसा तरे ॥1॥ सकळां जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥ध्रु.॥ Yाान सकळांमाजी आहे हें साच । भHीविण तें च ब्रह्म नव्हे ॥2॥ काय मुद्रा कळल्या कराव्या सांगतां । दीप न लगतां उन्मनीचा ॥3॥ तुका ह्मणे नका पिंडाचें पाळण । स्थापू नारायण आतुडेना ॥4॥
1784 नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल । विनवितों कोपाल संत झणी ॥1॥ नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगें व्यापूनिया ॥ध्रु.॥ मज मूढा शिH कैंचा हा विचार । निगमादिकां पार बोलावया ॥2॥ राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबडा उत्तरीं हें चि ध्यान ॥3॥ तुका ह्मणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगें भार घेतला माझा ॥4॥
1785 देवासी लागे सकळांसी पोसावें । आह्मां न लगे खावें काय चिंता ॥1॥ देवा विचारावें लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥ देवासी उत्पित्त लागला संहार । आह्मां नाहीं फार थोडें काहीं ॥2॥ देवासी काम लागला धंदा । आह्मासी ते सदा रिकामीक ॥3॥ तुका ह्मणे आह्मी भले देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥4॥
1786 घेइऩन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥1॥ हरिनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥ आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आह्मां ॥2॥ आणीक सायास न करीं न धरीं आस । होइऩन उदास सर्व भावें ॥3॥ मोक्ष आह्मां घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका ह्मणे ॥4॥
1787 देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥1॥ तरी साच मी पतित । तूं च खोटा दिनानाथ ।
ग्वाही साधुसंत जन। करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥
आह्मी धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छेद ॥2॥ न चले तुझे कांहीं त्यास । आह्मी बळकाविले दोष ॥3॥ दिशा भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥4॥ तुका ह्मणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥5॥
1788 लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुहए भाव शुद्ध बोला ॥1॥ अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥2॥ तुका ह्मणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्धभावें ॥3॥
1789 नव्हे ब्रह्मYाान बोलतां सिद्ध । जंव हा आत्मबोध नाहीं चित्तीं ॥1॥ काय करिसी वांयां लटिका चि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥ध्रु.॥ मी च देव ऐसें सांगसी या लोकां । विषयांच्या सुखा टोंकोनियां ॥2॥ अमृताची गोडी पुढिलां सांगसी। आपण उपवासी मरोनिया ॥3॥ तुका ह्मणे जरि राहील तळमळ । ब्रह्म तें केवळ सदोदित ॥4॥
1790 गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥1॥ रवि दीप कािळमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥ कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मिळवणीं काय चाले ॥2॥ परिस चिंतामणि आणिकांचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥3॥ तुका ह्मणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥4॥
1791 परिस काय धातु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥1॥ काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥ कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥2॥ चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥3॥ काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता तुका ह्मणे॥4॥
1792 तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥1॥ कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काइऩ ॥ध्रु.॥ धान्यें बीजें जेणें जािळलीं सकळें । पेरितो काळें जिरें बीज ॥2॥ मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥3॥ विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रह्महत्या ॥4॥ तुका ह्मणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥5॥
1793 संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें ॥1॥ जेथें तेथें आपण आहे । आह्मीं करावें तें काये ॥ध्रु.॥ एकांतींसी ठाव । तिहीं लोकीं नाहीं वाव ॥2॥ गांवा जातों ऐसें । न लगे ह्मणावें तें कैसें ॥3॥ स्वप्नाचे परी । जागा पाहे तंव घरीं ॥4॥ तुका ह्मणे काये । तुझे घेतले म्यां आहे ॥5॥
1794 आण काय सादर । विशीं आह्मां कां निष्ठ ॥1॥ केलें भH तैसें देइप । तुझें प्रेम माझ्याठायीं ॥ध्रु.॥ काय पंगतीस कोंडा । एकांतासी साकरमांडा ॥2॥ काय एकपण । पोतां घालूनि गांठी खूण ॥3॥ काय घ्यावें ऐसें । त्या आपण अनारिसें ॥4॥ तुका ह्मणे मधीं । आतां तोडूं भेद बुद्धी ॥5॥
1795 चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराइऩ ॥1॥ परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥ आह्मी सर्वस्वें उदार । तुज देऊनियां धीर ॥2॥ इंिद्रयांची होळी । संवसार दिला बळी ॥3॥ न पडे विसर । तुझा आह्मां निरंतर ॥4॥ प्रेम एकासाटी। तुका ह्मणे न वेचे गांठी ॥5॥
1796 आह्मी पतित ह्मणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं ।
नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥1॥
आह्मां न तारावें तुह्मी काय करावें । सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥ अन्याय एकाचा अंगीकार करणें। तया हातीं देणें लाज ते चि ।
काय ते शूरत्व मिरवूनि बोलणें । जनामाजी दावणें बळरया ॥2॥
पोहएा अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो बाहेरी आलियासी ।
नव्हे कीर्त कांहीं न माने लोकां । काय विटंबणा तैसी ॥3॥
प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष काइऩ ।
तुका ह्मणे तरी आह्मां का न कळे । तरलों किंवा आह्मी नाहीं ॥4॥
1797 काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥1॥ तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥ध्रु.॥ गोवर्धन गिरी उचलिला करीं । गोकुळ भीतरी राखियेलें ॥2॥ बघुनि भौमासुरा आणिल्या गोपांगना । राज्य उग्रसेना मथुरेचें ॥3॥ पांडव जोहरीं राखिले कुसरी । विवराभीतरीं चालविले॥4॥ तुका ह्मणे हा भHांचा कृपाळ । दुष्टजना काळ नारायण ॥5॥
1798 तुजविण देवा । कोणा ह्मणे माझी जिव्हा ॥1॥ तरि हे हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥ कांहीं इच्छेसाटीं । करिल वळवळ करंटी ॥2॥ तुका ह्मणे कर । कटीं तयाचा विसर॥3॥
1799 आह्मां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम॥1॥ न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां॥ध्रु.॥ आसनीं भोजनीं शयनीं । दुजें नाहीं ध्यानीं मनीं ॥2॥ तुका ह्मणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥3॥
1800 नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥1॥ ह्मणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥ शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥2॥ तुका ह्मणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥3॥
1801 काय सांगू आता संताचे उपकार। मज निरंतर जागविसी।।1।। काय दयावे त्यासी व्हावे उतराई। ठेवीना हापायी जीव थोडा।।धृ़़।। सहज बोलणे हीत उपदेश। करुनी सायास शिकवीती।।2।। तुका म्हणे वत्स धेनू वेद चित्ती। तैसे मज येती सांभाळीती।।3।। <poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |