"गर्द सभोंतीं रान साजणी तूं तर चाफेकळी!
काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या जळीं?"

ती वनमाला म्हणे "नृपाळा, हें तर माझे घ्रर;
पाहत बसतें मी तर येथें जललहरी सुंदर,
हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.
घेउनि हातीं गोड तिला त्या कुरणावरतीं फिरे--
भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरें"

"रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी! तुला;
तूं वनराणी, दिसे न भुवनीं तुझिया रूपा तुला.
तव अधरावर मंजुळ गाणीं ठसलीं कसलीं तरी;
तव नयनीं या प्रेमदेवता धार विखारी भरी!
क्रीडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझें हें गडे,
भुरु भुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालावरी;
भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं."

सांज सकाळीं हिमवंतीचे सुंदर मोतीं धडें;
हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे.
ती वनबाला म्हणे नृपाळा "सुंदर मी हो खरी,--

अपूर्ण[१]


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.
  1. बालकवींनी ही कविता अपुर्ण सोडली आहे. फुलराणी - बालकवींच्या निवडक कविता या मध्ये या कवितेसंबंधी संपादकीय टीपांमध्ये कुसुमाग्रजांनी ही कविता "अपूर्ण असली तरी ही अपूर्णता तिच्या रसास्वादाला बाधक होत नाही. कोठल्यातरी संकल्पित कथाकाव्याचा हा छोटा तुकडा आहे असे वाटते" असे मत मांडले आहे.