दत्ताची आरती/ आरती दत्तराजयांची


आरती दत्तराजयांची ।
अनुसया अत्रि सुपुत्राची ॥ धृ. ॥

गाणगा भुवनी तूं वससी ।
भक्त संकटासि बा हरिसी ।
भजती त्यातें उद्धरिसी ।
अंती मोक्षपदा नेसी ॥ चाल ॥

सर्वोत्तमात्रिजगत्पाला लुब्ध होउनि अंजलि भरुनि ।
पुष्पें वाहिन । नाथ सख्या तुमची ॥ १ ॥

गाईन लीलाकीर्तीची ॥ काषयांबर फटीं साजे ।
त्रिभुवनीअतुल कीर्ती गाजे, वर्णन करितां गुण तुझे ।
श्रमले मन हें बहु माझे ॥ चाल. ॥

विरंची विष्णू शिव मूर्ति । भवब्धि तरण मी तुला शरण ।
जन्म आणि मरण चुकवुनि शुद्ध करी साची ।
कुमतिहर दत्तराजयाची ॥ २ ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.