दिव्याभोंवती पतंग उडत आहेत (नाट्यछटा)

<poem> काय म्हटलेंस ? आपल्या जीविताचा तुला कंटाळा आहे ? - हे बघ, हे बघ, या दिव्याभोंवती कसे पतंग उडत आहेत - कसे पण प्रेमानें अगदी तर्रर्र होऊन भोंवतलच्या जिनसांवर तडातड उड्या मारीत आहेत ! हा पहा, या लहानशा पुस्तकावर कसा सारखा धिरट्या घालीत आहे ! - प्रेमशोधनच आहे हं ! - अग नको, नको, त्याला हात नको लावूंस ! - बाबांनो, या दिव्याच्या ज्योतीला खुशाल आनंदानें प्रदक्षिणा घाला ! - काय पहा ! त्या ज्योतीच्या लाटांमध्ये पोहण्यासाठीं, बिचारे चिमणीवर कसे धडक्यावर धडक्या घेत आहेत ! - कशाला ! - अंतः करणातील प्रेमाची प्रखरता, प्रकाशाच्या - ईश्वरी प्रेमाच्या - प्रखरतेमध्यें मिसळायला ! - तें ज्योतीमध्यें बुडून गेलेलें दीपगृह आहे ना ?

अग तें अंगुस्तानासारखें दिसत आहे तें ? 

- तेथें जायचें आहे त्यांना ! अरेरे ! बिचारे पहा कसे मरुन पडले आहेत ते !! धडपड, धडपड केली खरी, त्यासारखें, यांच्या आत्म्यांना तर तें दीपगृह मिळालें ! - त्या लहानशा ठिकाणीं कितीतरी जोडपीं आनंदानें, प्रेमानें नांदत असतील नाहीं ! - आपल्या या अफाट जगांत सारखा कलह सुरु आहे ! पण तोंच त्या चिमुकल्या स्वर्गातून, कलहाचा एक तरी - अगदीं लहानसा तरी - सुस्कारा आपल्याला ऐकूं येत आहे का ! खरेंच ! या पतंगांचें जीवित कितांतरी सुखाचें, प्रेमाचें आहे ! आपलेंही - ! ....


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.