मारीकुट्टी

'गाडी स्टेशनात उभीच होती. शोधता

शोधता बायांच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यावर
माझ्या नावाची चिठ्ठी आढळली व मी दार उघडून
आत शिरले. सामान वगैरे लावून झाल्यावर
बरोबरच्या गृहस्थांना निरोप दिला व पुढच्या
चोवीस तासांच्या माझ्या वसतिगृहात सभोवार
पाहिले. आणखी दोन बाया डब्यात होत्या- एक
मध्यम वयाची व एक तरुण. ती तरुण बाई
पोचवायला आलेल्या गृहस्थाशी जोरजोराने
हातवारे करीत, मधूनमधून हसत, हसत कुठच्या
तरी द्रविड भाषेत बोलत होती. एवढ्यात शिटी
झाली, गाडी हलली व थोड्याच वेळात आम्ही
मद्रासचे स्टेशन मागे टाकले. त्या तरुण बाईने
माझ्याकडे वळून विचारले, “वेय्यर गोय्यिंग?"
मी म्हटले, “कोचीन." लगेच तिने टाळी
वाजवली व त्या वयस्क बाईकडे वळून म्हणाली,
“आऊ फन्नी! वि आर आल्ल गोय्यिंग सेम
टौन!" मद्रासहून कोचीनकडे जाणाच्या गाडीच्या
एका डब्यात कोचीनला जाणारी तीन माणसे
असावीत ह्यात नवल काहीच नव्हते. पण तिला
तसे वाटले खरे! ती मनापासून हसली व तिच्या

काळ्याकुट्ट चेह-यावर तिच्या पांढ-या शुभ्र

४२ / परिपूर्ती
 

दातांचा प्रकाश पडला. किती कुरूप होती ती! तिचे कपाळ अरुंद होते, केस काळेभोर आणि भुग्यासारखे कुरळलेले, नाक बसके नि फेंदारलेले व ओठ बरेच जाड. तिचे इंग्रजी बोलणे पण कानाला कसेसेच लागे. कुठलेच वाक्य ती व्याकरणशुद्ध बोलत नव्हती; आणि त्यातून जवळजवळ प्रत्येक शेवटचे व्यंजन द्वित्त म्हणायची तिची लकब आणि ‘ओ'च्या जागी ‘वो', 'ई'च्या जागी ‘यी' व 'ग'च्या जागी 'क' म्हणण्यामुळे तिचे बोलणे पण कानाला कठोर लागत होते. ती धाडकन माझ्याशेजारी बसली व माझ्याकडे वळून म्हणाली, “माझे नाव आहे मारीकुट्टी (छोटी मेरी)." ती दुसरी बाई म्हणाली, “माझे नाव आहे सारम्मा (सेराबाई)." अर्थात मलाही म्हणावेच लागले, “माझे नाव-" इतक्यात पंखांची फडफड झाली, व मी चकित होऊन इकडेतिकडे पाहिले तो समोरच माझ्या पेटीवर एक मोठे थोरले टोपल ठेवलेले दिसले. त्यातूनच पक्ष्यांचा फडफड शब्द ऐकू आला. कोंबड्या दिसताहेत- आता माझ्या पेटीची काय घाण होईल देव जाणे! असे मनात येऊन मी 'कोंबड्या कुणाच्या?" म्हणून विचारण्यासाठी मारीकुट्टीकडे नजर टाकली. ती सारमाशी बोलण्यात गर्क झाली होती. इतक्यात तिच्या डोक्यात काहीतरी हलल्याचा भास झाला आणि मला एक विलक्षण दृश्य दिसले- मारीकुट्टीच्या काळ्याभोर कुरळ्या केसांत एक पांढरीशुभ्र 'ऊ' प्रवास करीत होती. त्या दाट कुरळलेल्या केसांत प्रवास करणे काय साप गोष्ट होती? ती ऊ केसाच्या मळसूत्राकार गुंडाळीत सापडली होती का फिरून परत पहिल्या जागीच येई. मला अगदी शिसारी आली. पण माझ डोळे तेथून हलेचनात. ती ‘ऊ' गोलगोल हिंडून थकून जाईल की तिला पुढचा मार्ग सापडेल ही जणू काय मला काळजी लागली होती. एवढ्या मारी नाक फेंदारून कर्कश हसली. तिचे ते रूप, ते बोलणे, त्या घाणेरड्या कबड्या व ती ऊ! माझ्या मनात घृणा उत्पन्न होऊन, नको ते दृश्य म्हणून एक पुस्तक काढून शक्य तो लांब कोप-यात अंग चोरून बसून वाचावया सुरुवात केली.

 अर्धा तास झाला असेल. डब्यात सामसूम होते. ती स्तब्धता मला जाणवून मी वर पाहिले तो सारम्मा पलीकडच्या बाकावर पाय लांब पडली होती व मारीकुट्टी माझी पेटी शेतखान्यासमोर ओढून, शेतखान्या दार उघडे टाकून, एका हातावर हनुवटी टाकून एकाग्रतेने पायखान्या खोलीत टक लावून बसली होती. तिच्या तोंडावरून ती भावनावश झालेली
परिपूर्ती / ४३
 

दिसत होती. ही विचित्र बाई अशी काय बसली आहे असा माझ्या मनात विचार येतो तोच ती उदगारली, “माझी छबडी ती! जाईच्या फुलांची रास घातली आहे जणू! सिस्टर, बघा ना जरा-” सारम्मा तर उठलीच पण मीही हा प्रकार काय आहे, म्हणून पुढे होऊन उघड्या दारातून शेतखान्यात डोकावले. तोंड धुवायच्या भांड्याखाली मोकळी जागा असते तेथे पाच लहान पांढरीशुभ्र कबुतरे बाजरी खात होती- डौलाने चालत होती- घशातून लाडिक आवाज काढीत होती. मी मारीकुट्टीकडे पाहिले- तिच्या डोळ्यांतून वात्सल्य ओसंडून जात होते. ती सांगत होती, “बिचारी कालपासून त्या टोपलीत कोंडून पडली होती! आता पहा जरा हलायला मिळाले तर कशी खुशालली आहेत ती! माझी जाईची फुलं ती!" तिने एकेकाला उचलून कुरवाळले, क्षणभर आपले गाल त्यांच्या शुभ्र अंगावर टेकले व त्यांना उचलून परत टोपल्यात ठेवले. मी मात्र स्तिमित नजरेने मारीकुट्टीकडे पाहात होते. तिच्या कुरूप चेहऱ्यामागे लपलेले जाईच्या फुलासारखे कोमल, काव्यमय हृदय कसे ढगाआडच्या सूर्यप्रकाशासारखे आल्हाददायक वाटत होते! ती परत माझ्या शेजारी येऊन बसली. मी खिडकीतून बाहेर पाहू लागले. “अंधारात बाहेर काय पाहता आहा?" मी म्हटले, "छे! बाहेर अंधार नाही- पूर्णिमा चार दिवसांवर आली नाही का? पाहा कसं चांदणं पडलं आहे ते!" ती माझ्या खिडकीशी येऊन दोन क्षण मुकाट्याने बाहेर डोकावून पाहात होती. एक निश्वास टाकून ती म्हणाली, “ह्या वेळी आम्ही पुनवेचा चंद्र परस्परांच्या सहवासात पाहू." मला तिच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. वाक्य तर ती संबंध डबाभर ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने म्हणाली होती. मी हळूच विचारले, “तुम्ही काय म्हणता मी उमजले नाही." ती सांगू लागली, “त्याचं असं आहे, मी घरापासून शेकडो मैल दूर राहाते. मागच्या वेळी मी नोकरीच्या गावी गेले, आई लागली रडायला. तशी मी तिला म्हटले, 'हे बघ आई, मी तुला दर दोन दिशी पत्र पाठवीन आणि दर पुनवेला बरोबर आठ वाजता चंद्राकडे पाहा, मी पण पाहीन- एकाच चंद्राकडे दोघींनी एकाच वेळी पाहिलं म्हणजे एकमेकींशी बोलल्यासारखंच आहे.' गेल्या वर्षभर तसंच केलं. आता पुढचा चंद्र मात्र घरच्या अंगणात आईजवळ बसून बघेन मी." त्या विलक्षण बाईने अगदी सहजगत्या सांगितले- मला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला. तिचे बोलणे, हसणे सगळे कसे अगदी

लहान मुलासारखे भाबडेपणाचे होते! तिच्या भावनात काव्य होते व तिचे
४४ । परिपूर्ती
 

मन मुलासारखे सरळ होते. त्यात गुंतागुंत नव्हती, साशंकता नव्हती- आयुष्यात जे पडेल ते करायचे, जे मनात येईल ते बोलायचे. काय तिला कधी धक्के बसलेच नव्हते का? इतका का तिच्या जीवनाचा मार्ग सरळ गेला होता? मी तिला विचारले, "तुम्ही काय करता? कॉलेजात असता होय?" "छे, छे! मी वेड्यांच्या एका इस्पितळात मुख्य नर्स आहे." तिने सांगितले. “वेड्याच्या संगतीत संबंध दिवस घालवायचा म्हणजे फार कठीण नव्हे का?' मी विचारले. “नाही हो, मुळीच नाही. उलट दवाखान्यातल्या कण्हणाऱ्या-कुंथणाऱ्या रोग्यांपरीस हे बरं! मुलांसारखं त्यांचं करावं- त्याच मन रमवावं. आठवड्यातून दोनदा मोटारीत घालून त्यांना फिरायला नेते. कोणाला वाटतं आपण राणी आहोत, म्हणून तिच्याशी तसं बोलावं; एकाला वाटतं, मी मोठा वकील आहे, म्हणून त्याच्याशी कोर्ट-कचेरीची बोलणी काढावी; एकीला वाटतं की, तिला खूप मुलं आहेत- तिला बाहुल्या आणून दिल्या आहेत- रोज ती आपल्या मुलांच्या गोष्टी सांगते. आणि खर सांगु का हो, ती लहानपणीच विधवा झाली आहे. तिला हो कुठची मुल?" मारीकुट्टी मोठ्याने व मनापासून हसली. मला क्षणभर त्या हसण्याचा राग आला; पण मग लक्षात आले की, मारी हसली ती काही दुष्टपणाने नव्हे- केवळ बालिशपणामुळे. जिला कधी मूल झालेच नाही तिने आपल्याला मुले आहेत म्हणून सांगावे हा विरोधाभास तिच्या बद्धीला कळला. त्याच्यामागच्या भग्न मनोरथांचे आकलन होण्याइतकी ती मोठी झाली नव्हती- नाही, कधीही होणार नाही. तिचे म्हणणे बरोबर होते. एरवीचे रोगी आयुष्याच्या झगद्यात दुखावलेले, पराजित झालेले, सदा कष्टी असे असतात; पण वेड्याच नाही. त्यांना आयुष्यात जे मिळवता आले नाही ते मिळवलेच ह्या गोड भ्रातीत ते आनंदात असतात. त्यांनी जीवनाचा पराजय करून हेचि देही हेची डोळा निर्वाण- इच्छापूर्ती-गाठलेली असते. ते वेडे आणि ही सदा मूल असलेली त्यांची नर्स! योग्य ठिकाणी योग्य माणूस पडले बुवा! हा विचार माझ्या मनात आला-
 शेजारच्या बाकावरची सारम्मा मोठ्याने हसली. “काय हो, तुम्हाला हसायला काय झालं?" सारम्मा पडल्या पडल्याच म्हणाली, "मला ह्या मारीची गमत वाटली. आता पाहा कशा गप्पा सांगते आहे! दहा-बार वर्षांपूर्वी तुम्ही तिला पाहायची होतीत. एवढीशी काटकुळी पोर होती.

नुकतीच नर्सचं शिक्षण घेण्यापूर्वी माझ्या हाताखाली आली होती. सारखी
परिपूर्ती / ४५
 

रडायची, धड खायची नाही, प्यायची नाही. चोरासारखी वावरायची. कधी प्रश्न विचारला तर दोन शब्द बाहेर पडायचे नाहीत तिच्या तोंडातून. काल इतक्या वर्षांनी अचानक गाडीत एकदम भेट झाली. मला ओळखलीच नाही तीच ही मारी म्हणून. मारी पण हसली व मान वेळावून म्हणाली, “सिस्टर, त्या वेळी माझी स्थिती निराळी होती. मी अनोळखी माणसांत आले होते. मला नर्सच्या कामाची इतकी शिसारी यायची की काम केलेल्या हातानं काही खाऊ-पिऊ नये असं वाटायचं." मला पटले तिचे. शरीरशास्त्र शिकवताना प्रेताची हळूहळू चाकूने चिरफाड करावी लागे त्यावेळी पहिल्या- पहिल्याने मला अगदी असेच होई. मी विचारले, “तुम्हाला जर ह्या कामाची इतकी शिसारी तर त्यात शिरला कशाला?"
{{gap"""मला गत्यंतरच नव्हतं." ती म्हणाली. “माझे बाबा होते तोवर एखाद्या राणीसारखी माझी परिस्थिती होती. घरात इकडची काडी तिकडे करू द्यायचे नाहीत. पण ते अगदी ऐन उमेदीत वारले. त्यांचा धंद्यात गुतवलेला पैसा बुडला, कारण आम्हाला त्यात काहीच समजत नव्हते. पाच भाऊ माझ्या पाठचे- मग काय करायचे? गावच्या पायांच्या वशिल्यानं आईनं माझी नर्स म्हणून शिकण्याची व्यवस्था केली. आता भाऊ मिळवते आहेत- कुटुंब सावरलं आहे. आई म्हणते नोकरी सोड म्हणून. मण मलाच बरं वाटत नाही भावांच्याकडे तुकडे मोडणं." ही सर्व हकीकत तिने सहज नेहमीच्या स्वरात सांगितली. त्यात दु:ख नव्हते, स्वत:बद्दल कीव नव्हती. की अभिमान नव्हता. ती काही स्थितप्रज्ञ नव्हती. तिला सुख-दु:खे सारखी नव्हती. तिचे मन काही योग्यासारखे मानवी व्यवहारापासून अलिप्त नव्हते. उलट ती जीवनात पूर्णपणे बुडालेली होती. अगदी लहान सहान गोष्टीतून ती स्वत:ला आनंद निर्माण करीत होती आणि स्वत:ला नकळत जिथे जाईल तिथे आनंद पसरीत होती. आताच पाहा ना, ती मला पुढे सांगू लागली, "आणखी आता मला नोकरी चांगली आहे. माझं बिहाड सुरेख आहे. आठवड्यातून दोनदा सिंहाचलमवर गेलं की समोरचं बंदर व पुढे पसरलेला अफाट समुद्र कितीदा जरी पाहिला तरी परत-परत पाहावासा वाटतो. आता मला पारूरसारख्या लहान गावात करमणार पण नाही.” “म्हणजे तुम्ही विजगापट्टमला असता वाटतं?" मी विचारले. “नाही, वाल्टेरला- तिथून कधीकधी बंदरावर जाते. पण आमचं इस्पितळ वाल्टेरला आहे. तुम्ही

पाहिलं आहेत का? फार छान शहर आहे, नाही?"
४६ / परिपूर्ती
 

"खरंच छान आहे. ते विक्रमदेव कॉलेज आणि काजूच्या झाडांचा माळ तर मला छान आठवतात," मी मनापासून म्हटले. “आणखी वाल्टेर म्हटलं म्हणजे मला भाजलेल्या काजूचा खमंग वास येऊ लागतो. आम्ही किती काजू विकत घेतले आणि आजारी पडेपर्यंत खाल्ले! तशीच तुमच्या वाल्टेरची आंब्याची साठी- बर्फीसारखी जाड आणि मधुर."
 आपल्या शहराची स्तुती ऐकून मारी खुशालली. सारम्मा पलीकडून म्हणाली, “काय म्हणता वाल्टेर इतकं छान आहे! मला तर वाटतं, मद्रासइतकं सुंदर शहर नाही. समुद्रकाठचा मोठा रस्ता व सुंदर-सुदर इमारती! तुम्हाला नाही आवडत मद्रास? तुम्ही मद्रासलाच राहता ना?"
 तसे पाहिले तर मद्रास मला कधीच विशेष संदर वाटले नव्हते, पण मद्रासबद्दल मत सांगणे नको म्हणून मी म्हटले, "छे! मी मद्रासची नाही... कोचीनची गाडी पकडण्यासाठी मला मद्रासला यावं लागलं. मी आहे पुण्याची.” “अहो तुमचं पुणं कसं आहे हो? आणि कशाबद्दल प्रसिद्ध आहे?" मारीने विचारले.
 “आता मात्र पंचाईत आली खरी. पुण्याबद्दल कोणी काही विचारले म्हणजे माझी त्रेधा उडते. बाकीच्या किती गावांविषयी वा शहरांविषया बरेवाईट मत देताना माझी जीभ मुळीच अडखळत नाही. पण कुणा पुण्याबद्दल विचारले म्हणजे मला अगदी पेचात पडल्यासारखे होते. पुणे म्हणजे इतर गावांसारखेच एक गाव आहे, त्याला रूप आहे, त्याला वाण आहे, त्याला गुण आहेत व त्या सर्वांचे नीट योग्य शब्दांत वर्णन करता येईल ही कल्पनाच मला करता येत नाही. आपल्याला अतिपरिचय नसलेल्या माणसांबद्दल कोणी काही विचारले तर आपण नाही का चटदिशी उत्तर देऊन मोकळे होत? पण तेच अगदी आपल्या जवळच्या माणसाच्या स्वभावाबद्दल आपल्याला काही सांगणे कसे जड जाते? तसेच माझे पुण्याबद्दल होते. पुणे म्हटले म्हणजे हजारो चित्रे माझ्या डोळ्यांपुढून जातात- हजारो आठवणी गर्दी करून उसळतात व त्यातील कुठचे पुणे हेच मला ठरवता येत नाही. लहानपणी तपकीरगल्लीतून बाहेर पडले की किर्लोस्कर नाटकगृहापासून तो बाहुलीच्या हौदापर्यंतचा रस्ता म्हणजे मला एक माणसांचा समुद्र वाटे, व दाजींचा हात धरून मंडईपर्यंत जाऊन आल्यावर केवढा पराक्रम केला अशा फशारकीत मी असे. जरा मोठी झाल्यावर फुटक्या बुरुजावरून शनिवारच्या रस्त्याने पांजरपोळातून हसबनिसांच्या बोळात एका मैत्रिणीकडे जात-येत