परिपूर्ती/स्त्री व संस्कृती




स्त्री-व-संस्कृती

काही वर्षांपूर्वीची गोष्ट मी थोडे दिवस

वाईला राहिले होते. त्याच वाड्यात मराठ्याचे
एक तरुण जोडपे होते. नवरा उत्तमपैकी गवंडी
होता, व बायको-एक-दोन घरी मोलमजुरी करी.
दोघेही देखणी, हसतमुख, नेहमी ठाकठीक
पोशाक केलेली अशी असायची. मी ज्यांच्या
घरी राहिले होते. त्यांना म्हदले,"कसा जोड़ा
छान आहे,नाही?" वयस्क गृहस्थ व त्यांच्या
पत्नी दोघेही एकदम म्हणाले अहो, दिसायला
छान असून काय उपयोग? तो माणूस फार निर्दय
आहे. महिना-पंधरवड्यात एकदा तरी बायकोला
मारतो.' मी म्हटले, “ती तर चांगली आनंदी
आणि अंगा-पिंडाने गुटगुटीत दिसते. तिला
माराचं काही फारसं वाटेत नाहीसं दिसतं,"
छे:! छे!काका मान हलवून म्हणाले,हे।
तुमचे उदगार फारच अनुदार आहेत. तिला म्हणे
माराचं काही वाटत नाही! जणू-कोयं ही रीतच
आहे नवरा-बायकोची' मी ताबडतोब उत्तरले,
"हे पाहो: आपण पुढचे चार दिवस तालुक्यात
हिंडणार आहोताना,तर मी माझं काम करीन
आणि तुम्ही भेटेल त्या शेतकऱ्याला तो

बायकोला कधी मारतो का नाही ते विचारा,"
३० / परिपूर्ती
 

'हो ना' करता करता तसे करायचे ठरले व पुढचे चार दिवस काकांनी प्रत्येक शेतकऱ्याला विचारले, "काय हो, कधी बायकोला मारता का?" आणि त्यांना उत्तर मिळायचे, "हो रोजच नाही काय- कधीमधी लागतंच माराव." काका बिचारे सुधारक, त्यातून अमेरिकेचे पाणी चाखून आलेले; प्रत्येकाकडून हे उत्तर मिळालेले ऐकून त्यांचे हृदय कसे पिळवटून निघायचे! वाईला परत येताना एक खोल निःश्वास टाकून ते मला म्हणाले, "खरोखर, हिंदुस्थानातले पुरुष सुसंस्कृत कधी होणार कोण जाणे! शिक्षणानं ह्या कार्याला किती वर्षे लागतीलसं वाटतं तम्हाला?" काकांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मी टाळले; कारण सुसंस्कृत काय आणि असंस्कृत काय, आ कोण सुसंस्कृत ह्याबद्दल मला उमजच पडत नव्हता. मी समाजातील गोष्ट फक्त पाहात होते, आणि संस्कृतीची व्याख्या करणे दिवसेंदिवस जास्त जास्त अवघड वाटू लागले होते
 असाच दुसरा एक अनुभव मला आठवला. बालगुन्हेगारांच्या न्यायालयातील गोष्ट. आमच्यापुढे एक तरुण जोडपे हजर झाले होते. नवऱ्याची फिर्याद होती की, बायको सासरी राहत नाही, सारा वेळ माहेरी पळून जाते. बायको म्हणे, नवरा मारतो. नवऱ्याबरोबर त्याच आईबाप व बायकोबरोबर तिचे आईबाप आले होते आणि दोघेही आपापल्या लेकरांना भर देत होती. आम्ही बायकोला नवऱ्याच्या स्वाधीन केले, व त्याच्या कडून लिहून घेतले की, बायकोला मारणार नाही. ते जोडपे व त्यांच्याबरोबरचा परिवार निघून गेला, पण परत पंधरा दिवसांनी ही भांडणारी जोडी माघारी आली. परत त्यांच्या कटकटी चालू झाल्या. मी पाहिले तो नवरा-बायकोत कटकटी चालू झाल्या. मी पाहिले तो नवरा-बायकोत खोड ठेवायला काही जागा नव्हती. तो चांगला जवान वीस वर्षाचा होता; ती शोभेशीच चांगली देखणी, धडधाकट, वयाने सुमारे १४-१५ ची अशी होती. मी विचारले, "काय रे, बायकोला मारतोस का?" तसे तो शरमेने म्हणाला, "मी कशाला मारतो जी? जवा तवा मला कोडताचा धाक दाखवते." तिच्या तोंडावर थोडे तच्छतेचे व विजयाचे हसू झळकले. मी थोडा विचार करून बायकोच्या आईबापांना व नवऱ्याच्या आईबापांना ह्या जोडप्याच्या बिऱ्हाडी यायला बंदी केली. दोघांकडून जामीन लिहूं घेतला आणि नवरा-बायकोला जायला सांगितले. माझा ऑफिसर मला विचारतो, नवऱ्याकडून न मारण्याबद्दल घेतलेला करार संपला आहे, तो परत लिहून

घेतला पाहिजे. मी मानेनेच नकार देऊन त्या जोडप्याची बोळवण करून सहा
परिपूर्ती / ३१
 

महिन्यांनी परत कोर्टात हजर राहण्याचा हुकूम दिला. ते प्रकरण गेल्यावर सगळ्यांनी मला विचारले, "आता त्यानं तिचा जीव घेतला तर?" मी म्हटले, “पाहू या काय होतं. तुम्ही लांबून नजर ठेवा, आणि सतरांदा जाऊन त्यांना सतावू नका." मी हे सर्व जवळजवळ विसरून गेले होते, तो सहा महिन्यांनी ऑफिसरने आणून दोघांनाही हजर केले. “काय रे, ठीक चाललं आहे ना?" नवरा ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसत म्हणाला, "हां जी." बायकोला विचारले, "काय ग, तुझं म्हणणं काय आहे?" ती आज माझ्या डोळ्याला डोळा भिडवायला तयार नव्हती. तिचा बेगुमानपणा पार नाहीसा झाला होता. मी तिला परत विचारले, "नवरा मारतो का ग?" “फार नाही जी." तिने उत्तर दिले. दोघांनाही काहीतरी बोलायचे होते, पण ती घोटाळत उभी होती. इतक्यात तिची आई पुढे झाली व "मुलीला माहेराला न्यायचे आता दिवस आहेत, नेऊ का?" म्हणून विचारू लागली. मी मुकाट्याने दोघा व्याहीविहिणीवरची बंदी उठवली आणि 'शेवट समाधानकारक लागला.' असा शेरा मारून केस निकालात काढली.
 आज ह्या पूर्वीच्या गोष्टी पुन्हा आठवल्या. गाडीत मनस्वी गर्दी होती दुसऱ्या वर्गातसुद्धा लोक उभे होते. मी माझ्या पेटीवर एका कोपऱ्यात बसले होते. तो माझे लक्ष पुढेच उभ्या राहिलेल्या एका तरुण बाईकडे गेले, व मी तिला माझ्याजवळ पेटीवर जागा करून बसायला बोलावले. गेला अर्धा तास स्टेशनवर इकडेतिकडे जाताना मी तिला पाहिले होते. आम्ही अगदी जवळजवळ खेटूनच माझ्या लहानशा पेटीवर बसलो. तिने थोड्या वेळाने विचारले, "तुम्ही आमक्या-अमक्या ना?" मी "होय" म्हणून अर्थातच तिला "तुम्ही कोण?" म्हणून प्रश्न केला. तिने आपले नाव सांगितले, मी म्हटले, "हां, तुमच्या कविता मी वाचल्या आहेत; त्याच ना तुम्ही?" तिचा काळासावळा पण मोहक चेहरा आनंदाने खुलला. मला तिचा चेहरा गोड व निर्व्याज वाटला. तिचे बोलणे सरळ व खुलास होते. बांधा ठेंगणाच होता. अंगापिंडानेही ती चांगली सशक्त दिसली. थोडक्यात सांगायचे म्हणजे चार महाराष्ट्रीय बाया असतात तशी ती होती. तिने मोठ्या उत्साहाने आपल्या कामाची माहिती दिली. आपले मुख्य कसे दिलदार आहेत- त्यांचे बोलणे- चालणे कसे मनमोकळे असते, काही चुकले तर ते कसे नीट समजावून सांगतात, वगैरे गोष्टी मला ऐकवल्या. तिच्या कचेरीतील मुख्य मला ठाऊक

होते. कोणावरही चटकन छाप बसावी असे ते होते. त्यांचा देह धिप्पाड,
३२ / परिपूर्ती
 

त्याचे हसणे सति मजली त्यांचे बोलणे मोठ्यांदा; ज्याला मध्यम स्थितीतील लोंक पापभीरूपणा म्हणतात त्यांचा अभाव, स्वभावाने दुष्ट व क्षुद्र महत,पण एकदा शत्रुत्व आले तर शाब्दिक व वेळ पडल्यासं शारीरिक हल्ला करण्यास मागेपुढे न पोहणारे असे होता साहित्यगुणही त्यांच्यात होते माझ्याशी बोलणाऱ्या बाईवर त्यांची छाप पडावी ह्यात काहीच नवल नव्हते: पण बायका बोलायला लागल्या म्हणजे गोष्टी निधायच्याच. ह्या गप्पा झाल्यावर तिने मला विचारले, "मल किती? केवढी आहेत? तुमच्याशिवाय राहतात का? मीही पण तींच'चौकशी केली. बाई उत्तरली, "मला मुलांनाहीत"खरंच, तमंचं लग्न झालं नसेल नाही!" "छे! माझं लग्न झाल्याला झाली चांगली सहा वर्ष!" ती म्हणाली, उगीच आपण मुलाबद्दल प्रेक्षा विचारले असे वाटून मी गप्प बसले. थोडा वेळ थांबून बाई आपणहूनच म्हणाली मी माझ्या नवऱ्याबरोबर राहात नाही तरीसुद्धा पुढे प्रण विचारण्यांचा धीर मला होईना. तिलाच काय वाटले कोणास ठाऊक, ती आपली हकीकत पुढे सांगू लागली, “माझे आई-वडील वारले व माझ्या एका 'चुलत्यान मला वाढवलं. मी मॅट्रिक झाल्यावर माझ्या मनात नसताना सुद्धा त्यांना माझा लग्न करून दिल" तुमच वजमान अशिक्षित आहेत होय मी विचारले! छे!छे! चांगले एम. ए. पीएचडी आहेत: पण माझ मनच त्याच्याकडे ओढल जाईना. मी मनात म्हंटले, कालिदासीनच मुळी तरुण मुलीनी मोकळीक दिली आहे. ना 'तो काही विलोभनीय नव्हता असे नाही-तिला काही समजत नव्हते असेही नाही. पण तिला तो नाही आवडला झाले! कारण व्यक्ती तितक्या प्रकृती अस म्हणून त्याने नाही का इंदुमतीच्या स्वयंवराचे वर्णन केले? बाई त्या इंदुमतीच्याच परपरेतील तू! तरदेखील माझे चार पावसाळे जास्त झाले होते; नयाजवळ न राहणाऱ्या बाईचे जीवन किती कठीण ह्याची जाणीव मला होता. तिच्या आत्मविश्वासाचे थोडे कौतक आणि तिच्या मुग्धपणाबद्दल थोडी करुणा वाटूनच मी विचारले लग्न मनाविरुद्ध झालं तरी नवरा जर सदगुर्णी व सुशिक्षित असेल तर त्यांचं आपलं पटत कानाही हे तरी तुम्ही निदान पहावयाच होत! कदाचित सहवासानं प्रेम उत्पन्न झालं असत! "तोही प्रयल मी करून पाहिला" ती म्हणाली. काया त्यांचा स्वभाव चमत्कारिक आहे!" मी विचारले. "छे! तसं काही नाही, ते फार

सुस्वभावी आहेत, शिकलेलें आहेत" ती थोडी थांबली, नंतर मान हलवून
परिपूर्ती / ३३
 

म्हणाली, "त्यांच्यात तडफ म्हणून नाहीच; ते फारच गरीब आहेत हो! मी त्यांच्याबरोबर बिऱ्हाड थाटून होते की-कधी एक अवाक्षर नाही की रागावणं नाही!" माझ्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. मला माझा वाईचा अनुभव आठवला, मला कोर्टातील केस आठवली, माझ्या ओळखीचे आणखी एक कुटुंब आठवले. गृहस्थ सुसंस्कृत, विद्वान व रसिक होता- त्याचे ते उदास, करुण डोळे, त्याच्या बायकोचा खुला उमदा चेहरा, त्याच्यावर दिसत असलेला आत्मविश्वास, किंचित पुरुषी उद्धटपणा हे आठवले. ते जगात दपती होते, पण त्यांचे खरे नाते नवरा-बायकोचे नव्हते, मित्र-मैत्रिणीचे नव्हते, तर माता-पुत्राचे होते. कोर्टातील केस सोपी होती, तिचा निकाल समाधानकारकपणे लावता आला... तेथील मंडळी एकमेकांना ओळखून होती; पण मध्यम वर्गाचे सर्वच अर्धवट. माझ्या शेजारी बसलेली तरुण बाई मला विचारीत होती, "काय हो, आता घटस्फोटाचा कायदा झाला म्हणजे मला नीट काडीमोड मिळेल, नाही का!" पण माझे मन दुसरेच एक कोडे सोडविण्यात गुंतले होते-- वरवर संस्कृतीची आवरणे असलेल्या, पण आतून रानटी पौरुषाची पूजा करणाऱ्या ह्या 'तडफदार' तरुणी आणि सुसंस्कृत, शिक्षणाने कोमल मनोवृत्ती झालेले अहिंसक तरुण ह्यांची जोडी एकत्र नांदणार कशी!