पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/181

हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपुष्टात आल्या, जिल्हा परिषदेने मास्तर नेमायचे, पगार साडेतीनचार हजार रुपये, काही कमी नाही. ती नोकरी मिळवायची झाली तर गेल्यावर्षी ऐशी हजार रुपये कुणाला तरी द्यावे लागायचे असे ऐकू येते, यंदा हा दर किती वाढलाय कुणास ठाऊक? हे शिक्षक कधी शाळेमध्ये आले तर येतात, नाही तर येत नाहीत; शिकवलं तर शिकवतात, नाहीतर शिकवत नाही. माझ्या शेजारच्या गावात एक शिक्षक फक्त पगार घ्यायला येतो आणि महिनाभर आपल्या बदली शाळेत यायला त्याने पाचशे रुपयांमध्ये दुसरा एक पोटशिक्षक ठेवून दिला आहे.
 आज शिक्षणाचा दर्जा काय आहे? सातवी पास होवो, दहावी पास होवो किंवा अगदी एम.ए. झालेला असो; मुलाला मराठीतलं एक वाक्य लिहून दाखव म्हटलं तर तेसुद्धा धड लिहिता येत नाही अशी आज परिस्थिती आहे; इंग्रजी, विज्ञान हे विषय तर सोडूनच द्या. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आमची लोकसंख्या होती ३४ कोटी लोक निरक्षर होते, लिहितावाचता न येणारे होते. आज हिंदुस्थानची लोकसंख्या ९४ कोटी आहे आणि त्यातले ४२ कोटी निरक्षर आहेत. स्वातंत्र्याच्या आधी डॉ. सी. व्ही. रामन किंवा जगदीशचंद्र बोस यांच्यासारखे शास्त्रज्ञ या देशात तयार होत होते, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळत होतं, एवढंच नव्हे तर ज्यांच्या विद्वत्तेला मोठी मान्यता होती असे विद्वान तयार होत होते. आज हिंदुस्थनातल्या शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिकांच्या यादीतसुद्धा त्यांचं नाव येऊ शकत नाही. विद्यार्थ्यांपैकी बरेच जण आता काँप्युटरचं शिक्षण घेत असतील. काँप्युटरमध्ये दर आठ दिवसांनी काही नवीन शोध लागताहेत आणि काय नवीन शोध लावायची धडपड चालली आहे याचा अंदाजसुद्धा आमच्यातील तज्ज्ञांना नसतो, इतके आम्ही जगाच्या मागे गेलो आहोत.शाळा वाढल्या, कॉलेज वाढली, पुढाऱ्यांची मोठी मोठी कॉलेज झाली, शिक्षणक्षेत्रात पैसे खूप खेळू लागले; पण तिथं शिक्षण म्हणून काही राहिलं नाही. जशी दारूची दुकानं निघाली आणि हातभट्ट्यासुद्धा निघाल्या.
 हे का झालं? या प्रश्नाचं उत्तर, मला वाटतं, तुम्हा विद्यार्थ्यांना द्यावं लागणार आहे. मी माझ्या पिढीच्या वतीने माझे कान पकडून तुम्हा तरुण मंडळीची क्षमा मागतो की, आमच्या पिढीनं या देशाचं वाटोळं केलं; पण तुम्ही जर का आमच्या पिढीचा रस्ता सोडला नाही आणि गप्प बसून राहायचं ठरवलं तर हा देश आता वाचत नाही हीही खूणगाइ बांधून घ्या.

 मी गेल्या महिन्यांमध्ये बर्लिन्यामध्ये बर्लिनला एका परिषदेकरिता गेलो

भारतासाठी । १८१