पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/225

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे हे उघड आहे; पण यापलीकडे काही दुसरा विचार असू शकत नाही? मला स्वातंत्र्य प्रिय आहे, मी जगाशी टक्कर घेईन. गुणवत्तेची जोपासना करेन आणि जगावर मात करेन; ते जमले नाही तर माझ्या कर्तबगारीला साजेसे जे काही मिळेल त्यावर संतोष मानेन; स्वातंत्र्यात उपाशी मरेन; पण बंदिस्त व्यवस्थेत सरकारी झुणका भाकरीवर सूट-सबसिडीवर जगणार नाही असा साधा विचार केला तर?
 पण, स्वातंत्र्याची अशी तळमळ आज तरी दिसत नाही. कोणी २ रुपये किलोने तांदूळ दिले, कुणी झुणका भाकर दिली, कुणी शाळेत तांदूळ फुकट वाटले, कुणी राखीव जागा दिल्या तर असली भीक नाकारण्याची तडफ दाखवणारे कुणीच नाही. एका काळी माणसे संपन्नतेचा आणि प्रतिष्ठेचा खोटा आव आणीत; आता आपण मागास आहोत, गरीब आहोत अशी खोटी प्रमाणपत्रे तयार करून लोक अनुदाने हडप करण्याच्या प्रयत्नात राहतात. ही भीकवादी माणसे भाषा करतात स्वदेशीची आणि काय वाटेल ते युक्तिवाद करतात. कोणी म्हणते, पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी आली आणि देशावर अंमल बसवून गेली; नव्या बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच करतील. डॉन क्विक्झोटप्रमाणे मनाने मध्यम युगात वावरणारी ही माणसे. आपले स्वातंत्र्य नकली आहे, तकलादू आहे. विलायती सत्तांचे सामर्थ्य इतके मोठे आहे की, लष्करी सत्ता मिळवण्याचे त्यांनी मनात झेंडा फडकू शकतो. 'पाश्चिमात्यांना वसाहती नकाशा झाल्या म्हणून आपण केवळ स्वतंत्र आहोत.' ही दुःखद जाणीव स्वदेशीवाल्यांना नाही. ते आपले त्यांच्याच गुर्मीत राहतात. आजच्या अवस्थेतील हिंदुस्थान चालवण्यासाठी टेंडर काढले तर ते भरण्यासाठी साऱ्या जगात कोणीही पुढे येणार नाही; पैसा आणि रक्त खर्चुन हिंदुस्थानावर सत्ता गाजवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
 शेवट काय होणार?

 स्वदेशीच्या पहिल्या दोन लढाया भारतातील शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाज हरले, ऐतखाऊ जिंकले. नेता, तस्कर, गुंड, अफसर या सगळ्यांविरुद्ध शेतकरी संघटना एकाकी लढत देत आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, मला भीती वाटते की, तिसऱ्या लढाईतही स्वदेशीच्या नव्या ब्राह्मणाचा विजय होण्याची दाट शक्यता दिसते. बहुजन समाज तिसऱ्यांदा हरण्याची सारी लक्षणे दिसतात. जागतिक प्रवाहामध्ये प्रवाहामध्ये प्रवेश करण्याची ही तिसरी संधी आपण हुकवली तर भारताला भविष्य म्हणून काही राहील असे दिसत नाही आणि तरीही, देशबुडच्या स्वदेशीचे समर्थन राष्ट्रप्रेमाच्या आणि धर्मनिष्ठेच्या गलबल्यात

भारतासाठी । २२५