या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंकगणित. मिळवून त्या ओळीची बेरीज करावी ह्याप्रमाणे शेवटपर्यंत करीत जावें. परंतु शेवटल्या ओळीची बेरीज मात्र, जी येईल तीच मांडावी. उ. १६५०६४ जसें, ह्यांची बेरीज कर. आतां ५ आणि ७ बारा, १२ • आणि ३ पंधरा, १५ आणि २ सतरा, १७ आणि ४ एकवीस, २१ आणि ३ चोवीस, ह्मणजे ४ एकं आणि २ दहं आले, ह्यातील ४ एकं हे एकंच्या ओळीखालीं मांडावे, आणि २ दहं हे दहंच्या ओळींत मिळवावे, ह्मणजे २ आणि ९ अकरा, ११ आणि ४ पंधरा, १५ आणि ९ चोवीस, ह्या प्रमाणें मिळवीत वरपर्यंत गेलें, म्हणजे ह्या ओळीची बेरीज ३६ ह्मणजे ३ शतं आणि ६ दहं आली, ह्यांतील ६ दहं हे दहंच्या ओ- ळीखालीं लिहून ३ शतं हे पूर्ववत् शतंच्या ओळींत मिळवावे. ह्या प्रमाण शेवटपर्यंत करावें. ह्मणजे एकंदर १६५०६४ बेरीज येईल. नाळा पाहण्याची रीत. पहिल्याचे उलट वरून खालीं किंवा खालून वर अंक मिळवीत जावे; बेरीज तेवढीच आली तर बरोबर आहे, असें समजावें. दुसरी रीति. दिलेल्या रकमांतील कोणतीही एक रकम सोडून बाकीच्या रकमांची बेरीज करावी, आणि तींत सोड- लेली रकम मिळवावी; ही बेरीज मूळचे बरेजेबरोबर आली तर ती खरी आहे, असें समजावें. अभ्यासाकरितां उदाहरणें. १ उ. १४१७, १८२५, २५, ३४७८, ११२, १७८९६, ८८८८८, १००००१, ह्यांची बेरीज कर. २ उ. ३४४७, ७, १८, २१५, ३४३८, ८५४३२, १८२५३७, ३१२, ८, ह्यांची बेरीज कर. ३ उ. १५, २७, ३८, ९१८, ३००१, ५०००, १२, ह्यांची बेरीज कर.