या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ अंकगणित. असला, तर वरच्यांत दहा मिळवून मग त्यांतून खालचा अंक वजा करावा; व त्याचे पाठीमागील अंकांची वजा. बाकी करते देळेस खालच्या अंकांत एक मिळवून मग तो अंक वरच्या अंकांतून वजा करावा. ७९४३२७ हींतून ३४२८१४ ही बजा करावयाची. ४५१५१३ अंतर. जसें, एकं स्थानाचे ७ ह्यांतून ४ गेले, तेव्हां बाकी उरले तीन, ह एकंचे स्थळाखाली लिही, पुन्हा २ दहं ह्यांतून १ दहं गेला, तेव्हां बाकी राहिला १दहं तो दहंखाली लिही; याचप्रमाणे शतंतून शतं वजा करावयाचे परंतु येथे ३ ह्यांतून ८ वजा जात नाहीत ह्मणून मागचे चार सहस्रांतून एक सहस्र उसना घ्यावा; आतां १ सहस्राचे १० शतं आणि हे ३ मिळून १३ शतं ह्यांतून ८ गेले, तेव्हां बाकी राहिले ५ हे शतंचे स्थळीं लिही, आतां, ही वजाबाकी करतांना मागचे ४ पैकी १ उ- सना घेतला तेव्हा त्या ठिकाणी आतां ३ राहिले म्हणून पुढे बजा. बाकी करतांना ३ ह्यांतून २ गेले असें म्हटलें पाहिजे, परंतु चाल * अशी नाहीं. उसना घेतलेला अंक वजा करावयाचे अंकांत मिळ- वितात, आणि नंतर तो अंक वरच्या अंकांतून वजा करितात, म्हणजे खालचे ओळीतले २ आणि उसना घेतलेला + १ मिळून ३ हे ४ ह्यां- तून गेले, तेव्हां बाकी राहिला १ तो सहस्रस्थानीं लिही. ह्याप्रमाणें शेवटपर्यंत करावें, म्हणजे उत्तर ४५१५१३ येईल. ताळा पाहाण्याची रीति, वाकीमध्यें वजा केलेली रकम मिळवावी; वरची रकम आली म्हणजे वजाबाकी बरोबर आहे असें समजावें. अथवा बाकी वरचे रकमेंत वजा करावी, खालची रकम आली म्हणजे वजाबाकी खरी.

  • ३-२-४-३ आहेत.

+ उसना घेतलेल्या अंकास हातचा असें ह्मणतात.