१० अंकगणित. इतकीपट करावयाची आहे, तेव्हां पाहिजे ती संख्या गुण्य व पाहिजे ती गुणक, मानावी. ज्या संख्येस गुणावयाचें तीस गुण्य, व जिने गुणावयाचें तीस गुणक, व गुणून जी संख्या येती, तीस गुणाकार, असें म्हणतात. गुण्य व गुणक ह्यांस गुणाकाराचे अवयव, किंवा पोटां- तील भाग, असें म्हणतात. गुणक संख्या गुण्य संख्येच्या खाली उजवे बाजूस लि- हावी. जेव्हां गुणक संख्या जे पाढे आपणास पाठ येत आहेत त्यांचे आंत आहे, तेव्हां तिनें गुण्य संख्येतील उजवे- कडून एक एक अंक गुणून गुणाकार येईल तो रेघेखालीं लिहावा. गुणाकार ९ ह्यांहून जास्ती आल्यास त्यांतील उजवेकडचा शेवटला अंक रेघेखालीं लिहून बाकीचे अंक हातचे वेऊन ते गुण्यांतील पहिल्या अंकाच्या मागील अं- काच्या गुणाकारांत मिळवावे. ह्याप्रमाणे शेवटपर्यंत करावें. शेवटल्या अंकाचा गुणाकार जो येईल तो सर्वच मांडावा. जसें, ३४६७ हे गुण्य २ गुणक ६९३४ हा गुणाकार. ह्या उदाहरणांत २ सत्ती १४, झणजे ४ एकं व १ दशक, ह्यांतील ४ एकं हे एकं स्थानी लिहून १ दशक हातचा घेतला. पुन्हा २ सक १२ दशक, आणि हातचा १ मिळून १३ दशक, म्हणजे १ शतक, आणि ३ दशक. ह्यांतील ३ हे दशकस्थानी लिहून १ शतक हातचा घेतला. नंतर २ चौक ८ शतक आणि हातचा १ मिळून ९ शतक हे शतक स्थानी लिहिले. पुन्हा २ त्रीक ६ सहस्राचे ६ हे सहस्र स्थानीं मांडले. मिळून सर्व गुणाकार ६९३४ आला.
पान:अंकगणित.pdf/२०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही