या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुणाकार. ११ परंतु जेव्हां गुणकांक दोन किंवा अधिक स्थळांचा असतो तेव्हां तो पूर्वीप्रमाणे गुण्य संख्येखाली लिहून त्यांतील एक एक अंक घेऊन त्यानें पूर्ववत् गुणून गुणाकार करावा. जसें, ह्यांत पहिल्याने पूर्वीप्रमाणं गुण- ३४६७ गुण्य ह्यास _६९२ गुणकानें गुण. कांकांतील २ ह्या अंकाने गुण्यांक गुणून ६९२४ ३१२०३ २०८०२ २३९९१६४ हा गुणाकार. तो गुणाकार रेघेखाली लिहावा. नंतर दहं स्थानी ९ आहेत त्यांनी पुन्हा वरचे अंक गुणावे, म्हणजे दशक ९ सत्तें ६३ दशक, म्हणजे ६ शतक आणि ३ दशक ह्यांतील ३ दशक हे दशकांकाखाली यावयास पाहि. जेत म्हणून ओळीच्या दुसन्या अंकाखाली म्हणजे दहं खालीं लिहून पुढे गुणाकार पूर्वी सांगितल्या रीतीने करावा. ह्याचप्रमाणे शतंचे अं- काचा गुणाकार शतंचे अंकापासून ( वरच्या गुणाकारांतील एक अंक सोडून) मांडावा, ह्याप्रमाणे सर्व गुणकांकांचे गुणाकार एक एक अंक मांग सारून लिहावे, आणि शेवटी सर्वांची बेरीज घ्यावी. जर गुणकांकांचे गुण्यगुणकरूपानें दोन किंवा अधिक तुकडे ह्मणजे अवयव, करता आले तर सर्व गुणकांकानें गुणण्याबदल प्रथम एका अवयवाने गुणून जो गुणाकार येईल त्यास दुसरे अवयवानें गुणावें. जसें, ३७२१८ ह्यांस ४२ ह्यांनी गुणावयाचें आहे. आतां २२३३०८ ४२=६ X ७ ह्मणून प्रथम ६ नीं गुणून नंतर त्या १५६३१५६ गुणाकारास ७ नीं गुणावें, म्हणजे १५६ ३१५६ हा इच्छिला गुणाकार येईल. अथवा २४३ × ७ ह्यांत पहिल्यानें दोहांनी मग तिहीनों मग सातांनी गुणावें. गुण्य व गणक यांवर कांहीं शून्यें असल्यास, गुणाकार करितांना ती पहिल्याने लक्षांत आणूं - नये. गुणाकार झाल्यावर ती सर्व मोजून तेवढीं त्यावर लिहावीं म्हणजे झालें.