१२ अंकगणित. उदा. ३४५७००० गुण्य. १२०० गुणक. ४१४८४००००० गुणाकार. पहिल्याने ३४५७ आणि १२ यांचा गुणाकार केला तो ४१४८४ झाला. नंतर गुण्यांकांवरची तीन, गुणकांकांवरची दोन, मिळून पांच शून्यॅ झाली तेवढीं गुगाकारावर ठेवली म्हणजे ४१४८४००००० हा इच्छिला गुणाकार झाला. ताळा. गुणाकाराचा ताळा पाहणें झाल्यास गुण्य आहेत ते गुणक करावे. आणि गुगक आहेत ते गु करावे. त्यांचा गुणाकार पहिल्या इतका आला ह्मणजे खरा आहे, असें समजावें. ९ टाकून ताळा पाहण्याची एक रीत आहे, ती अशी कीं गुणाकाराचे एके आंगास अशा दोन रेघा काढाव्या, नंतर गुण्यांक संख्येंतील सर्व अंकांची बेरीज घेऊन तींतून नऊ जितके वेळां जातील तितके वेळां टाकून बाकी राहील ती या दोन रेवांच्या एका कोनांत लिहावी. पुन्हा गुण- कांकांची बेरीज घेऊन तींतील ९ पूर्ववत् टाकून बाकी राहील ती पूर्वी लिहिलेल्या बाकीचे समोरचे कोनांत लिहावी. नंतर ह्या दोन्ही बाक्यांचा गुणाकार करून त्यांतील ९ वर सांगितल्याप्रमाणे टाकून बाकी राहील ती तिसरे कोनांत लिहावी; आणि मग गुणाकारांतील सर्व अंकांची बेरीज करून तीतील ९ टाकून बाकी राहील ती
पान:अंकगणित.pdf/२२
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही