या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुणाकार. १३ राहिलेल्या चवथ्या कोनांत लिहावी. ही व हिच्या समोरची बाकी ह्या सारख्या आल्या ह्मणजे गुणाकार खरा * आहे असे समजावें. जसे, मागील उदाहरणांतील गुण्यांक ३४६७ ह्यांची बेरीज २० ह्यां तील सर्व ९ टाकून बाकी राहिले २ ते उजवेकडील कानांत लिहिले, ह्याचप्रमाणें गुणकांक ६९२ ह्यांची बेरीज १७ ह्यांतील ९ जाऊन बाकी ८ राहिले ते डावेकडील कोनांत लिहिले, नंतर ८ x २ = १६ ह्यांतील ९ टाकून बाकी ७ राहिले ते तिसरे कोनांत लिहिले, आणि गुणाकारांतील सर्व अंक २३९९१६४ ह्यांची बेरीज ३१; ह्यांतील सर्वे ९ टाकून बाकी ७ राहिले ते चवथे कोनांत लिहिले, आता वरच्या व खालच्या कोनांतील अंक एकच आले म्हणून गुणा- कार बरोबर आहे. पुढें जीं अभ्यासाकरितां उदाहरणे दिली आहेत, त्यांचा ताळा शिकणान्यांनी कोणते तरी एक रीतीने किंवा दोन्हों रोतींनी करून पाहावा. अभ्यासाकरितां उदाहरणें. १ उ. ३४५६७३ × २, २ उ. ४१५७६३ × ४, ४५७६३२ x 3. ३७१२८१ x ५. ३ उ. ६३५४३२ × 5 ४२१३७५ x ७. ४ उ. ३७८९१४ x ४७६५३९ x ८. ५. उ. ४३५९७९ x ९७८५६४ x ११ ६. उ. ४१६७८२ x १२, ८७६५४९ x १२. ७ उ. ३७८१८५ X १६, ४५६९३२ x १८. ८ उ. ७१२४३६ x २४, ५४३८१७ x २७, ९ उ. १० उ. ५९३६५४ x ०. ६९२७२८ x ३६. ७६५४३८४०, ५९६४३७ x ४५.

  • गुणाकाराच्या रकमेपैकीं एकाद्या अंकांत एक अंक जास्ती झाला

आणि दुसन्यांत एक कमी झाला, तर गुणाकारांत चूक असतांनाही ताळा बरोबर मिळतो. कारण असें झाल्याने गुणाकाराच्या अंकां- च्या बेरजेत भेद पडत नाहीं. परंतु अशी चूक कचित् होते.