भागाकार. भाजकांकापेक्षां भाज्यसंख्येतील पहिला अंक लहान अस- ला तर भाजकसंख्या वजा जाईल इतके त्याच्या पुढचे अंक त्यावर घेऊन त्यांतून भाजकसंख्या किती वेळा वजा जाईल तें पहावें; नंतर तो वेळांक रेघेखाली मांडून त्यानें भाजक- संख्या गुणून तो गुणाकार भाज्यसंख्येतील घेतलेच्या अंकां- तून वजा करावा, बाकी राहील तिजवर आणखी भाज्यसं- ख्येतील अंक घ्यावा. हा नवा भाज्य झाला. नंतर पुन्हा पहिल्याप्रमाणें करून बाकी काढावी. ह्याप्रमाणें भाज्यसं- ख्येतील सर्व अंक संपत तोंपर्यंत करावें, जसें, ४) २३७९ । ह्या उदाहरणांत पहिल्यानें भाज्यांकांतील २ घेतले ५९४ परंतु त्यांत ४ हे वजा जात नाहींत म्हणून दोन अंक २३ घेतले. आतां ४ पंचें २० आणि ३ तेवीस म्हणजे तेविसांत ४ हे पांच वेळा वजा जाऊन बाकी ३ उरले. भाग पांच आला तो रेषेखालीं लिहिला, बाकी ३ शतक उरले त्यांवर ७ दशक घेतले, तेव्हां ३७ दशक झाले. आतां २७ त ४ हे ९ वेळां जाऊन बाकी १ दशक उरला. ९ हे रेघेखाली पांचावर लिहिले. बाकी १ दशक उरला त्यावर ९ एकं घेतले तेव्हां १९ एक झाले ह्यांतून ४ हे ४ वेळां वजा जाऊन बाकी ३ उरले. बाकी भागाकाराच्या पुढें लिहावी, ती अशी कीं प्रथम बाकी लिहून तिचे खाली रेघ काढून त्या रेघेखालों भाज- कांक लिहावा, जसें ५९४३ बाकी अशी कां लिहितात हैं पुढें अपूर्णांकांत समजेल. जेव्हां भाजक, आपणास पाढे येतात त्यांहून मोठा असतो तेव्हां भाजक डावे बाजूस पहिल्याप्रमाणे लिहून भाज्यांकाचे उजवे बाजूस एक कौंस करून त्याचे बाहेर भागाकार लिहावा.
पान:अंकगणित.pdf/२५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही