२० अंकगणित, पौंडांचे किती रुपये झाले ? आणि ह्या उत्पन्नांतून सरकार खर्चा - बदल १९९२७०२२० रुपये वजा करून बाकी सरकार तिजोरीत शिलक किती राहिले, तें सांग? त्रिराशि. अथवा प्रमाण गणित- या गणितांत उत्तर काढण्यास तीन परिमाणे अथवा राशी दिल्या असतात, ह्मणून या गणितास त्रिराशि अथवा प्रमाण गणित ह्मणतात. कित्येक परिमाण एकमेकांचे प्रमाणांत वाढतात किंवा कमी होतात, जसें बाजारांत किंमत अधिक किंवा कमी द्यावी त्याप्रमाणें जिन्नस अधिक किंवा कमी येतो, तेव्हां जिन्नस किमतीचे प्रमाणांत आहे असें ह्मणावयास काय चिंता आहे. पहा बरें, एक पैशाचे चार आंबे मिळत असले तर २ पैशांचे ८, ३. पैशांचे १२, याप्रमाणे मिळतील हे उघड आहे. त्रिराशि गणितांत तीन राशि दिल्या असतात; त्यांत दोन एक जातीच्या असतात आणि तिसरी वेगळ्या जातीची असते; उत्तर यावयाचें तें तिसन्ये राशीचे जातीचें असतें. त्रिराशीत पहिले व दुसरें हीं दोन्हीं पर्दे किंवा राशि एका जाती- चीं असतात आणि उत्तर यावयाचें त्या जातीचें तिसरें पद असतें. पहिले दोन पदांस प्रमाण पदें, तिसरे पदास इच्छांक व उत्तरास इच्छाफळ म्हणतात. पहिले पदास आदिपद आणि दुसरे पदास मध्यांक अशाही संज्ञा आहेत. पहिले दोन पदांत जे प्रमाण असतें त्याप्रमाणें तिसरे पद आणि इच्छाफळ यांजमध्यें असतें. एका पैशाचे ४ आंत्रे मिळत असले तर एक पैशाचे ठिकाणी ५पै. से दिले तर ४ आंब्यांबदल किती आंबे मिळतील ? या हिशोबात एका
पान:अंकगणित.pdf/३०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही