या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्रिराशि. २१ पैशाची पांचट केली तर ४ आंब्यांची पांचपट किती होईल हा प्रश्न आहे, हें संक्षेपानें लिहिण्याची चाल खाली दाखविली आहे. भां. पै. पै. १ : ५ : आं.

४ :

२० उदाहणांत पहिली दोन पदें एका जातीची नसली तर हिशेत्र व्हावयाचा नाहीं, तसेंच तिसरे स्थानों जें पद असतें त्या जातीचें जर उत्तर मागितलें नाहीं तरीही हिशेब व्हा- वयाचा नाहीं. कारण पैसा द्यावयाचा त्याच्या ठिकाणी एका पैशाबदल २ केळी दिली तर विकणारा त्या दोन केळ्यांचे किती आंबे देईल? या प्रश्नांत काही अर्थ नाही. तसेंच एका पैशाचे ४ आंबे मिळत असले तर पांच पैशांचे जेवढे आंबे मिळतील त्या आंब्यांबदल केळी किती येतील या प्रश्नांतही कांही अर्थ नाही. जो परिमाण सरळ प्रमाणाने वाढतील किंवा कमी हो- तील त्यांचेच हिशेत्र त्रिराशि गणितानें होतील. परंतु तशा तऱ्हेचें प्रमाण नसून पहिली दोन पदें सजातीय आली तथापि उत्तर मिळावयाचें नाहीं. उदाहरण. एक मनुष्य मुंबईहून ठाण्यास १२ तासांत जाईल आणि दुसरी दोन, चार, किंवा पुष्कळ मनुष्यें मुंबईहून निवाली तरी त्या सर्वोस ठाण्यास पोचण्यास १२ च तास लागतील. अधिक मनुष्ये झाली म्हणून मजल लवकर खेटतां येईल असे नाहीं. उदाहरणांत कियेक गोष्टी उगीच सांगितलेल्या असतात; त्यांस गणितांत उपयोगांत आणण्याची कांहीं गरज पडत नाहीं. बाजारांत अत्र्यिांच्या ७ टोपल्या भरल्या होत्या. त्यांतील सर्व आंत्रे २०० होते ते आम्ही, पैशाचे चार या दराने ठरावून घेतले. तर सर्व आंब्यांची किम्मत काय झाली? या हिशोबांत ७ टोपल्या उगीच सांगितल्या, त्यांची हिशोबांन कांही गरज नाहीं.