अंकगणित. त्रिराशि पदांतील प्रमाण दोन प्रकारचें असतें, एक सरळ किंवा सम प्रमाण; दुसरें व्युत्क्रम किंवा व्यस्त प्रमाण. परिमाणें अशा प्रमाणांत असली कीं त्यांतील एकादें वाढले अस. तां दुसरें वाढेल आणि एक कमी झालें असतां दुसरें कमी होईल तर तें सम प्रमाण. जसें किम्मत अधिक दिली असतां बाजारांत मालही अधिक मिळेल, आणि कमी दिली असतां कमी मिळेल. परंतु एक परिमाण वाढलें असतां जर दुसरें कमी होईल आणि एक कमी झालें असतां दुसरें जर वाढेल तर तें व्यस्त प्रमाण. जसें कोणतेही काम करण्यास माणसें अधिक लावली तर तें कमी दिव सांत संपेल, परंतु कमी लावलीं असतां त्यांत तें संपविण्यास अ धिक दिवस लागतील. टीप. शिक्षकानें विद्यार्थ्यांस अनेक जातींची उदाहरणें घालून सम प्रमाण कोणतें व व्यस्त प्रमाण कोणतें, व उदाहरणांत व्यर्थ गोष्टी कोणत्या असतात व खोटी उदाहरणें कोणती यांचा चांगल। बोध करून द्यावा. दिलेल्या तीन राशीपासून चवथें पद ह्मणजे इच्छाफल काढण्याचें. रीति, उदाहरणांत सांगितलेल्या तीन पदांपैकीं उत्तर ज्या जातीचें मागितले असेल त्या जातीचें जें असेल तें पद तिसरे स्थानों मांडावें. नंतर प्रमाण सम किंवा व्यस्त असेल त्याप्रमाणें उत्तर अधिक किंवा कमी येणारे आहे याविषय अनुमान करून त्याप्रमाणे राहिले दोन समजाति पदांपैक मोठें किंवा धाकटें पद मध्य स्थानों लिहावे आणि राहिले पद आदि स्थानी लिहावें, नंतर मध्य पद आणि इच्छांक यांचा गुणाकार करून व्यास् आदि पदानें भागावें ह्मणजे इच्छाफळ काय असावें हें समजतें उदाहरण १ लें. बाजारांत ४ पैशांचे ९ आंबे विकत
पान:अंकगणित.pdf/३२
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही