या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्रिराशि. २३ मिळतात; तेव्हां एक रुपयाचे किती आंबे येतील ? एक रुपया ह्मणजे ६४ पैसे. 'या ठिकाणी पैसे अधिक आहेत तेव्हां आंबेही अधिक येतील हें समममाण झालें. उत्तर आंबे मागतो ह्मणून तृतीय स्थानों आंबे आले, उत्तर अधिक येणारें सबब अधिक पैसे मध्यस्थानी आले. आणि कमी पैसे आदिस्थानी आले. पै. आंबे. ४ : ६४

६४ ४ ) ५७६ १४४ आंबे. रीतीप्रमाणं मध्य व अंत्य या पदांचा गुणाकार ५७६ आला यास आदिपदानं भागून १४४ आंबे इच्छाफळ आहे. २ रें उदाहरण, आमचे घरांत १० मनुष्यें आहेत त्यांचे पोटास रोज २ पायली तांदुळांचा भात लागतो. आमचे जवळ १. फरा ह्मणजे १६ पायली तांदूळ आहेत ते त्यां किती दिवस पुरतील ! पुष्कळ दिवस पुरतील. तृतीय स्थानों दिवस आले, मध्यस्थानी १६ पायली आल्या आणि आदिस्थानी २ पायल्या आल्या. उदाह- रणांत १० मनुष्ये उगीच सांगितलीं तीं हिशेबांत येत नाहींत पा. पा. दि. २ : १६ : : १ १६ २ ) १६ ८ दि. हें उत्तर. ३ रें उदाहरण. एक फराभर अन्न आमचे घरांतील १० मनुष्यांस २० दिवस पुरतें. परंतु अकस्मात् आमचे घरी