या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ अंकगणित, आखखीं १० पाहुणे आले तर तेंच अन आह्मां सर्वांस किती दिवस पुरेल ? १०. मनुष्यांबद्दल आता खाणारी २० मनुष्ये झाली. माणसें वाढली तर अर्थात अन्न कमी दिवस पुरेल हें व्यस्त प्रमाण झालै. तिसरे स्थानीं २० दिवस आले, मध्यस्थानों १० माणसें आलीं, आणि आदिस्थानीं २० माणसें आली. म्हणून रीतीप्रमाणे. दि. मा. मा. २० : १०

२०

१० २०) २०० १० दि. हें उतर. ४ थें उदाहरण. आमचे घरापासून ८ कोसांवर एक गांव आहे त्या ठिकाणी जाऊन परत आमचा गडी १० तासांत येतो. आह्मी ५ असामी निघालों आणि गड्याचे दुप्पट चाली- ने चाललों, तर त्या ठिकाणी पोंचून परत किती वेळांत येऊं? या उदाहरणांत गांवचें अंतर ८ कोस आहे म्हणून सांगितलें, याची हिशेबांत काही गरज नाहीं. आम्हीं पांच असामी आहों म्हणून सांगितले, त्या आम्हा पांचांचीही हिशेबांत काही गरज नाहीं, फक्त आम्हीं दुप्पट चालीने चाललों एवढे मात्र लक्षांत घेण्याजोगें आहे. लवकर चालण्यानें परत लवकर येऊं हें व्यस्त प्रमाण झालें. तृतीय स्थानी १० तास आले, मध्यस्थानी १ चाल आली आणि आदिस्थानी २पट चाल आली. म्हणून रीतीप्रमाणे. चा. चा. ता. २

१ : : १०

१ २) १० ५ तासांत येऊं हैं उत्तर. अभ्यासाकरितां उदाहरणे. १. ७ कवड्या देऊन १० बोरे विकत मिळतात, १४ गंडे म्हणजे ५६ कवड्या दिल्या तर बोरे किती येतील?