त्रिराशि. २५ २. दोन आण्यांचे कागद, खर्डे लिहावयास ३ महिने पुरतात, तेव्हां १ वर्ष किंवा १२ महिन्यांत किती आण्यांचे कागद लागतील ? ३. आमचे शाळेत ६४ मुलें आहेत त्यांची फी दर महिना ४ रुपये उत्पन्न होत्ये, त्याच शाळेत फीचें उत्पन्न १० रुपये झाले तर मुले किती असावी बरें ? ४. आमचे घराचे मार्गे एक नळ आहे त्यावाटे पाणी ३ तासांत २५ घागरी बाहेर येतें. तोच नळ जवळचे एका होदांत सोडला तर तो हौद २ दिवसांत म्हणजे ४८ तासांत पूर्ण भरतो. तर तो हौद किती घागरींचा असावा ? ५. दर हातास दोन आण या दराने २५ माणसांनी ८० हात भिंत घातली असता १० रुपये मिळतात. तर त्याच दराने १० माणसांनीं दुसरी भिंत घालून १०० रुपये मिळविले तेव्हां त्यांणी किती हात भिंत घातली असावी बरें ? ६. एका घराचे भाडें दर महिन्यास २ रुपये पडतें, तर त्याच घराचा १० महिन्यांचा आकार किती होईल ? ८. एका मुलाच्या स्लेट, पार्टी, व बुकास ३ रुपयांचा खर्च पडतो. भातां कोणी एका गृहस्थानें गरीब मुलांकरितां ६० रुपये बक्षीस दिले आहेत. तर तेवढ्यात किती मुलांपुरत्या स्लेटी, पाट्या व बुर्के मिळतील ? ८. एका पूर आलेल्या नदीत एक लांकूड टाकले असता तें एका तासांत २ कोस लांब जातें, तेच लांकूड एके दिवसांत म्हणजे २४ तासांत किती लांब जाईल ? ९. एका २४० घागरींच्या हौदास दोन नळ आहेत. एकांतून पाणी आंत येतें, तो सोडला तर तो हौद १० तासांत भरतो व दुसऱ्या नळांतून पाणी बाहेर जातें, तो सोडला तर २० तासांत हौद रिकामा होतो. ते दोन्ही नळ मोकळे असले तर तो हौद किती वेळांत भरेल? १०. वैजेचे घोडे ३ मिनिटांत म्हणजे १८० सेकंदांत एक सग- ळा फेरा फिरून येतात, व त्यांचं धांवण्याचा वेग दर सेकंदांत ३० हात जाण्याचा आहे, तर एका फेन्यांत त्या घोड्यांस किती हात लांब धांवावें लागतें तें सांग ? 4a
पान:अंकगणित.pdf/३५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही