या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ अंकगणित. ११. अमुक वेळी माझी सावली ५ विती लांब पडली आहे व माझी उंची ८ विती आहे, त्याचसमय एका घराची सावली मो- जली ती १० हात लांब भरली तर तें घर किती हात उंच असावें ? या जातीचे अनेक प्रश्न शिक्षकाने विद्यार्थ्यांस घालून त्यांस राशि गणिताची चांगली माहिती करून द्यावी. पंचराशि व बहुराशि प्रमाण. जेव्हां एकादें परिमाण दोन किंवा अधिक परिमाणांशीं प्रमाणांत असतें तेव्हां ज्या प्रमाणानें त्या परिमाणांचा परम्पर संबंध असेल त्याप्रमाणें पंचराशि किंवा बहुराशि प्रमाण उत्पन्न होईल. उदारण, एकादें शेताचें क्षेत्र किंवा जमीन लांबी प्रमाण वाढते आणि रुंदी प्रमाणही वाढते. त्याचप्रमाणे आपणास एक ओटा घालणें आहे तर, त्याची लांबी रुंदी आणि उंची ज्याप्रमाणे जा- ती घ्यावी त्याप्रमाणे त्याचे कामाचा आकार अधिक होईल. पंच किंवा बहुराशि प्रमाणाचे हिशेब मांडण्याची तन्हा त्रिराशि प्रमाणेंच आहे, परंतु दोहोंत फेर इतकाच कीं बहुराशींत पहिले व दुसरे स्थानों अनेक रकमा येतात, आणि उत्तर अधिक किंवा कमी येत आहे हें दर परिमा- णाशों वेगळाले पाहून त्या प्रमाणे भारी किंवा हलका अंक मध्यस्थानीं मांडावा लागतो. पुढें एक दोन उदाहरणें करून दाखविलीं आहेत त्यांवरून वर सांगितलेली गोष्ट चांगली लक्षांत येईल. उदाहरण. ३६ हात लांब, व १२ हात रुंद अशी सत्रंजी काढावयास ५० रुपये पडतात : तर ६० हात लांब व ८

हात रुंद अशी सजी काढविण्यास किती रुपये पडतील : अधिक लॉबीस अधिक रुपये पडतील, म्हणून लबिपैिकी मोठी लांबी मध्यस्थानी येईल.