पंचराशि व बहुराशि गणित. २९ ६६ रिमें कागद लागतात; तर १२३ बंदी वह्या १००० तयार करण्यास किती कागद लागतील ? ८ उ कोणी मनुष्य दररोज ८ तास प्रमार्णे चालत असतां ३ दिवसांत ९० मैल जमीन चालतो; तर तोच ६ तास प्रमाणे चालला तर ५४० मैल जाण्यास किती दिवस लागतील ? ९ उ. ८ माणसें ९ दिवसांत १०० फूट लांब ३ फूट रुंद ४ फूट ६ इंच खोल असा चर खणितात; तर ८० फूट लांब ५ फूट रुंद आणि २ फूट खोल असा चर ५३ दिवसांत तयार करण्यास किती माणसें लागतील ? १० उ. लोखंडाच्या ६ कांबी, एकेक ४ फूट लांब ३ फूट रुंद व २ फूट जाड असली तर २८८ पौंड वजन भरतात; तर १५ कांबी दर एक ६३ फूट लांब ४ फूट रुंद, आणि ३ फूट जाड असल्या तर त्या किती वजन भरतील ? ११. उ. ७ मनुष्ये रोज ८ तास मेहनत करीत असता १००० पौंड भांडवलावर ७ महिन्यांत १०० पौंड नफा मिळवितात; तर २१ मनुष्ये दररोज ११ तास मेहनत करीत असतां एक वर्षात किती नफा मिळवितील ? १२ उ. ३० पुरुष ४५ बायका दररोज १२ तास प्रमाणे काम करीत असतां, २० दिवसांत एक शेत कापितात, तर त्यांणी १२ दिवस काम करून बाकी राहिलेले काम दररोज १० तास प्रमाणे करून ४ दिवसांत संपविणें आहे, तर किती मनुष्य जास्त लाविली पाहिजेत ; २ पुरुषांचें काम ३ बायकांच्या कामा बराबर आहे. १३ उ. एका किल्लयांत १७५० मनुष्य आहेत व दर मनुष्यास दररोज २ || शेर प्रमार्णे सर्व मनुष्यांस पुरे इतकी सामग्री आहे, परंतु त्या किल्यांत १५० मनुष्ये जास्त आली व शत्रूचा वेढा पडल्यामुळे बाहेरील सामग्री येण्याचें बंद झालें, त्यामुळे तो सामग्री त्या मनुष्यांस ९ महिने पुरविणें आहे, तर दरमनुष्यास दररोज किती शेर अन द्यावें म्हणजे पुरेल ? १४ . १४ मनुष्ये दर मिनिटांत एक बंब ५ वेळ दाबीत असतां ३ दिवसांत दररोज ६ तास प्रमाणे ३६०० ग्यालन पाणी का.
पान:अंकगणित.pdf/३९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही