या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० अंकगणित. ढितात तर ११ मनुष्यें दर मिनिटांत ७ वेळ दाबीत असतां ७४०० ग्यालन पाणी किती दिवसांत काढितील ? दुसरा बंब पहिल्या बंबाच्या दीडपटीने मोठा आहे. दृढभाजक. एका संख्येनें दुतरी संख्या निःशेष भागली जात आहे तर त्या संख्येत दुसरीचा भाजक ह्मणतात, आणि दुसरीस पहिले संख्येचा भाज्य ह्मणतात जसें २ है १२ चे भा- जक आहेत, आणि १२ हे २ चे भाज्य आहेत. कित्येक संख्या अविभाज्य आहेत, ह्मणजे त्यांस दुसरे कोणतेही संख्येने भागिलें असतां त्या निःशेष भागल्या जात नाहींत. उ. ३, ५, ७, ११, १३, १७, १९, २३, २९, ३१, इ०. ज्या संख्या दुसऱ्या भाज्य आहेत. उ० संख्यांनी निःशेष भागल्या जातात त्या ४, ६, ८, १०, इ०. २४ ही संख्या २, ३, ४, ६, ८, १२, इतक्या संख्यांनी निःशेष भागली जाते म्हणून २४ ही संख्या त्यांचा भाज्य आणि त्या २४ च्या भाजक आहेत. ह्या सर्व भाजकांत १२ ही संख्या मोठा भाजक आहे म्हणून तीस २४ ह्या संख्येचा दृढभाजक म्हणतात. कित्येक संख्या दोन किंवा अधिक संख्यांचे साधारण भाजक असतात- उ. १२ चे भाजक, १२, ६, ४, ३, २, हे आहेत. तसेंच १८ चे भाजक, १८, ९, ६, ३, २, आहेत. ह्यांत २, ३, ६, हे अंक १२ आणि १८ ह्या दोन्ही संख्यांचे साधा- रण भाजक आहेत, परंतु ह्यांत ६ ही संख्या त्यांचा दृढभाजक आहे. दृढभाजक काढण्याची रीति. दोन संख्यांचा दृढभाजक काढणे झाल्यास, मोठे संख्येस लहान संख्येने भागावें, भागून बाकी उरेल. तिनें भाजकास भागावें, ह्याप्रमाणे करी- त करीत शेवटीं भाग बरोबर तुटेपर्यंत करावें. शेवटचा जो भाजक तो त्या संख्यांचा द्रढभाजक होय.