३२ अंकगणित. गाणेताचे बुकाचे भाषांतरांत लघुतम साधारण गुणाकार हैं नांव दिलें आहे, परंतु त्यास लघुतम साधारण भाग्य हैं नांव असावें हें योग्य आहे, हे पुढील उदाहरणावरून सहज लक्षांत येईल. २, ३, ४, ६, ह्यांची १२ ही संख्या भाज्य आहे, कारण ह्या सनी ती निःशेष भागिली जाते. २४, २६, ४८, इ० ह्याही संख्या वरील अंकांचे भाज्य आ हेत, परंतु ह्यांत १२ हीच संख्या लघुतम साधारण भाज्य आहे कां की १२ पेक्षां लहान कोणतीही संख्या त्या भाजकांनीं निःशेष भागली जात नाहीं, ह्मणून १२ ही संख्या २, ३, ४, ६, ह्यांचा लघुतम साधारण भाज्य आहे. दिलेल्या संख्यांचा साधारण भाज्य काढणें झाल्यास त्या सर्वांचा गुणाकार करावा ह्मणजे तो भाज्य झाला. परंतु लघु- तम साधारण भाज्य काढणें झाल्यास पुढील रीतीने काढावा. * लघुतम साधारण भाज्य काढण्याची रीत. दिलेल्या संख्या एका ओळींत मांडाव्या, नंतर त्यांतील कांही संख्या जर त्यांतीलच कित्येक संख्यांच्या भाज्य अस- त्या तर त्या भाजक संख्या मोडन टाकाव्या, नंतर राहि- लेल्या संख्यांतील अंकांस निःशेष भाग जाईल असा एक भाजक घ्यावा, आणि त्याने जितक्या संख्या भागिल्या जा- तील तितक्या भागाव्या; नंतर ह्या घेतलेल्या भाजकाचे प्रभाग मनांत करावे, आणि त्यांनी ज्या संख्या भागिल्या जातील या भागाव्या. हे सर्व भागाकार दिलेल्या संख्यां-
- व्यवहारी अपूर्णांकातील मिळवणीचे व वजाबाकीचे रकमांचे
समच्छेद करण्याकरिता ह्या रीतीची गरज लागते.