पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंगारवाटा...
शोध
शरद जोशींचा
भानू काळे


शेतीमालाला रास्त भाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांचे व एकूणच देशाचे दारिद्रय कधीही दूर होणार नाही हे प्रथमत: शरद जोशी यांनी मांडले. 'इंडिया' विरुद्ध भारत' हे भारताचे मूलभूत दुभंगलेपण अधोरेखित करणारेही ते पहिलेच.
शेतकरी आंदोलन हे स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वांत मोठे जनआंदोलन. केवळ स्वच्छ विचाराच्या बळावर, पाठीशी पैशाचे, घराण्याचे, जातीचे वा सत्तेचे कुठलेही बळ नसताना त्यांनी शेतकऱ्यांची संघटना उभारली. शरद जोशी हे विचाराच्या ताकदीचे जाज्वल्य प्रतीक आहे.
शरद जोशींचे संपूर्ण सहकार्य लाभलेले हे चरित्र म्हणजे त्यांचे व्यामिश्र व्यक्तिमत्त्व, कौटुंबिक जीवन, भारतीय टपाल सेवेतील दहा व स्वित्झर्लंडमधील आठ वर्षे, शेतकरी संघटनेची वाटचाल यांचा सखोल शोध आहे. अनेक घटना वाचकांपुढे प्रथमच आणणारा. चाकणपासून स्वित्झर्लंडपर्यंत शेकडो जणांना भेटून लिहिलेले हे चरित्र म्हणजे एका देदीप्यमान कालखंडाचे दस्तावेजीकरण आहे.


शेतकरी संघटना

किंमत ६०० रुपये